Skip to main content

Posts

Showing posts from November, 2023

मकरंद अनासपुरेंच्या ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात घालतोय धुमाकूळ

  मुंबई: अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची जोडी असणारा ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ चित्रपटाचा नुकताच पोस्टर लॉंच होऊन प्रेक्षकांमध्ये कमालीचा उत्साह पहायला मिळाला होता. चित्रपटाच्या विलक्षण पोस्टरनंतर २४ नोव्हेंबर २०२३ रोजी प्रत्येकाचं चित्त वेधून घेणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच झाला असून ट्रेलर संपूर्ण महाराष्ट्रात जोरदार धमाका उडवत आहे. छापा काटा’ चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी केली असून पटकथा आणि दिग्दर्शन संदीप मनोहर नवरे यांनी केली आहे. छायाचित्रण गौरव पोंक्षे, बिजनेस हेड (अल्ट्रा डिजिटल स्टुडिओ) अरविंद अग्रवाल, संकलक मीनल राकेश म्हादनाक, कार्यकारी निर्माता दर्शन चोथाणी, बिजनेस हेड (अल्ट्रा मराठी) श्याम मळेकर, क्रिएटिव्ह निर्माता रजत अग्रवाल आणि सोशल मिडिया अँड डिजिटल मार्केटिंग ब्रिन्दा अग्रवाल आहेत. ट्रेलरमध्ये करामती नाम्या एका श्रीमंत मुलीशी लग्नाचा करार करून धमाल विनोदी गोंधळ घालताना दिसत आहे. नाम्या म्हणजेच मकरंद

मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांची दमदार जोडी असणारा ‘छापा काटा’ चित्रपटाचा पोस्टर प्रसिद्ध

  मुंबई: महाराष्ट्राचे फेवरेट अभिनेते मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी नव्या कोऱ्या ‘छापा काटा’ चित्रपटातून धमाकेदार भूमिकेत येत आहेत. ‘अल्ट्रा मीडिया अँड एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेड’ प्रस्तुत ‘छापा काटा’ धमाल विनोदी चित्रपटाचा २१ नोव्हेंबर २०२३ रोजी दणक्यात पोस्टर लॉंच झाला असून रसिक प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. चित्रपट १५ डिसेंबर २०२३ रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून प्रेक्षकांना चित्रपटगृहात भन्नाट मनोरंजन अनुभवता येणार आहे.            ‘ढ लेकाचा’ ‘कुलस्वामिनी’ ‘बोल हरी बोल’ आणि ‘हिरा फेरी’ या सुपरहिट चित्रपटांनंतर श्री. सुशीलकुमार अग्रवाल यांनी ‘छापा काटा’ चित्रपटाची निर्मिती केली असून संदीप मनोहर नवरे यांनी पटकथा आणि दिग्दर्शन केले आहे. चित्रपटात मकरंद अनासपूरे आणि तेजस्विनी लोणारी यांच्यासोबत मोहन जोशी, अरुण नलावडे, ऋतुराज फडके, पंकज विष्णु, सुश्रृत मंकणी, रीना अग्रवाल आणि विजय पाटकर हे सुप्रसिद्ध अभिनेते प्रेक्षकांचं भरभरून मनोरंजन करणार आहेत. या सर्व अभिनेत्यांची झलक असणारा चित्रपटाचा पोस्टर चित्तवेधक असून प्रेक्षकांना जबदरस्त आकर्षित करत आहे.

सुपरहिट मराठी चित्रपटांची अल्ट्रा झकासवर जोरदार हजेरी!

 अशोक सराफ, सुबोध भावे, उपेंद्र लिमये, श्रेयस तळपदे, सई ताम्हणकर, मृण्मयी देशपांडे यांसह मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर अल्ट्रा झकासवर प्रेक्षकांच्या भेटीस मुंबई : मराठी सिनेसृष्टीतील नामवंत कलाकारांच्या दर्जेदार चित्रपटांची जत्रा 'अल्ट्रा झकास' या मराठी ओटीटीवर रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. अशोक सराफ आणि उपेंद्र लिमये यांचा समीर पाटील दिग्दर्शित 'शेंटीमेंटल', सुबोध भावे, सई ताम्हणकर आणि श्रेयस तळपदे यांचा राजीव पाटील दिग्दर्शित सुप्परहिट 'सनई चौघडे', मास्टर ब्लास्टर सचिनच्या आयुष्यावर आधारित जेम्स एर्स्काइन दिग्दर्शित 'सचिन अ बिलियन ड्रीम्स' आणि मृण्मयी देशपांडे, धर्मेंद्र गोहिल या सुप्रसिद्ध कलाकारांचा अंबरीश दरक दिग्दर्शित 'अनुराग' हे चित्रपट 'अल्ट्रा झकास'वर रसिक प्रेक्षकांचे जबरदस्त मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत.           शेंटीमेंटल'ची कथा चोरीला गेलेले दागिने पोलिसांना बिहारला पाठवते तर अनुरागची कथा पूर्णपणे आठवणींना उजाळा देत लेह लडाखमध्ये वसते. सनई चौघडे सईच्या वैवाहिक शोधाचा एक नवीन मार्ग असून सचिन अ बिलियन ड्रीम्स

