Skip to main content

Posts

Showing posts from January, 2024

घराणेशाहीतला सत्तासंघर्ष टिपणाऱ्या 'लोकशाही' चित्रपटाचे पोस्टर लाँच

वारसा आपल्या भारत भूमीला थेट प्राचीन महाभारतापासून लाभलेला आहे.  घराणेशाहीतला हा सत्तासंघर्ष नेमका मिळालेला लाभ की शास्वत शाप हा प्रश्न उपस्थित करणारा सुशीलकुमार अग्रवाल निर्मित 'लोकशाही' या चित्रपटाच्या पोस्टरवरून प्रकर्षाने जाणवत आहे. चार दशकांहून अधिक भारताच्या सिनेसृष्टीत आपला झेंडा मानाने उंचावून फडकवत आलेली 'अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा. लिमिटेड', 'लोकशाही' चित्रपट प्रस्तुत करत आहे.नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'लोकशाही'च्या दृकश्राव्य गतिशिल शीर्षक पोस्टरमधून प्रेक्षकांच्या मनामनात उत्सुकता निर्माण जागी झाली होती. १५ जानेवारी २०२४ रोजी मकर संक्रांतीचे औचित्य साधून प्रदर्शित झालेल्या चित्रपटाच्या मुख्य पोस्टरने आता प्रेक्षकांच्या मनात उत्सुकतेबरोबरच विलक्षण प्रश्नांची ठिणगी पेटवली आहे. पोस्टरमध्ये सुप्रसिद्ध अभिनेते मोहन आगाशे विचारमग्न गंभीर अशा अवस्थेत असून समीर धर्माधिकारी, तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले आणि मराठी सिनेसृष्टीत नावाजलेला अमराठी अभिनेता अंकित मोहन हात जोडून लाखोंच्या संख्येत असणाऱ्या जनतेसमोर काहीतरी आव्हान करत असल्याचे दिसत

लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे ‘लोकशाही’ चित्रपटाचे शीर्षक पोस्टर लॉंच

शाळेत असताना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात सर्वांनीच शिकलेली एक महत्वपूर्ण ओळ म्हणजे ‘लोकांचे लोकांनी लोकांसाठी चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही.’ याच आशयाची ओळ असलेला आणि गूढ आकर्षण निर्माण करणारा अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड प्रस्तुत ‘लोकशाही’ या मराठी चित्रपटाचा अनोखा गतिशील शीर्षक पोस्टर नुकताच सर्व सोशल मिडियावर प्रदर्शित होऊन महाराष्ट्रभर अत्यंत वेगाने पसरत आहे.          सुशीलकुमार अग्रवाल निर्मित आणि संजय अमर दिग्दर्शित ‘लोकशाही’ चित्रपट लवकरच संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून अंगावर शहारे आणणाऱ्या चित्रपटाच्या दृकश्राव्य शीर्षकाने संपूर्ण महाराष्ट्रातील रसिक प्रेक्षकांची उत्सुकता ताणली आहे. पोस्टरमध्ये उंच इमारती आणि त्यांना लागूनच असणारे झोपडपट्टी दिसत आहेत. पांढरपेशी भांडवलदारांनी तयार केलेलं स्वत:चं अलिशान  शिखर आणि भांडवलदारांच्या भागीदारीत तेवढ्याच हिस्याचे पात्र असणारे झोपडपट्टीत राहणाऱ्या वंचित लोकांचे कदाचित ते प्रतीक असल्याचे दिसत आहे. तसेच लालभडक धुकट वातावरण आणि चित्रपटाचे नाव, एकूणच चित्रपट राजकारणाशी संबंधित संघर्षाला चिन्हांकित करत असल्या

