Skip to main content

Posts

Showing posts from February, 2024

माथाडी कायदा मोडीत काढणारे विधेयक व कामगार विरोधी जीआर मागे घेण्याबद्दल माथाडी कायदा बचाव कृती समितीच्यावतिने दि. २६ फेब्रुवारी सकाळी ९:०० वाजल्यापासून आझाद मैदान येथे पदाधिकारी, कामगार-कार्यकर्त्यांचे आमरण उपोषण!

  ९४ वर्षीय जेष्ठ समाजसेवक-कामगार नेते डॉ. बाबा आढाव व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील, आमदार शशिकांत शिंदे आझाद मैदान येथे आमरण उपोषणाला बसणार! मुंबई, दि.२४:- माथाडी अधिनियम, १९६९ सुधारणा विधेयक क्रमांक ३४ हे माथाडी कायदा संपुष्टात आणणारे आणि सुमारे ८०% माथाडी कामगारांना बेरोजगार करणारे असल्याने ते मागे घ्यावे आणि शासनाच्या पणन विभागाने काढलेले दि.१६ जानेवारी, २०२४ चे परिपत्रक मागे घ्यावे तसेच माथाडी कामगारांच्या इतर न्याय्य प्रश्नांची सोडवणुक होण्यासाठी तातडीने मा. मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली उपमख्यमंत्री गृह व वित्त, कामगार मंत्री, कामगार, पणन, गृह विभागाचे अधिकारी यांची माथाडी कायदा बचाव कृती समितीबरोबर संयुक्त बैठक आयोजित करावी या मागणीसाठी महाराष्ट्रातील तमाम माथाडी कामगारांचे प्रतिनिधीत्व करणारे प्रमुख माथाडी कामगार संघटनांचे नेते व कार्यकर्ते दि.२६ फेब्रुवारी सकाळी ९:०० वाजल्यापासून आझाद मैदान, मुंबई येथे आमरण उपोषण आंदोलन करणार आहेत. जेष्ठ समाजसेवक - जेष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव व माजी आमदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील यांच्या अध्यक्षतेखालील राज्य स्तरीय माथाडी कायदा

व्हॅलेन्टाईन्स डे' विशेष रोमँटिक चित्रपट ‘एक ती’ 'अल्ट्रा झकास मराठी ओटीटीवर!*

महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांचं फेब्रुवारीच्या गुलाबी थंडीत उबदार मनोरंजन करण्यासाठी ‘एक ती’ चित्रपटाचा 'व्हॅलेन्टाईन्स डे'चे औचित्यसाधून ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर वर्ल्ड डिजिटल प्रीमियर करण्यात आला. या चित्रपटाचे दिग्दर्शन अमर सुनील पारखे यांनी केले असून चित्रपटात सुप्रसिद्ध अभिनेते विजय कदम, अनिकेत केळकर तसेच शेषपाल गणवीर, हर्ष गावडे आणि रूपाली जाधव हे नवोदित कलाकार चित्रपटात हटक्या भूमिकेत ओटीटी प्रेक्षकांचे बेमालूम मनोरंजन करीत आहेत.         व्यक्ती आवडणं. प्रेम व्यक्त करणं. प्रेमात बेधुंद होणं. वाट्याला विरह येणं. हे सगळं या चित्रपटात पहायला मिळणार असून या सर्व भावनांना आणखी ठळक करत, मनाचा ठाव घेणारी गाणी प्रेक्षकांना हळवं करीत आहेत. कष्टाळू आणि जबाबदार युवक ते निधीच्या प्रेमात वेडा झालेल्या विनयचा वेड्यांच्या इस्पितळात जाण्यापर्यंतचा प्रवास चित्रपटात पहायला मिळणार आहे.        “प्रेमाने जग जिंकण्याएवढी ताकत असते असं म्हणतात, अशाच प्रेमातून आजच्या युवकांना आयुष्यातील एक प्रेरणादायी धडा शिकवणारा चित्रपट ‘एक ती’ प्रदर्शित करताना मन हर्षित होत आहे. अशा प्रकारचे दर्जेदार चि