कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेचा या वर्षातील १५ वा पगारवाढीचा करार;ओल्ड मर्स्क कामगारांना ८००० रुपये पगारवाढ !
एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असतांना स्थानिक कामगारांची नोकरी साबूत ठेवणे व त्यांना वाढणाऱ्या महागाई नुसार पगारवाढ करून देणे हा सध्याच्या परीस्थितीत संघटनेची महत्वाची जबाबदारी आहे असे कामगार नेते महेंद्र घरत या प्रसंगी सांगितले.या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष -महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष -पि.के. रमण, सरचिटणीस- वैभव पाटील तर व्यवस्थापना तर्फे मर्स्कचे आय.आर.हेड योगेश ठाकूर,फ्युचर्झ स्टफिंगचे सि.ओ.ओ. चिराग जागड तसेच कामगार प्रतिनिधी दीपक पाटील, शरद तांडेल, जयवंत पाटील, नारायण पाटील उपस्थित होते.याप्रसंगी कामगारांनी कामगार नेते महेंद्रशेठ घरत व संघटनेचे आभार मानले. नवीन वर्षाच्या पूर्वसंधेला झालेल्या पगारवाढीमुळे कामगारांमधे आनंदाचे वातावरण आहे.
Comments
Post a Comment