उलवे : स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात लढून कामगारांनी मिळविलेले हक्क आणि अधिकार गमावण्याची वेळ आली असल्याचे मत इंटक या राष्ट्रीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेंद्र घरत यांनी रविवारी उलवे नोड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले .
न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेने पन्नास पेक्षा अधिक उपक्रमातील कामगारांना व्यवस्थापनाकडून जास्त पगारवाढीचे करार आणि उत्तम अनुदान देण्याचे उलवे येथील पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.यामध्ये नवीन नऊ युनिट हाती घेतली .पीएन रायटर बिजनेस सोलुशन महापे ९० हजार आणि गॅड लॉजिस्टिक्स ( पंजाब कॉनवेअर ) ७५०० ते १० हजार इत्यादी अनुदान ( बोनस ) देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची १२ हजारांहून अधिक सभासद संख्या आहे. त्यांच्या समस्या, वेतन करार आणि सोयी सुविधा पुरविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र सध्याच्या सरकारने कामगारांना मिळणाऱ्या सोयी सुविधा कमी करून मालक आणि भांडवलदार धार्जिण्या कायद्याची अंमलबजावणी करीत आहे. यामध्ये कामगारांना बाहेरील कामगार नेत्याना अटकाव करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे काही कालावधीसाठी रोजगार करार आदी कायदे हे कामगारांना त्यांच्या हक्कापासून दूर ठेवणारे असल्याने भविष्यात कामगार अडचणीत येणार असल्याचे मत कामगार नेते महेंद्र घरत यांनी व्यक्त केले.
राजकीय भाष्य करताना भविष्यात कोणतीही निवडणूक लढविणार नाही फक्त समाजसेवा करण्याचा इरादाही स्पष्ट केला. याप्रसंगी कामगार संघटनेचे कार्यध्यक्ष पी.के. रमण ,
सचिव वैभव पाटील,किरीट पाटील आदीजण उपस्थित होते .
Comments
Post a Comment