Skip to main content

Posts

Showing posts from December, 2023

मांगुर माशाची विक्री, खांदेश्वर पोलिसांचा छापा

  नवीन पनवेल : देवद येथे मोकळ्या जागेत मांगुर माशांची विक्री करणाऱ्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.       देवद हद्दीतील पुष्प नारायण सोसायटी बिल्डींग नंबर 25 जवळील जागेत बंदी असलेल्या मांगुर माशाची विक्री होत असल्याची माहिती खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वपोनि सीबी लांडगे यांना मिळाली. त्यानुसार वपोनी लांडगे व पोलिसांचे पथक त्या ठिकाणी गेले. त्यांनी मांगुर मासे विक्री होत असलेल्या जागेवर छापा टाकला. यावेळी 511 किलो बंदी असलेले मांगुर मासे जप्त करण्यात आले व ते नष्ट करण्यात आले. परिसरात अशा प्रकारे कुठे बंदी असलेल्या मांगुर माशाची विक्री किंवा साठवणूक किंवा मांगुर माशाचे पालन केले जात असेल तर याची माहिती ताबडतोब 112 नंबर वर देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.या माश्याच्या सेवनामुळे कॅन्सर होण्याची संभावना असते. त्यामुळे हा मासा कोणीही खाऊ नये असे आवाहन करण्यात  आले आहे

कामगार नेते महेंद्र घरत यांच्या संघटनेचा या वर्षातील १५ वा पगारवाढीचा करार;ओल्ड मर्स्क कामगारांना ८००० रुपये पगारवाढ !

  उरण दि ३०(प्रतिनिधी)-कामगार नेते महेंद्र घरत यांच्या नेतृत्वातील न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटना हि कामगारांना न्याय देणारी रायगड व नवी मुंबई मधील एकमेव संघटना आहे. संघटनेच्या माध्यमातून सन २०२३ या वर्षातील १५ वा पगारवाढीचा करार आज शेलघर येथील कार्यालयात करण्यात आला. या करारनाम्यानुसार कामगारांना तीन वर्षांसाठी ८००० रुपये पगारवाढ, दोन रजा वाढ, ३ लाख रुपयांची मेडिक्लेम पॉलिसी,बोनसमधे दरवर्षी १५०० रुपयांची वाढ,तसेच LTA मधे २००० रुपयांची वाढ देण्याचे मान्य करण्यात आले आहे. कामगारांना एक वर्षाची फरकाची रक्कम थकबाकी पोटी मिळणार आहे.      एकीकडे बेरोजगारांची संख्या वाढत असतांना स्थानिक कामगारांची नोकरी साबूत ठेवणे व त्यांना वाढणाऱ्या महागाई नुसार पगारवाढ करून देणे हा सध्याच्या परीस्थितीत संघटनेची महत्वाची जबाबदारी आहे असे कामगार नेते महेंद्र घरत या प्रसंगी सांगितले.या करारनाम्याप्रसंगी संघटनेचे अध्यक्ष -महेंद्रशेठ घरत, कार्याध्यक्ष -पि.के. रमण, सरचिटणीस- वैभव पाटील तर व्यवस्थापना तर्फे मर्स्कचे आय.आर.हेड योगेश ठाकूर,फ्युचर्झ स्टफिंगचे सि.ओ.ओ. चिराग जागड तसेच कामगार प्रतिनिधी दीपक पा

पनवेल फेस्टिवल 2023 चे आयोजन;श्री.प्रितम म्हात्रे यांनी दिल्या कलाकारांना शुभेच्छा!

