Skip to main content

2 वर्षांचा मालमत्ता कर माफ करणार!-'शपथनामा’तून कांतीलाल कडू यांची 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर नागरिकांना ग्वाही

 

भ्रष्टाचारी उमेदवारांपासून पनवेलचे संरक्षण करण्याकरिता ‘सितार’ चिन्हासमोरील बटण दाबण्याचे आवाहन

पनवेल: सत्ताधारी भाजपाचा अडेलतट्टूपणा, राज्य सरकारची हुकूमशाही, विरोधी पक्षाचे बोटचेपी धोरण आणि महापालिका प्रशासनाच्या भोंगळ कारभारातून दोन वर्षांचा नाहक भरावा लागलेला मालमत्ता कर नागरिकांच्या जिव्हारी लागला आहे. त्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे. आपणाला निवडून दिल्यास त्या नुकसानाची भरपाई करून देताना दोन वर्षांचा मालमत्ता कर माफ केला जाईल, अशी जबरदस्त ग्वाही लोकमुद्रा जनहित पार्टीचे पक्षाध्यक्ष आणि 188 पनवेल विधानसभा मतदार संघाचे अभ्यासू, व्यासंगी उमेदवार कांतीलाल कडू यांनी काल, बुधवारी (ता. 06) पत्रकार परिषदेतून दिली.कांतीलाल कडू यांची निशाणी सितार (वीणा) आहे. मतदान यंत्रावरील 5 व्या क्रमांकासमोरील बटण दाबून पनवेलच्या विकासाची शपथ घेत कडू यांनी पक्षाचा ‘शपथनामा’ प्रकाशित केला. त्याशिवाय ‘शपथनामा’ 500 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर लिहून नोटरी केल्याची माहिती त्यांनी देताना, निवडून आल्यावर शपथनामाचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कुणीही आपल्याला न्यायालयात आव्हान देवू शकतो, असेही त्यांनी विशेषरित्या नमूद केले.हॉटेल रेडविंग्सच्या सभागृहात झालेल्या पत्रकार परिषदेला कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते डॉ. भक्तीकुमार दवे, शेकापचे युवा नेते विजय काळे, राष्ट्रीय फेरीवाला समितीचे संचालक मंगेश गोवारी, लोकमुद्राचे खजिनदार आनंद पाटील, महासचिव सुधीर सोमवंशी, ऍड. मनस्वी गोवारी, संजोगीता परदेशी, अश्‍विनी भोसले, प्रसाद जाधव, डॉ. मुनीर तांबोळी, मुद्दसर पटेल आदी मान्यवर उपस्थित होते. पत्रकार परिषदेला मुद्रित आणि इलेक्ट्रॉनिक मीडियाचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.24 तास पिण्याच्या पाण्याचे आश्‍वासन देवून भाजपा आणि शेकापच्या आजी, माजी आमदारांनी जनतेच्या भावनेशी डोंबार्‍याचा खेळ खेळला आहे, त्यांना आता जनता माफ करणार नाही. मात्र, पाण्याचे व्यवस्थित नियोजन करताना देहरंग धरणाच्या 14 फुट उंचीच्या भिंती वाढविणे आणि 5 फुट गाळ काढण्यासोबत राज्य सरकारच्या जलसंपदा खात्याकडून नव्या धरणाचा प्रस्ताव मंजूर करून घेतला जाईल आणि पाण्याचे दुर्भीष्य दूर करण्याचा पक्का इरादा कडू यांनी बोलून दाखविला.याशिवाय, दर्जात्मक व टक्केवारी विरहित मजबूत रस्ते, महावितरणच्या स्टेशन पॉवर केंद्राची प्रत्येक शहरात वाढीव क्षमतेने उभारणी, मोफत आरोग्य सेवा, शस्त्रक्रियेकरिता 500 खाटांचे अत्याधुनिक हॉस्पिटल, बेरोजगार तरुण, तरुणीच्या हाताला प्रत्यक्षात काम देताना नोकरीची हमी, बचत गटाच्या महिलांनी उत्पादित केलेल्या  मालाची, साहित्याची विक्री करण्याकरिता प्रत्येक शहरात ‘महिला उद्योग हब’ची उभारणी, सर्व शहरांमध्ये तीन मजली इमारती बांधून त्यात भाजी मंडई, मासे विक्रेत्यांचा बाजार भरविला जाईल. आठवडी बाजार कायमचे बंद केले जातील, वाहनतळाची कायमची डोकेदुखी दूर करण्यासाठी सुसज्ज वाहन पार्किंगची व्यवस्था, सर्वांना प्रवेश सवलतीच्या दरात दिले जाईल आणि त्याकरिता खासगी शाळांची मक्तेदारी मोडीत काढण्याकरिता महापालिका शाळांची सीबीएससी व आंतरराष्ट्रीय दर्जाच्या शिक्षणाची व्यवस्था केली जाईल.