Skip to main content

Posts

Showing posts from October, 2024

महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना विविध संस्थेचा पाठिंबा

  पनवेल (प्रतिनिधी) : बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ५२३, सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल आणि शिवाजी नगर युवक मित्र मंडळ पनवेल या संस्थांनी पनवेल विधानसभा मतदारसंघातील  महायुतीचे उमेदवार कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांना निवडणुकीसाठी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या पाठिंब्याचे पत्र त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे नुकताच सुपूर्द केले.  पनवेल नगरीचा विकासात कायापालट करणारे पनवेलचे यशस्वी शिल्पकार आमदार प्रशांत ठाकूर हे बौद्ध समाजाला सन्मानाने वागणूक देतात तसेच तळागाळातील कार्यकर्त्याला महत्वाची जबाबदारी देत असतात. त्यामुळे बौद्धजन पंचायत समिती शाखा क्रमांक ५२३, सिद्धांत सामाजिक शैक्षणिक कला क्रीडा व सांस्कृतिक संस्था पनवेल आणि शिवाजी नगर युवक मित्र मंडळ आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे या पाठिंबा पत्रात नमूद करण्यात आले आहे. 

जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रितम म्हात्रे यांनी उरणमधुन भरला उमेदवारी अर्ज

  उरण :  शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेते, पनवेल महानगर पालिकेचे विरोधी पक्ष नेते प्रीतम जनार्दन म्हात्रे यांनी आपल्या असंख्य पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जासई येथे निवडणूक अधिकारी यांच्याकडे उमेदवारी अर्ज भरला. उरण विधानसभा मतदारसंघातून महावीकास आघाडीचा घटक पक्ष म्हणून वरिष्ठांच्या आदेशाने शेतकरी कामगार पक्षातर्फे प्रीतम म्हात्रे यांनी अर्ज भरला यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते,महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.         निवडणूक अर्ज सादर करण्याचा शेवटचा दिवस असल्याने कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. उरण तालुक्यातील जासई येथे दि. बा.पाटील हायस्कूल जवळ मोकळ्या मैदानात शेतकरी कामगार पक्षाची भव्य दिव्य अशी सभा झाली. या सभेत विविध मान्यवरांची भाषणे झाली. यावेळी शेतकरी कामगार पक्षाचे जेष्ठ नेते जे. एम. म्हात्रे,जिल्हा चिटणीस आस्वाद पाटील, जेष्ठ नेते काका पाटील, माजी सभापती नरेश घरत, उरण तालुका चिटणीस विकास नाईक,उरण विधानसभा अध्यक्ष रमाकांत म्हात्रे,महिला तालुका अध्यक्ष सीमा घरत, शहर अध्यक्ष शेखर पाटील, शहर युवा अध्यक्ष कुंदन पाटील,

शेकापचे प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्त्यांचा शेतकरी कामगार पक्षात प्रवेश

  पनवेल:  शेतकरी कामगार पक्षाचे युवा नेतृत्व प्रीतम म्हात्रे यांच्या नेतृत्वावर प्रभावित होऊन बीजेपी आणि इतर पक्षातील कार्यकर्त्यांनी शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला. यावेळी त्यांचे प्रीतम म्हात्रे आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांकडून स्वागत करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नारायण शेठ घरत, जितेंद्र म्हात्रे, गुरुनाथ गायकर, राम भोईर, जगदीश पवार, रामेश्वर आंग्रे, अनिल घरत यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.       शेकापचे प्रीतम जनार्दन म्हात्रे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक जण बीजेपी आणि इतर पक्षातून शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर पक्ष प्रवेश करत आहेत. शेकापमध्ये पक्ष प्रवेशाचा ओघ वाढत चालला आहे. सोनारी गावातील शेकापमध्ये प्रवेश केलेल्या काही जणांना नोकरीवरून काढून टाकण्यात आले. मात्र या तरुणांनी घाबरून जाण्याचे कारण नाही, ज्यांना नोकरीवरून काढले आहे त्यांना नोकरीला लावण्याचे काम मी करणार असल्याचे प्रीतम म्हात्रे यांनी सांगितले. घारापुरी येथील निकेतन घरत आणि रोहन पाटील या भाजपच्या कार्यकर्त्यांनी शेकाप मध्ये प्रवेश केला. प्रदीप तुंगारे, गणेश भोईर, विकास मोरे यां