  पनवेल :    पनवेल मध्ये रोटरी क्लबच्या माध्यमातून गेली 26 वर्षे पनवेल फेस्टिवल चे आयोजन करण्यात येत आहे. "पनवेल फेस्टिवल 2023" पनवेल येथे सुरू झाले आहे. पनवेल महानगरपालिकेचे मा.विरोधी पक्षनेते श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी फेस्टिवल ला भेट दिली. फेस्टिवल मध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले होते ते पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. कलाश्रुती अकॅडमी च्या माध्यमातून  पनवेलच्या वृषाली पाटकर यांच्या नियोजनात पनवेल मधील कलाकारांनी  "धरोहर" पहचान भारत के इतिहास की या नृत्यअविष्काराचे सुंदररीत्या सादरीकरण केले. यात भारतातील विविधतेने नटलेल्या आपल्या रूढी, परंपरा आणि एकात्मता आपल्या कलेतून उत्तम प्रकारे सादर केले. फेस्टिवल मध्ये शेकडो प्रकारचे स्टॉल आहेत तेथील विविध स्टॉल्सला त्यांनी भेट दिली. त्या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या वस्तू आणि चविष्ट खाद्यपदार्थ यांचा त्यांनी आस्वाद घेतला.     यावेळी त्यांच्यासोबत शेकाप जिल्हाचिटणीस श्री.गणेश कडू, पनवेल रोटरी फेस्टिव्हल 2023 चे चेअरमन श्री शिरीष पिंपळकर, रोटरी क्लब ऑफ पनवेल चे पी.आर.   ड

डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा सुपरहिट चित्रपट ‘भिंगरी’ ‘अल्ट्रा झकास’ ओटीटीवर!

  मुंबई: मराठी सिनेसृष्टीच्या चंदेरी दुनियेत आपलं नाव दिमाखात गाजवून प्रेक्षकांचं मन भारावून टाकणारे अभिनेते डॉ. श्रीराम लागू आणि निळू फुले यांचा मराठी चित्रपटाच्या  सुवर्णकाळातील ‘भिंगरी’ चित्रपट २८ डिसेंबर २०२३ रोजी ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर येत आहे. चित्रपटात रमेश देव, सुषमा शिरोमणी, विजू खोटे आणि विक्रम गोखले हे सुप्रसिद्ध अभिनेते असून उषा मंगेशकर यांच्या आवाजातील गाणी अनुभवून प्रेक्षक जुन्या आठवणींमध्ये गुंग होणार आहेत.             चित्रपटाचे दिग्दर्शन मराठी सिनेसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक दत्ता केशव यांनी केले असून कथा अभिनेत्री सुषमा शिरोमणी यांनी स्वतः लिहिली आहे. दौलतराव पाटील आणि सदा जिवाभावाचे मित्र असून सदाच्या पत्नीसोबत दौलतने संबंध ठेवल्याचे सदाला कळते. तेव्हा संतप्त झालेला सदा दौलतचा बदला घेण्याच्या नादात काय काय करतो हे चित्रटातून कळणार आहे. “प्रेक्षकांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यासाठी आमच्या संग्रहातील सुवर्ण चित्रपटांना अल्ट्रा झकासच्या माध्यमातून सादर करत असल्याचा आम्हाला अत्यंत आनंद होत आहे.” असे अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रा.लिमिटेडचे सी.ई.ओ. श्री

भागीदारीत मराठी चित्रपट निर्मितीसाठी राम पब्लिसिटीची अभिनव संकल्पना!

  मुंबई : ‘राम पब्लिसिटी’ ही नाट्य, संगीत, चित्रपट, मालिका, ओटीटी क्षेत्रातील मान्यता प्राप्त जनसंपर्क व्यवस्थापन संस्था आहे. गेली २२ वर्षे ही संस्था मनोरंजन क्षेत्रात धडाडीने कार्यरत असून शेकडो मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धी जनसंपर्कासोबतच 'खंडोबाच्या नावानं', 'सैल', 'दशक्रिया' आणि  बंदिशाळा या चित्रपटांच्या कार्यकारी निर्मितीचे कामही केले आहे.          'राम पब्लिसिटी'ने एका नव्या मल्टीस्टारर व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती सुरु केली असून या चित्रपटात आर्थिक आर्थिक गुंतवणूक करून भागीदारी व्यावसायिक होण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. अनेक व्यावसायिकांची मराठी चित्रपट निर्मिती करण्याची इच्छा असते, परंतु  या व्यवसायाचे ज्ञान नसल्याने ते चित्रपट निर्मितीत उद्योगात येण्याचे टाळतात. अश्या निर्मात्यांना त्यांचे दर्जेदार चित्रपट निर्मितीचे स्वप्न साकार करता येणार आहे. भागीदारीमध्ये अश्या व्यावसायिकांना राम पब्लिसिटीसोबत मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी विश्वसनीय जाणकार दिग्गज कलाकार-तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट निर्मातीची अभूतपूर्व संधी प्राप्त होणा

