Skip to main content

Posts

Showing posts from April, 2024

रहस्यमय ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा झकासवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर!

  मुंबई (प्रतिनिधी): प्रेमकथा, इच्छा पूर्ण करणारी जादुची वस्तू, दमदार कथानकाला असलेली कसदार अभिनयाची जोड, अनोखा विषय आणि त्याची साजेशी मांडणी अशा अनेक गोष्टींचा सुंदर मिलाफ असणाऱ्या ‘प्रीत अधुरी’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर २६ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे. चित्रपटाचं कथानक एका अशा वस्तूच्या भोवती फिरतं, जी व्यक्तीच्या तीन इच्छा पूर्ण करू शकते! नायकच्या घरी ती वस्तू येते तेव्हा त्याच्यासाठी आकाश ठेंगणं होतं. आता नायक आणि नायिका या वस्तूचा वापर करून नेमकं काय मागतात आणि त्यातून पुढे कशा घडामोडी घडत जातात, हे चित्रपटात कळणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन जिल्हा परिषद शाळेत पेशाने शिक्षिका असणाऱ्या प्रियांका यांनी केलं असून प्रवीण यशवंत आणि प्रीया दुबे या नव्या जोडीच्या भन्नाट केमिस्ट्रीसोबत संजय खापरे, मिलिंद दास्ताने, अरुण नलावडे, शमा निनावे आणि कमलेश सावंत या दिग्गज कलाकारांनी चित्रपटात महत्त्वाच्या भूमिका बजावल्या आहेत. “गूढ आणि रहस्यमय कथा नेहमीच प्रेक्षकांना खास आकर्षित करतात, म्हणूनच अशा विषयांवर ‘प्रीत अधुरी’ सारखे खास चित्रपट प्रदर्शित करून रसिकांचं झ

साऊथच्या ‘जेलर’ चित्रपटाचा अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर

  मुंबई (प्रतिनिधी): गुन्हेगाराला सुधारण्याची संधी मिळाली तर गुन्हेगाराच्या आयुष्यात काय बदल घडून येऊ शकतो, या विषयावर आधारीत ‘जेलर’ चित्रपटाचा ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर १९ एप्रिल २०२४ रोजी वर्ल्ड डिजिटल प्रीमियर होणार आहे.   जेलर शांताराम याने सरकारला एक प्रस्ताव सादर केला आहे. ज्यात तो पाच गुन्हेगारांची निवड करेल. त्यांना एका ओसाड ठिकाणी घेऊन जाईल आणि त्या ओसाड जमिनीला हिरव्यागार शेतीत रूपांतर करून गुन्हेगारांना एका नव्या आयुष्याची सुरुवात करून देईल. सरकार हा प्रस्ताव मंजूर करते, परंतु जर गुन्हेगारांनी कोणताही गुन्हा केला तर शांतारामला आपली नोकरी सोडून तुरुंगात जावं लागेल अशी अट घालते. जेलर शांतरामचा गुन्हेगारांना सुधारण्याचा प्रयत्न यशस्वी होईल का, हे चित्रपटात पहायला मिळणार आहे.   “मराठी रसिक प्रेक्षक आजवरच्या प्रत्येक चित्रपटाला भरभरून प्रतिसाद देत आहेत, याचा अर्थ त्यांना अल्ट्रा झकासचे चित्रपट खूप आवडत आहेत. प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी जेलर सारखा आणखी एक जबरदस्त दाक्षिणात्य चित्रपट प्रदर्शित करताना अत्यंत आनंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच

लहान मुलांना धाडस आणि जिद्दीचं बाळकडू देणाऱ्या अॅनिमेटेड ‘बुनी बियर्स' चित्रपटाचे पोस्टर लॉंच

  Shenzhen, China *शेंझेन, चीन* (मनोरंजन प्रतिनिधी) : कोवळ्या वयात असणाऱ्या मुलांच्या अंगी चांगल्या संस्कारांची जर पेरणी झाली, तर मुलं मोठी होऊन नक्कीच चांगल्या वळणावर आयुष्य जगू शकतात. मुलांमध्ये संस्कारांची उत्तम पेरणी ही आई उत्तम करते असते, म्हणूनच जागतिक ‘मदर्स डे’चं निमित्त साधून ‘बुनी बियर्स’ या लोकप्रिय अॅनिमेटेड चित्रपटाच्या मालिकेचा पुढचा भाग ‘बुनी बियर्स गारडियन्स कोड’ हा १० मे २०२४ रोजी भारतभर चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रस्तुत ‘बुनी बियर्स गारडियन्स कोड’ या चित्रपटाचा नुकतेच पोस्टर लॉंच झाले असून सर्व सोशल मिडियावर प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. चित्रपट इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. पोस्टरमध्ये असणाऱ्या धमाल पात्रांना बघितल्यावर चित्रपटात धमाकेदार कथा असून धमाल मजा येणार असल्याचे दिसत आहे. चित्रपटाची कथा आणि यातील प्रसंग भारतातल्या चिमुलकल्यांसोबतच इतर सर्व रसिक प्रेक्षकांचं मन जिंकून घेणार असल्याचं दिसत आहे. “मदर्स डेचं निमित्त साधून बालकांना जगण्याची चांगली शिकवण देणारा चित्रपट ‘बुनी बियर्स’ प्रदर्शित करता