पनवेल (प्रतिनिधी)तळोजा फेज १ मध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या संकल्पनेनुसार 'आमदार आपल्या दारी' हा उपक्रम रविवारी संपन्न झाला. या उपक्रमाचे नागरिकांनी स्वागत करत समाधान व्यक्त केले. या कार्यक्रमात आमदार प्रशांत ठाकूर यांनी तळोजा परिसरातील नागरीकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निराकरण करणार असल्याची ग्वाही दिली. येत्या ३ महिन्यांनतर पुन्हा एकदा या सर्व विषयांवर आढावा घेणार तसेच येत्या १ महिन्यांच्या आत या सर्व समस्या सोडवण्यासाठी पाठपुरावा सुरु करून नागरीकांना विविध सुविधा उपलब्ध करुन देणार असल्याचे स्पष्ट केले. त्याचबरोबरीने नागरीकांच्या सुरक्षेचा प्रश्न भाजपचे पदाधिकारी पुढाकार घेऊन सोडवतील असेही त्यांनी नागरिकांना आश्र्वासित केले. पनवेल महानगरपालिका आणि शासनाशी संबंधित असलेल्या विविध समस्या जाणून त्यांचे निराकरण करण्यासाठी आमदार आपल्या दारी हा उपक्रम करण्यात आला आहे. त्यानुसार तळोजा परिसरातील नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी तळोजा फेज १ सेक्टर ९ मधील उद्यानामध्ये 'आमदार आपल्या दारी' हा कार्यक्रम झाला. यावेळी नागरिकांनी सुरक्षा, पाणी टंचाई, नदी प्रदुषण, ड...