विक्रोळीत यशोदीप फाऊंडेशन संस्थेमार्फत संगीतमय श्रीमद् भागवत कथा

  विक्रोळी : यशोदीप फाऊंडेशन संस्थेमार्फत  श्री गणेश मैदान, कन्नमवार नगर-२ येथे संगीतमय श्रीमद् भागवत कथाचे आयोजन २४ ते ३० डिसेंबर २०२३ या रोजी केले होते या कार्यक्रमात ह.भ.प. गणेश महाराज शेटे (अकोला) यांनी भागवत पुराणातील अनेक कथा सांगून त्यातील काही प्रसंग पात्ररूपी दृष्यांसहित सादर करून उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले दरवर्षीप्रमाणेच कार्यक्रमाच्या अखेरच्या दिवशी संस्थेतर्फे विनामूल्य वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले गेले. या शिबिरात नागरिकांची रक्त तपासणी, दंत तपासणी, हाडांचा ठिसूळपणा व इतर अनेक तपासण्या करण्यात येऊन निवडक औषधे विनामूल्य देण्यात आली. याप्रसंगी पालिकेच्या डॉक्टरांनी क्षयरोगाची लक्षणे, उपचार, सरकारी मदतीची माहिती नागरिकांना दिली.

बिंदास बारमध्ये छम छम सुरू, नऊ जणांविरोधात गुन्हा

  नवीन पनवेल : कोन येथील बिंदास बार आणि ऑर्केस्ट्रा मध्ये महिला सिंगर ग्राहकां सोबत अंगविक्षेप करून बीभत्स वर्तन करताना मिळून आल्या. याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी बारचे मॅनेजर, पुरुष वेटर आणि महिलांविरोधात गुन्हा दाखल केला.           पनवेल परिसरातील लेडीज बारमुळे पनवेलचे नाव यापूर्वीच बदनाम झालेले आहे. अनेकदा पोलिसांच्या कारवाया होत असल्या तरी देखील बार चालक आणि मालक कारवायांना घाबरत नसल्याचे दिसत आहे. बारचे परवाने रद्द करून देखील या ठिकाणच्या बारमध्ये अनेकदा अश्लीलता पहावयास मिळते. नवीन वर्षाच्या पहिल्याच रात्री पनवेल तालुका पोलिसांनी बिंदास बार अँड ऑर्केस्ट्रावर कारवाई केली. हॉटेल बिंदास बार अँड ऑर्केस्ट्रा येथे ग्राहकांच्या मनोरंजनाकरता ऑर्केस्ट्रा वरील संगीताच्या तालावर अंग प्रदर्शन आणि अश्लील हावभाव सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला आणि त्या ठिकाणी म्युझिक च्या तालावर सार्वजनिक रित्या गैरवर्तनशील हावभाव कृत्य सुरू असल्याचे दिसून आले. एक जानेवारी रोजी अडीचच्या सुमारास सहा महिला सिंगर यांनी भडक वेशभूषा करून माइक वर गाणे गाऊन ग्राहकांशी ल

साप्ताहिक रायगड पनवेलच्या कार्यालयाचे उदघाटन उत्साहात संपन्न

  पनवेल दि.०४(वार्ताहर): आपल्या आक्रमक बातम्यांमुळे रायगड जिल्ह्यात लोकप्रिय झालेल्या साप्ताहिक रायगड पनवेलच्या कार्यालयाचे उदघाटन नवीन पनवेल वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.            या वेळी आदई-नेवाळी  ग्रामपंचायतीचे सरपंच रमाकांत गरुडे, ग्रामपंचायत पाली देवद सुकापूरचे भाजप अध्यक्ष  राजेश पाटील, पत्रकार संजय कदम, रसायनी टाइम्सचे संपादक अनिल भोळे, रायगड पनवेलचे उपसंपादक मनोहर पाटील, साप्ताहिक रायगड पनवेलचे प्रतिनिधी उमेश पाटील, सुरेश कथारा, साप्ताहिक वार्तांकनचे संपादक संतोष सुतार, अँटी करपशन महाराष्ट्र अध्यक्ष विद्यासागर ठाकूर, एएचएफ प्रशासकीय आणि उपक्रम संचालक महेश भडके, दिपेश साळसकर, शिवम केळकर (पुणे जिल्हा उपक्रम व्यवस्थापन अधिकारी), अग्निशमन दलाचे संदीप गायकवाड, कृष्णा गोसावी आदी उपस्थित होते. यावेळी साप्ताहिक रायगड पनवेलचे संपादक संतोष भगत, साप्ताहिक रायगड पनवेलच्या मालक-मुद्रक-प्रकाशक सुलोचना भगत, साक्षी भगत यांनी उपस्थितांचे स्वागत केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सनित म्हात्रे, हेमांगी थळी, सुषमा मोरे यांनी मेहनत घेतली.

पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती व प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट च्या वतीने निवारा नसलेल्याना ब्लॅंकेट वाटप

  पनवेल /प्रतिनिधी : सध्या थंडी ची लाट येऊ लागली आहे ,ज्यांना निवारा नाही असे बेघर नागरिक रस्त्यावर झोपताना तंडीत कुडकुडकत असतात अशा गरजू गरीब नागरिकांना   पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे  आणि श्री प्रल्हादराय  झुलेलाल  ट्रस्ट चे अध्यक्ष ऍड  मनोहर सचदेव  यांच्या संकल्पनेतून  कामोठे स्टॉप ,खांदेश्वर रेल्वे स्थानक ,पनवेल बस डेपो समोरील रस्त्यावर .फुटपाथ वर झोपणाऱ्या गोर गरीब नागरिकांना मोट ब्लॅंकेट चे वाटप करण्यात आले . पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती आणि श्री प्रल्हादराय झुलेला ट्रस्ट विविध सामाजिक उपक्रम वराशबाहेर राबवत असते त्यातील हा उपक्रम गेली पाच वर्षे सातत्याने थंडीच्या काळात  आयोजिला जातो यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती चे अध्यक्ष निलेश सोनावणे ,उपाध्यक्ष गौरव जहागीरदार ,सचिव शंकर वायदंडे ,सहसचिव  तुळशीराम बोरीले ,संघटक रवींद्र गायकवाड  उपस्थित होते.

तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, शर्वरी लोहकरे, संजय खापरे, सुहास शिरसाट आणि वर्षा उसगांवकरचा ‘ओली की सुकी’ चित्रपट ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर

  मुंबई: प्रत्येक नवा दिवस आपल्यासोबत एक नवीन संधी घेऊन येतो, अशाच एका प्रेरणादायी विषयावर आधारित 'ओली की सुकी' चित्रपट ४ जानेवारी २०२४ रोजी ‘अल्ट्रा झकास’ मराठी ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन ‘आनंद दिलीप गोखले’ यांनी केले असून चित्रपटात तेजश्री प्रधान, भार्गवी चिरमुले, शर्वरी लोहकरे, संजय खापरे, सुहास शिरसाट आणि वर्षा उसगांवकर हे सुप्रसिद्ध अभिनेते दिसणार आहेत.      चित्रपटाची कथा झोपडपट्टी आणि त्यातील आयुष्यात भरकटलेल्या मुलांभोवती फिरते. झोपडपट्टीतील टुकार मुलांच्या दोन गटांत नेहमी विनाकारण भांडणे होत राहतात. ही मुले वाईट वळणांच्या एवढ्या अधीन जातात की चोरी करण्यापर्यंत यांचे विचार पोहचतात. पण त्याचवेळी त्यांच्या आयुष्यात राधिकाताई येते, जी त्यांच्या संपूर्ण जीवनाला एक वेगळंच वळण देते. राधिकाताईने नेमकी अशी कोणती जादू या मुलांवर केली ते चित्रपटात पहायला मिळणार आहे.       “आयुष्यात अनेक अडचणी येतात पण आपण त्यांना सामोरे जाऊन यशाच्या दिशेने अविरत चालत रहायला हवं. अशा प्रेरणादायी आशयाचा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल याची खात्री वाटते.” असे