खारघर(प्रतिनिधी) :- खारघर सेक्टर-१९ मधील काही सोसायटींच्या मागील भागात महापालिकेने वृक्ष लागवडीसाठी राखीव ठेवलेल्या मोकळ्या जागेवरती काही समाजकंटक अनधिकृत बांधकाम करीत होते,हे परिसरातील राज रेसिडेन्सी,पूजा रेसिडेंन्सी आणि रिजंन्सी क्रिस्टल येथील काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ खारघरमधील माजी नगरसेविका सौ.नेत्रा पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्या निदर्षनास ही बाब आणून दीली.
सौ.नेत्रा पाटील आणि किरण पाटील यांनी तात्काळ पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनास आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांना कळवीले आणि तात्काळ महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने निष्कासनाची कारवाई केली.याप्रसंगी वरील तीन्ही सोसायट्यांचे आबाल-वृद्ध व महिला मोठ्या संख्येने एकत्रित जमल्यामुळे हे शक्य झाले.सर्वांच्या एकजुटीने व प्रशासनाच्या सहकार्याने त्या ठिकाणी अनाधिकृत होणारे बांधकाम थांबवता आले.
रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सदर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले व वृक्ष संगोपनाची जबाबदारी देखील सोसायटीतील रहिवाशांनी घेतली. खारघर शहरातील अशा बऱ्याच ठिकाणी होणारे अतिक्रमण अथवा जागा अडकण्याचे प्रकार हे सिडको व पनवेल महानगरपालिका प्रशासनाने जागरूकतेने हाताळावेत व वेळीच अशा समाजकंटकांना रोखावे अशी मागणी सौ.नेत्रा पाटील यांनी केली आहे.
Comments
Post a Comment