गौरीशंकर डी फार्मसीचे लिंबमध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिर संपन्न

  लिब : सामाजिक बांधिलकीची भावना विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावी या हेतूने गौरीशंकर डी फार्मसी लिंब महाविद्यालयाने शैक्षणिक वर्ष सन २०२३- २४ मध्ये राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत विशेष श्रमसंस्कार शिबिराचे लिंब (कुंभारवाडा) येथे आयोजन करण्यात आले. श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन सामाजिक कार्यकर्ते दिनकर राजे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे जनसंपर्क अधिकारी श्रीरंग काटेकर, प्राचार्य विजय राजे, समन्वयक प्रा. सारिका लोखंडे, गणेश घाडगे, लिंबचे महेश राजे, कृष्णात राजे, विजय राजे आदी प्रमुख उपस्थित होते. लिंब (कुंभारवाडा) येथे विद्यार्थ्यांनी श्रमदान करून परिसरातील नागरिकांना निरोगी आरोग्याचा मंत्र याबाबत प्रबोधन केले. स्वच्छता अभियान रॅलीचे आयोजन या निमित्ताने करण्यात आले. ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या कार्याचे कौतुक केले. श्रमसंस्कार शिबिर यशस्वी करण्यासाठी प्रा. स्वाती पवार, प्रा. स्वप्नाली कदम, प्रा. शिवानी पोळ, महेश एरंडे, विनोद कदम, गणेश चव्हाण, धीरज यादव, अमोल शिंदे, वैभव जगताप, श्रीधर राजे यांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक यशस्वी कुलकर्णी हिने केले. आभार प्रदर्शन श्रुती खताळ ह

खारघरमधील आरक्षित ट्री बेल्टवरील अतिक्रमण मा.नगरसेविका नेत्रा पाटील यांच्या सतर्कतेमुळे हटवीले

  खारघर(प्रतिनिधी) :- खारघर सेक्टर-१९ मधील काही सोसायटींच्या मागील भागात महापालिकेने वृक्ष लागवडीसाठी राखीव ठेवलेल्या मोकळ्या जागेवरती काही समाजकंटक अनधिकृत बांधकाम करीत होते,हे परिसरातील राज रेसिडेन्सी,पूजा रेसिडेंन्सी आणि रिजंन्सी क्रिस्टल येथील काही जागरूक नागरिकांच्या निदर्शनास आले त्यांनी तात्काळ खारघरमधील माजी नगरसेविका सौ.नेत्रा पाटील आणि सामाजिक कार्यकर्ते किरण पाटील यांच्या निदर्षनास ही बाब आणून दीली. सौ.नेत्रा पाटील आणि किरण पाटील यांनी तात्काळ पनवेल महानगरपालिकेच्या प्रशासनास आणि प्रभाग अधिकारी जितेंद्र मढवी यांना कळवीले आणि तात्काळ महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने निष्कासनाची कारवाई केली.याप्रसंगी वरील तीन्ही सोसायट्यांचे आबाल-वृद्ध व महिला मोठ्या संख्येने एकत्रित जमल्यामुळे हे शक्य झाले.सर्वांच्या एकजुटीने व प्रशासनाच्या सहकार्याने त्या ठिकाणी अनाधिकृत होणारे बांधकाम थांबवता आले.         रविवार दिनांक 17 डिसेंबर रोजी सदर ठिकाणी वृक्षारोपण करण्यात आले व वृक्ष संगोपनाची जबाबदारी देखील सोसायटीतील रहिवाशांनी घेतली. खारघर शहरातील अशा बऱ्याच ठिकाणी होणारे अतिक्रमण अथवा जागा

