Skip to main content

Posts

Showing posts from February, 2025

आप्पासाहेब मगर यांचा "बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सप्रेस राष्ट्रीय पुरस्काराने सन्मान"

  पणजी/प्रतिनिधी : खारघर येथील जनसभा या वर्तमानपत्राचे संपादक आणि खारघर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब मगर यांना बाबू जगजीवन राम कला संस्कृती साहित्य अकादमी महाराष्ट्र प्रदेश सचिव व इमेज इंटरनॅशनल रिसर्च असोसिएशन तसेच नॅशनल प्रधान मुख्य सरपंच संघ यांच्या संयुक्त विद्यमाने नवव्या राष्ट्रीय युथ इमेज इंटरनॅशनल संमेलनामध्ये "बेस्ट जर्नालिस्ट नॅशनल एक्सप्रेस राष्ट्रीय पुरस्कार" जाहीर करण्यात आला.वैयक्तीक कारणांमुळे पणजी मध्ये पार पडलेल्या या पुरस्कार वितरण सोहळ्याला आप्पासाहेब मगर हे उपस्थित राहू शकले नाहीत.सोळाव्या लोकसभेचे माजी खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांच्या शुभहस्ते 16 फेब्रुवारी 2025 रोजी पणजी येथे या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले असल्याची माहिती संस्थेचे प्रदेश सचिव प्राध्यापक गोरख साठे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. आप्पासाहेब मगर हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांनी आतापर्यंत समाजातील उपेक्षित,दुर्बल,वंचित घटकांच्या न्याय हक्कासाठी गेले पंधरा वर्षापासून खारघर शहर व नवी मुंबई परिसरात जनसभा या साप्ताहिकाच्या माध्यमातून कार्य केले आहे.लोकशाहीचा चौथा स्तंभ मजबूत ...

पत्रकार संजय कदम यांना सिंधुरत्न पुरस्काराने आले गौरविण्यात

  पनवेल, दि.9 (वार्ताहर) ः सिंधुदुर्ग जिल्हा रहिवासी हितवर्धक संस्था, पनवेल या आपल्या संस्थेचे वार्षिक स्नेहसंमेलन पनवेल येथील फडके नाट्यगृहात अत्यंत उत्साहात संपन्न झाले. कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. भगवान बिरमोळे हे समारंभाचे अध्यक्ष या नात्याने आणि शेकाप नेते प्रीतम म्हात्रे, शेकाप जिल्हा चिटणिस गणेश कडू, उद्योजक मंगेश परुळेकर, सिंधुदुर्ग येथील अभियंता अजयकुमार सर्वगौड, युवा नेते मंगेश अपराज, आदी मान्यवर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पत्रकार संजय कदम यांना सिंधुरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले.याप्रसंगी रमाकांत चव्हाण व संजय साटम याना ’जीवन गौरव’ आणि पत्रकार संजय कदम याना ’सिंधुरत्न’ या पुरस्कारांनी गौरविण्यात आले. त्याचबरोबर यशस्वी युवा उद्योजक स्थापत्य अभियंता संतोष पोकळे, डॉ.तन्वी बांदेकर, डॉ. आशिष बांदेकर, ऍड. अमोल गावडे आणि क्रीडा क्षेत्रात यश प्राप्त केलेल्या खेळाडूंचाही सत्कार करण्यात आला. सचीव बाप्पा मोचेमाडकर यांनी प्रास्ताविकामधे वर्षभरात आपल्या संस्थेने राबवलेले उपक्रम आणि प्रगतीचा आढावा घेतला. नंतर उपाध्यक्ष प्रिया खोबरेकर व अध्यक्ष केशव राणे यांनी आपले मनोग...