पनवेल : माजी आमदार बाळाराम पाटील यांच्या प्रचार दौऱ्याला जोरदार सुरुवात झाली आहे. या प्रचार दौऱ्यात अनेकांचा पाठिंबा मिळत असल्याने महाविकास आघाडीचा विजय निश्चित असल्याचे बाळाराम पाटील यांनी सांगितले.
महाविकास आघाडी आता पूर्णपणे एकदिलाने व एकत्रितपणे प्रचारात उतरली असून शिट्टीचा विजय निश्चित झाल्याचे प्रतिपादन 188 पनवेल विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार बाळाराम पाटील यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी संदर्भात माहिती देताना सांगितले. या बैठकीला उमेदवार बाळाराम पाटील यांच्यासह काँग्रेस पनवेल जिल्हाध्यक्ष सुदाम पाटील, युवक अध्यक्ष हेमराज म्हात्रे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, शिवसेना तालुका प्रमुख विश्वास पेटकर, उपाध्यक्ष कॅप्टन कलावत, माजी.नगरसेविका निर्मला म्हात्रे, एम.पी.यादव, अनिल नाईक, फारुक पटेल यांच्यासह इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी बोलताना बाळाराम पाटील यांनी सांगितले की, ही निवडणूक सर्वांसाठी महत्वाची आहे. या निवडणुकीत शिट्टी विजयी होेईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. खारघर, कामोठे, कळंबोली, खांदा कॉलनी, तळोजा, पनवेल, नवीन पनवेलमध्ये आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून आमच्या विजयाची शिट्टी ही वाजणारच असेही त्यांनी यावेळी सांगितले. गेल्या 15 वर्षात येथील आमदाराने काय काम केले याची त्यांनी माहिती द्यावी, असा सवाल त्यांनी केला. पनवेलसाठी वेगळा वचननामा काढणार असल्याचे त्यांनी सांगितले. तर यावेळी बोलताना सुदाम पाटील यांनी सुद्धा आता काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व आमचे सर्व मित्र पक्ष एकत्रितपणे कामाला लागलो असून आमच्या हेवेदावे मिटले आहेत व कोणत्याही परिस्थितीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना निवडून द्यायचे हा निर्धार आम्ही केला असून व त्या माध्यमातून प्रचारात सक्रीय झालो असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या पंधरा वर्षात पनवेल मागे गेला आहे. अनेक समस्या पनवेलमध्ये ठाण मांडून आहेत. त्यामुळे पनवेलकरांनी आता महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करावे असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Comments
Post a Comment