मुख्यमंत्र्यांचे आदेशानुसार १७ नोव्हेंबरपासून मेट्रो नवी मुंबईच्या सेवेत

  पनवेल  : नागरिकांचे हित लक्षात घेऊन त्यांची होत असलेली गैरसोय टाळण्याकरिता महाराष्ट्राचे मा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार सिडकोतर्फे नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील बेलापूर ते पेंधर या मार्ग क्र. १ वर शुक्रवार, दि. १७ नोव्हेंबर २०२३ पासून औपचोरिकरित्या लोकार्पण सोहळा न करता मेट्रो प्रवासी सेवेचा प्रारंभ करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे नवी मुंबईकरांचे मेट्रो प्रवासाचे स्वप्न पूर्ण होणार आहे.         “बहुप्रतिक्षित नवी मुंबई मेट्रो १७ नोव्हेंबर २०२३ पासून नवी मुंबईकरांच्या भेटीला येत आहे. याबद्दल नवी मुंबईकरांचे हार्दिक अभिनंदन. नागरिकांची गैरसोय होऊ नये, यासाठी औपचारिक उद्घाटनाची वाट न बघता तातडीने मेट्रो सेवा सुरू करण्याचे निर्देश सिडकोला दिले होते. त्यानुसार १७ नोव्हेंबर २०२३ पासून मेट्रो सेवेला प्रारंभ होत आहे, याबद्दल सिडकोचे अभिनंदन आणि नवी मुंबईकरांना शुभेच्छा. मेट्रोद्वारे नवी मुंबई अंतर्गत उत्तम कनेक्टिव्हिटी निर्माण होणार आहे. संपूर्ण मुंबई महानगर प्रदेशामध्ये मेट्रो मार्गांचे जाळे निर्माण करण्याचे शासनाचे उद्दिष्ट असून नवी मुंबईमध्ये सिडकोतर्फे मे

भविष्यात कामगार अडचणीत येणार : कामगार नेते महेंद्र घरत

 उलवे : स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटिश साम्राज्यशाहीच्या विरोधात लढून कामगारांनी मिळविलेले हक्क आणि अधिकार गमावण्याची वेळ आली असल्याचे मत इंटक या राष्ट्रीय कामगार संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महेंद्र घरत यांनी रविवारी उलवे नोड मध्ये आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले .            न्यू मॅरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेने पन्नास पेक्षा अधिक उपक्रमातील कामगारांना व्यवस्थापनाकडून जास्त  पगारवाढीचे करार आणि उत्तम अनुदान देण्याचे  उलवे येथील पत्रकार परिषदेत माहिती देण्यात  आली.यामध्ये  नवीन नऊ  युनिट हाती घेतली .पीएन रायटर बिजनेस सोलुशन महापे ९० हजार आणि गॅड लॉजिस्टिक्स ( पंजाब कॉनवेअर )  ७५००  ते १० हजार इत्यादी अनुदान ( बोनस ) देण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.             न्यू मेरिटाईम अँड जनरल कामगार संघटनेची १२ हजारांहून अधिक सभासद संख्या आहे. त्यांच्या समस्या, वेतन करार आणि सोयी सुविधा पुरविण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र सध्याच्या सरकारने कामगारांना मिळणाऱ्या सोयी सुविधा कमी करून मालक आणि भांडवलदार धार्जिण्या कायद्याची अंमलबजावणी करीत आहे. यामध्ये

"जनसभा" च्या १३ व्या दीवाळी विशेषांकाचे प्रकाशन जे.एम,म्हात्रे यांच्या शुभहस्ते संपन्न

  पनवेल (प्रतिनिधी)दि१०-"खारघर पत्रकार संघ,रजिस्टरचे संस्थापक अध्यक्ष आप्पासाहेब मगर संपादित "जनसभा" वृत्तपत्राच्या १३ व्या दीवाळी विशेषांकाचे प्रकाशन आज सकाळी ११ वाजता संपन्न झाले.पनवेल नगरपरिषदेचे आदर्श माजी नगराध्यक्ष आणि संपूर्ण भारतातील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक जे.एम.म्हात्रे यांच्या शुभहस्ते हे प्रकाशन झाले.याप्रसंगी पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते सन्माननिय प्रितम म्हात्रे आणि  माजी महिला व बाल कल्याण समिती सभापती सौ.लिना गरड यांनी "जनसभा"च्या दीवाळी विशेषांकाला आणि संपादक-आप्पासाहेब मगर यांना भरभरून शुभेच्छा दील्या.तसेच पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमांतून जनतेच्या समस्यांची सोडवणूक होण्यासाठी आवाज उठवीण्याचे आवाहन केले. या प्रकाशन सोहळ्यासाठी नवी मुंबई पोलीस दलातील गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सन्माननिय अर्जुन गरड,खारघर काॕलनी फोरमचे समन्वयक आणि नवी मुंबईमधील सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक मधू पाटील, अॕड.बालेश भोजने,महाराष्ट्रातील इलेक्ट्राॕनिक प्रसार माध्यमांतील बहुचर्चित युवा चेहरा हर्षलजी भदाने-पाटील,महालक्ष्मी हौसिंग सोसायट