लेडीज बार, डान्स बारवर अंकुश ठेवण्यासाठी कायद्याची अंमलबजावणी करण्यावर कायदेशीर भर राहिल, त्यातून अनेक संसार उद्ध्वस्त होण्यापासून वाचतील, पाणी चोरीला आळा घालण्याकरिता टँकर माफियांचा फास आवळला जाईल. महापालिका, पोलिस, तहसीलदार, सिडको, जिल्हा परिषद, पंचायत समिती व राज्य सरकारच्या अन्य आस्थापनांतील भ्रष्टाचार रोखण्याकडे कल राहिल. ज्येष्ठ नागरिक अडगळ नव्हे तर मार्गदर्शक असल्याने त्यांचा सन्मान करताना त्यांच्यासाठी प्रत्येक शहरात मनोरंजन केंद्र उभारले जाईल. घरातून शिक्षण, नोकरी, व्यवसायाकरिता किंवा अन्य कामांकरिता बाहेर पडलेल्या महिलांचे संरक्षण करण्याला प्राधान्य देण्यात येईल.पनवेल तालुका वारकरीबहुल असल्याने समस्त वारकरी सांप्रदायाकरिता भव्यदिव्य वारकरी भवन निर्माण केले जाईल. पनवेल, उरण बस आगारातून पंढरपूर सार्वजनिक बस सेवा आणि मुंबई पनवेल ते पंढरपूर रेल्वे सेवा सुरु केली जाईल, अशी महत्वपूर्ण कामांची सेवा बजावणार असल्याचे प्रतिज्ञापत्रातून कडू यांनी शपथनामातून जाहीर करून विरोधी पक्षाच्या उमेदवारांना धक्का आणि मतदारांना मोठा दिलासा दिला आहे.याशिवाय कर्नाळा नागरी सहकारी बँक घोटाळ्यानंतर 60 हजार ठेवीदारांच्या 367 कोटी रुपयांच्या विम्याची रक्कम मिळवून दिली, बँक कर्मचार्‍यांना नुकसान भरपाई म्हणून अडीच कोटी रुपये मिळवून दिले. कोविड काळात 3 हजार रुग्णांना हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करून घेतले. साडे तीन कोटी रुपयांची त्यांच्या देयकात सवलत मिळवून देण्याचा महाराष्ट्रात विक्रम केल्याची माहितीही कडू यांनी उजळणीतून सांगितली.पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकाचे नाव बदलण्याचा भाजपा नेत्यांचा (तेव्हाचा कॉंग्रेसी डाव) हाणून पाडला आणि नगरपालिकेतील सत्ताधार्‍यांना ठराव रद्द करण्यास भाग पाडले. गुटखामुक्ती, लेडीज डान्सबारविरोधी आंदोलन, पाण्यासाठी महापालिकेविरोधात कुटुंबासह उपोषण, वाढीव पाणी आणण्यात यश, आयटीआयच्या इमरतीचा 110 कोटींचा प्रस्ताव मंजूर, शहरी व ग्रामीण भागातील रस्त्यांची शंभर कोटी रुपयांची डागडुजी, पथदिवे दुरुस्ती, नवीन रस्ते असे किमान दिडशे कोटींची कामे पूर्ण केली. लोकनेते दि. बा. पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याविषयी आक्रमक भूमिका आणि राज्य व केंद्र सरकारशी पत्रव्यवहार तसेच दिबांना राज्य सरकारने मरणोत्तर महाराष्ट्रभूषण पुरस्कार देण्याची मागणी करणारा आणि पनवेलमध्ये त्यांचे स्मारक उभारण्यासाठी पत्रव्यहार केला. गर्भवती माता हॉस्पिटलची नव्याने निर्मिती केली. देशाकारिता प्राणाची आहुती देणार्‍या 300 सैनिकांच्या कुटुंबांचा सत्कार करण्यात आला. कळंबोली दरवर्षी पाण्याखाली जात असल्याने नव्याने पुनर्विकास करताना वाढीव चटई क्षेत्र दिला जावा म्हणून सिडकोकडे पत्राव्यावहार केला. विद्यार्थ्यांचा गुणगौरव आणि शालेय प्रवेश मिळण्यासाठी वारंवार यशस्वी आंदोलने केली. ग्रामीण भागाच्या विकासासाठी 100 कोटींच्या निधीसाठी राज्य सरकारला प्रस्ताव सादर केला आहे. राज्यस्तरीय साहित्य संमेलन आणि वारकरी बंधू भगिनींच्या सहभागाने दिंडीचे आयोजन केले. अपघात रोखण्याकरिता अवजड वाहनांविरोधात कारवाईसाठी आरटीओकडे बैठक घेतली. तरुणांकरिता शरीरसौष्टव स्पर्धा तरुणीकरिता मेकअप स्पर्धा घेतली. तसेच सांस्कृतिक चळवळ राबवताना विनामूल्य संगीत मैफिलीचे आयोजन केले असल्याची माहिती दिली.शपथनामाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे भारतरत्न लतादीदी मंगेशकर, निरूपणकार तीर्थरूप आप्पासाहेब धर्माधिकारी, भावगंधर्व पं. हृदयनाथ मंगेशकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, हेमालकसाचे दैवत डॉ. प्रकाश आमटे, अनाथांची माय सिंधूताई सपकाळ, ज्येष्ठ साहित्यक आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, पद्मश्री पद्मजाताई फेणाणी, चित्रपट अभिनेते महेश कोठारे आणि साहित्य शिरोमणी, पानिपतकार विश्‍वास पाटील आदींच्या अमृतवाणीतून कडू यांचा झालेला गौरव शब्दांकित करण्यात आला आहे.(उर्वरित वृत्त उद्याच्या अंकात)


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.