पनवेल : २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केलेल्या प्रकरणी ऑट्रॉसिटी ऑक्टअंतर्गत खांदेश्वर पोलिस ठाणे येथे गुन्हा नोंद केला आहे. यातील आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी आरपीआयश (आठवले गट) पदाधिकाऱ्यांनी सहाय्यक पोलिस आयुक्त कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
खांदेश्वर पोलिस ठाण्यात तीन जणांच्या विरोधात बलात्कार आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शुभम पवार याने २४ वर्षीय तरुणीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला आहे. गुन्हा दाखल होऊन २० दिवसांनंतरही पोलिसांनी यातील आरोपींना अटक केलेली नाही. त्यामुळे आरपीआयचे पनवेल महापालिका जिल्हा क्षेत्र अध्यक्ष प्रभाकर कांबळे , सुरेंद्र सोरटे, दिनेश जाधव यांनी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे
Comments
Post a Comment