अल्ट्रा झकास’च्या ‘कॅफे कॉमेडी’ स्टँड अप शोला रसिकांचा प्रचंड प्रतिसाद

  मुंबई: महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वसलेल्या विविध मराठी बोलीतील विविध गोष्टी आपल्या विनोदी ढंगाने सादर करणाऱ्या उत्कृष्ट कलाकारांची फौज ‘कॅफे कॉमेडी’ या ‘अल्ट्रा झकास’च्या स्टँड अप शोमध्ये दाखल झाली आहे. ‘कॅफे कॉमेडी’ हा ओटीटी माध्यमावर येणारा पहिला स्टँड अप शो महाराष्ट्रातल्या घराघरात पोहचून रसिक प्रेक्षकांचं मन दिवसेंदिवस जिंकून घेत आहे.        ‘कॅफे कॉमेडी’ स्टँड अप शो आशिष पाथरे यांनी निर्मित केले असून अमोल जाधव हे दिग्दर्शन करत आहेत. शोमध्ये संदीप गायकवाड, मंदार मांडवकर, आकांक्षा अशोक, किमया मयेकर, रोहन कोतेकर, केतन साळवी, सचिन सकपाळ आणि रामदास टेकाळे हे कलाकार आपल्या विनोदी कौशल्याने प्रेक्षकांचं जोरदार मनोरंजन करत आहेत. या कलाकारांसोबतच आणखी तगडे कलाकार शोमध्ये आपले कौशल्य दाखवण्यासाठी येणार आहेत. तसेच मराठमोळी अभिनेत्री काजल केशव आपल्या खास सूत्रसंचालनाने या शोची खास आकर्षण बनली आहे.        कॅफे कॉमेडी’ हा शो प्रेक्षकांचं खास मनोरंजन करतो आहेच पण त्याचबरोबर शोच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात दडलेल्या नव्या कलाकारांना मिळत असलेला प्रेक्षकांचा प्रतिसाद पाहून आनंद

मराठी चित्रपटांना जागतिक गौरव मिळवून देणारा उमेश कुलकर्णी दिग्दर्शित 'वळू' अल्ट्रा झकासवर पहाण्याची संधी

 अतुल कुलकर्णी, डॉ. मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, गिरीश कुलकर्णी, नंदू माधव, अमृता सुभाष, वीणा जामकर, सतीश तारे, चंद्रकांत गोखले आणि निर्मिती सावंत यांच्या अफलातून भूमिका मुंबई: महाराष्ट्रातला एक अविस्मरणीय कथा आणि कथेतील मजेदार पात्र असणारा चित्रपट ‘वळू’ आता २२ डिसेंबर २०२३ पासून ‘अल्ट्रा झकास’ या मराठी ओटीटीवर पहायला मिळणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते ‘उमेश कुलकर्णी’ यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून 'रोटरडॅम', आशियाई, वॉर्सा, कार्लोवी वेरी, रेकजाविक -आइसलँड, ला रोशेल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव सह पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २००८ मध्ये ‘वळू’ चित्रपटास सर्वोत्तम दिग्दर्शन आणि सर्वोत्तम छायांकन असे पुरस्कार मिळाले आहेत.        कुसवडे गावात वर्षानुवर्षे चालत आलेल्या प्रथेनुसार गावकऱ्यांनी देवाला वाहिलेला ‘डुरक्या’ नावाचा वळू गावात धुमाकूळ घालतो. तेव्हा डुरक्याला पकडण्यासाठी गावातले सरपंच( डॉ. मोहन आगाशे)  फॉरेस्ट ऑफिसर स्वानंद गड्डमवारांना (अतुल कुलकर्णी) बोलावतात. डुरक्याला पकडण्याच्या या धुमाकुळात गावात काय काय धमाल घडते हे चित्रपटात पहायला मिळणार आहे. या चित्रप

भागीदारीत मराठी चित्रपट निर्मितीसाठी राम पब्लिसिटीची अभिनव संकल्पना!

