Skip to main content

पत्रकार संजय कदम यांना सिंधुरत्न पुरस्काराने आले गौरविण्यात

 


पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे हे समारंभाचे अध्यक्ष या नात्याने आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पत्रकार संजय कदम यांना सिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.याप्रसंगी रमाकांत चव्हाण व संजय साटम याना ’जीवन गौरव’ आणि पत्रकार संजय कदम याना ’सिंधुरत्न’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्याचबरोबर यशस्वी युवा उद्योजक स्थापत्य अभियंता संतोष पोकळे, डॉ.तन्वी बांदेकर, डॉ. आशिष बांदेकर, ऍड. अमोल गावडे आणि क्रीडा क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. सचीव बाप्पा मोचेमाडकर यांनी प्रास्ताविकामधे वर्षभरात आपल्या संस्थेने राबवलेले उपक्रम आणि प्रगतीचा आढावा घेतला. नंतर उपाध्यक्ष प्रिया खोबरेकर व अध्यक्ष केशव राणे यांनी आपले मनोगत व्यक्त केल्यानंतर शेकाप नेते प्रीतम म्हात्रे यांनी आपल्या संस्थेला येणार्या कोणत्याही अडचणीमधे पूर्णपणे सहकार्य करण्याचे वचन दिले.
नंतर अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे यांनी आपल्या बालपणीची आठवण सांगून उपस्थितांसमोर आपले सकारात्मक आदर्श विचार मांडले. उपाध्यक्ष संतोष चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाचा प्रारंभ श्रीगणेश पंचरत्न या स्तोत्राच्या पार्श्‍वगायनाच्या साथीने दीपप्रज्वलन करून झाला. नंतर चेतनाताई वालावलकर व सहकारी महिलांनी नांदी व स्वागतगीत सादर केले. माधव भागवत यांने तबला तर संकेत पवार यांने पखावज साथ केली. यशवंत बिड्ये बुवा यानी खंजिरीसाथ केली. आपले सभासद व पाल्यांचे विविध गुणदर्शनपर सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाले. यामधे नव्या जुन्या, मराठी-हिन्दी गाण्यांचे करावकेवर सादरीकरण, तसेच बासरीवादन, भरतनाट्यम विविध प्रकाचे नृत्य कलाकारांनी सादर केले. ज्येष्ठ महिलांनी सादर केलेले ’बाईपण भारी देवा’ हे फ्यूजन प्रकारातील समूहनृत्य रसिक प्रेक्षकांच्या मनाला चांगलेच भावले. या गाण्यांची निवड, त्याचे दिग्दर्शन आणि ज्येष्ठ महिलांकडून कसदार तालमीने करून घेतलेला पदविन्यास या त्रिगुणी संगमासाठी नृत्यदिग्दर्शिका अदिती इंदप हिचे नक्कीच कौतुक करावे लागेल! उपाध्यक्ष प्रिया खोबरेकर व सहकारी महिलांनी सादर केलेल्या ’कोकणचो रुबाब भारी’ या मालवणी नाटकाला रसिकांनीही मनमुराद दाद दिली. प्रसन्नकुमार घागरे यांच्या संकल्पना व दिग्दर्शनाने नटलेला भव्यदिव्य वारकरी दिण्डीसोहळा कार्यक्रमाचा खास आकर्षणबिंदू ठरला. आणि या कार्यक्रमाने सोहळा रंगततेच्या सर्वोच्चपदावर गेल्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
           वैभवी मराळ यांचे अभ्यासपूर्ण बहारदार निवेदन, गायकांचे भावपूर्ण गायन, नृत्यांगनांचा पदविन्यास आणि संघाची कार्यकारिणी व कार्यकर्त्यानी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी दिलेले मोलाचे योगदान या चतुःसूत्रीच्या बळावर नटलेल्या या सोहळ्याच्या सुखद स्मृती मनामधे साठवून नंतर रसिकांनी ’सात्विक’ आणि ’उन्मत्त’ अशा भोजनाचा आस्वाद घेतला.


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)...

पराभूत झाले तरी संपूर्ण ताकदीने लढले

  पनवेल : पनवेल 188 विधानसभेत शेकाप आघाडीची 2019 मध्ये 87000+ मते असताना माजी आमदार बाळाराम पाटील यांनी पनवेलमध्ये मुसंडी मारून महाविकास आघाडी,शेकाप आणि मित्र पक्षांच्या मदतीने शेतकरी कामगार पक्षाचा 1 लाख 32 हजार 840 चा आकडा पार केला.           बाळाराम पाटील यांच्या विरोधात भाजपने पंतप्रधान नरेंद्र मोदी, सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्या सभा घेतल्या. तसेच स्टार प्रचारक प्रचारात उतरवले याविरुद्ध दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडी, शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता कोणताही मोठा नेता किंवा स्टार प्रचारक नसताना महाविकास आघाडी, शेकाप नेत्यांच्या नियोजनबद्ध मार्गदर्शनाखाली माजी आमदार बाळाराम पाटील हे प्रचंड ताकतीने लढले आणि त्यांनी पनवेल विधानसभा मतदारसंघात एक लाख बत्तीस हजार 840 मते मिळवली. त्यामुळे महाविकास आघाडी शेकापची मते पनवेल विधानसभा मतदारसंघात वाढली आहेत. १८८ पनवेल विधानसभा मतदारसंघाची मतमोजणी ही पनवेल मधील काळसेकर महाविद्यालयाच्या प्रांगणात सकाळी सुरू झाली. ८ वाजता टपाल मतदानाची सुरवात झाल्यापासून शेकापचे उमेदवार बाळाराम पाटील हे आघाडीवर होते. पह...