पनवेल : उरण विधानसभा मतदारसंघामध्ये लाल बावटा फडकवून उरणमधील विजयाची माजी आमदार विवेक पाटील यांना भेट देणार आहे, असे उद्गार उरण विधानसभा मतदारसंघाचे शेतकरी कामगार पक्षाचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी काढले. प्रीतम म्हात्रे यांच्या गावभेटी सुरू असून, नुकतीच त्यांनी शिरढोण गावाला भेट देऊन आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांना अभिवादन केले. यावेळी पनवेलचे माजी नगराध्यक्ष जे. एम. म्हात्रे यांचे बंधू विजय म्हात्रे, माजी आमदार विवेक पाटील यांचे बंधू हेमंत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती नारायण घरत, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राम भोईर, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुभाष पाटील, संतोष पाटील, विभागीय चिटणीस नाना मोरे, शिरढोणच्या सरपंच वैशाली भोईर, माजी सरपंच पांडुरंग मुकादम, कांचन मुकादम, मोहन पवार, वाहतूक सेलचे पनवेल तालुका अध्यक्ष सागर भोईर, व्यापारी सेलचे विभागीय अध्यक्ष संग्राम भोपी, भरत भोईर, वासुदेव कर्णे कर, ऋषिकेश भोईर, भारत मुकादम, जगदीश मुकादम, भूषण म्हात्रे, योगेश मुकादम यांच्यासह शेकाप कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.
शेतकरी कामगार ज्येष्ठांनी माझ्यासारख्या पक्षातील तरुणाला
विधानसभेची निवडणूक लढवण्याची संधी दिल्याबद्दल प्रीतम म्हात्रे यांनी आभार मानले. युवा कार्यकर्ते पक्षाकडे आकर्षित होत असल्याचेही त्यांनी सांगितले. उरण विधानसभा मतदारसंघामध्ये भाजपामुळे अनेक विकासकामे रखडली असून, आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा वाडा व या विभागातील इतर कामे शेतकरी कामगार पक्षांमुळेच झाली आहेत, असे प्रीतम म्हात्रे म्हणाले.
Comments
Post a Comment