  मुंबई : ‘राम पब्लिसिटी’ ही नाट्य, संगीत, चित्रपट, मालिका, ओटीटी क्षेत्रातील मान्यता प्राप्त जनसंपर्क व्यवस्थापन संस्था आहे. गेली २२ वर्षे ही संस्था मनोरंजन क्षेत्रात धडाडीने कार्यरत असून शेकडो मराठी चित्रपटांच्या प्रसिद्धी जनसंपर्कासोबतच 'खंडोबाच्या नावानं', 'सैल', 'दशक्रिया' आणि  बंदिशाळा या चित्रपटांच्या कार्यकारी निर्मितीचे कामही केले आहे.         'राम पब्लिसिटी'ने एका नव्या मल्टीस्टारर व्यावसायिक चित्रपटाची निर्मिती सुरु केली असून या चित्रपटात आर्थिक आर्थिक गुंतवणूक करून भागीदारी व्यावसायिक होण्याची नामी संधी उपलब्ध करून दिली आहे. अनेक व्यावसायिकांची मराठी चित्रपट निर्मिती करण्याची इच्छा असते, परंतु  या व्यवसायाचे ज्ञान नसल्याने ते चित्रपट निर्मितीत उद्योगात येण्याचे टाळतात. अश्या निर्मात्यांना त्यांचे दर्जेदार चित्रपट निर्मितीचे स्वप्न साकार करता येणार आहे. भागीदारीमध्ये अश्या व्यावसायिकांना राम पब्लिसिटीसोबत मराठी चित्रपट सृष्टीतील अनुभवी विश्वसनीय जाणकार दिग्गज कलाकार-तंत्रज्ञांच्या मार्गदर्शनाखाली चित्रपट निर्मातीची अभूतपूर्व संधी प्राप्त होणा

पनवेल परिसरात रात्रीच्या वेळेस वायु प्रदूषणाची समस्या-प्रितम म्हात्रे यांनी केली चौकशीची मागणी

  पनवेल :गेले काही दिवस पनवेल महानगरपालिका हद्दीमधील नवीन पनवेल, खांदा कॉलनी, तळोजा, कामोठे, कळंबोली आणि पनवेल या विभागात रात्रीच्या वेळेस केमिकल सदृश्य उग्र वास येतो. त्यामुळे श्वास घेण्यास त्रास होणे अशा प्रकारच्या ज्येष्ठ नागरिकांच्या तक्रारी येत आहेत. रात्री या सर्व परिसरात भरपूर प्रमाणात उग्र वास येत असतो त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये घबराट निर्माण झालेले आहे.         या विषयात बोलताना श्री.प्रितम जनार्दन म्हात्रे यांनी सांगितले की,  गेल्या तीन ते चार दिवसात अवेळी पडलेल्या पावसामुळे रात्रीच्या वेळी गैरफायदा घेऊन हवेत दूषित वायू सोडण्याचे प्रकार वाढले आहेत  सध्या आपल्या परिसरात इतर साथीचे रोगही डोके वर काढत आहेत. यापुढे अशा प्रकारच्या केमिकल्स सदृश्य वायुप्रदूषणामुळे श्वसनाचे आजाराचे प्रमाण वाढण्याची गंभीर समस्या निर्माण होऊ शकते.      या संदर्भात त्यांनी विभाग अधिकारी,महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ,पनवेल आणि पनवेल महानगरपालिकेला या गंभीर विषयात लक्ष देऊन ठोस पावले उचलून रात्रीच्या वेळी या येणाऱ्या वासाची चौकशी करून योग्य तो निर्णय त्वरित घ्यावा आणि दोषींवर कार्यवाही करावी अशा