उरण दि २(विठ्ठल ममताबादे ) समाजामध्ये घडणाऱ्या सर्व प्रकारच्या गोष्टी शेवटच्या घटकापर्यंत येण्यासाठी २४ तास निस्वार्थीपणे काम करणारा पत्रकार हा खऱ्या अर्थाने लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आहे नैसर्गिक आपत्ती असो किंवा कोणावर अन्याय होत असेल तर त्यावर पत्रकार आवाज उठतात. रायगड जिल्ह्यातील पत्रकार, नवी मुंबई मधील पत्रकार चांगले काम करीत आहेत. पत्रकारांनी चांगले काम करून समाजात चांगला आदर्श निर्माण केला आहे त्यामुळे पत्रकारांप्रती आदर प्रेम व बाळगत व एक कुटुंब म्हणून म्हात्रे कुटुंबातर्फे दिवाळी फराळ कार्यक्रमाचे आयोजन केल्याची माहिती शेतकरी कामगार पक्षाचे रायगड जिल्हा खजिनदार प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी दिली.
शनिवार दिनांक २ नोव्हेंबर २०२४ रोजी सकाळी ११ वाजता रंजना बंगला, श्री जे. एम. म्हात्रे साहेब यांचे निवास स्थान, कोपर गाव, सेक्टर ८, उलवे येथे पत्रकारांसाठी फराळ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी प्रितम म्हात्रे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांच्या कार्याचे कौतुक करत आलेल्या सर्व पत्रकारांचे प्रितम म्हात्रे यांनी स्वागत केले.याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक जे. एम. म्हात्रे, नारायणशेठ यांनीही पत्रकारांच्या कार्याचे कौतुक पत्रकारांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकारांचे प्रतिनिधी म्हणून जेष्ठ पत्रकार माधवराव पाटील, जेष्ठ पत्रकार मंदार दोंदे यांनी आपले मनोगत व्यक्त करत एका चांगल्या कार्यक्रमाचे आयोजन केल्याचे सांगत जे. एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे यांचे मनःपूर्वक आभार मानले. या प्रसंगी सर्वच पत्रकारांनी जे. एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे व त्यांच्या कुटुंबियांना दिवाळी तसेच पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. पत्रकारांनी म्हात्रे कुटुंबियांसोबत दिवाळी फराळचा आनंद घेतला.उद्योजक जे. एम. म्हात्रे, प्रितम म्हात्रे हे नेहमी पत्रकारांच्या पाठीशी असतात. पत्रकारांच्या सुख दुःखात सहभागी होतात. त्यामुळे म्हात्रे कुटुंबियांप्रती आदर भाव बाळगत या फराळ कार्यक्रमात पत्रकार मोठया संख्येने उपस्थित होते. दिवाळी फराळ कार्यक्रमामुळे पत्रकारांमध्ये आनंदाचे वातावरण होते.
Comments
Post a Comment