लिब : सामाजिक बांधिलकीची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने गौरीशंकर डी फार्मसी लिंब महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष सन २०२३- २४ मध्ये राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे लिंब (कुंभारवाडा) येथे आयोजन करण्यात आले. श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दिनकर राजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य विजय राजे, समन्वयक प्रा. सारिका लोखंडे, गणेश घाडगे, लिंबचे महेश राजे, कृष्णात राजे, विजय राजे आदी प्रमुख उपस्थित होते. लिंब (कुंभारवाडा) येथे विद्यार्थ्यांनी श्रमदान करून परिसरातील नागरिकांना निरोगी आरोग्याचा मंत्र याबाबत प्रबोधन केले. स्वच्छता अभियान रॅलीचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले. श्रमसंस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. स्वाती पवार, प्रा. स्वप्नाली कदम, प्रा. शिवानी पोळ, महेश एरंडे, विनोद कदम, गणेश चव्हाण, धीरज यादव, अमोल शिंदे, वैभव जगताप, श्रीधर राजे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक यशस्वी कुलकर्णी हिने केले. आभार प्रदर्शन श्रुती खताळ हिने केले.
Comments
Post a Comment