खांदा कॉलनी ( प्रतिनिधी ): सकल मराठा समाज मंडळ, खांदा कॉलनीच्या वतीने चौथा वर्धापन दिन सोहळ्याचे आयोजन मोठ्या उत्साहात करण्यात आले. या प्रसंगी सत्यनारायण महापूजा आयोजित केली होती तसेच सायंकाळी ६ ते ७ या वेळेत संत जानाई महिला भजन मंडळाचा ” भजन संध्या ” आयोजित करण्यात आली. सायंकाळी ७ ते १० या वेळेत सभासद स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला व या मध्ये मराठा समाजासाठी उल्लेखनीय कार्य करणारे उद्योजक मा श्री रामचंद्र ढोबळे यांना मराठा समाजाचे रायगड जिल्हा समन्वयक श्री रामदास शेवाळे व श्री विनोद साबळे यांच्या शुभहस्ते ” मराठा भूषण ” पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाला खांदा कॉलनी सह पनवेल परिसरातील सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळीनी हजेरी लावली. मंडळाचे अध्यक्ष श्री संतोष जाधव यांनी मंडळाच्या कार्याची तसेच संस्थेने समाजहितासाठी सुरु केलेल्या संस्थेच्या वेबसाईट ची माहिती उपस्तित बांधवाना दिली.यावेळी उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात खांदा कॉलनीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावून सहभाग नोंदवला.
सकल मराठा समाज मंडळाच्या या उपक्रमामुळे समाज बांधणीच्या दिशेने सकारात्मक पाऊल उचलल्याचे समाधान कार्यक्रमाचे आभार व्यक्त करताना मंडळाचे सचिव श्री सदानंद शिर्के यांनी आपल्या मनोगतात सांगितले.
Comments
Post a Comment