नवी मुंबई : विधानसभेच्या पराभूत उमेदवारांना आपल्या मतदारसंघात ईव्हीएम मशीन , मतमोजणी मध्ये, संपूर्ण चिट्ट्या मोजण्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी सहकार्य करत नसतील, ज्या उमेदवारांना निवडणूक प्रक्रियेमध्ये घोळ आहे असे वाटते, त्या मतदारसंघातील उमेदवाराने पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवावी, मशीन ताब्यात घेण्यास पोलिसांना सांगावे. पोलीस प्रशासन तात्काळ तक्रार दाखल करून मशीन ताब्यात घेत नसतील तर पराभूत उमेदवारांनी तातडीने प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात खाजगी याचिका दाखल करा. निवडणूक संबंधित सर्व शासकीय अधिकारी व ईव्हीएम मशीन कंपनीचे मालक यांना गुन्हेगारी कटासाठी आरोपी बनवा... अशा पद्धतीने महाराष्ट्रात जेथे जेथे घोळ आहे तेथे तेथे तात्काळ पोलीस केस दाखल करा , अन्यथा न्यायालयात खाजगी खटला दाखल करा. ईव्हीएम मशीनची न्यायालयात योग्य पडताळणी होईल, कट कारस्थान घडलेलं जनतेसमोर येईल , कट कारस्थान घडवून पराभूत केलेल्या उमेदवारांना न्याय मिळेल