Skip to main content

Posts

Showing posts from October, 2023

कामोठे मधील पार्किंगची समस्या सोडविण्याची शेतकरी कामगार पक्षाची मागणी

  पनवेल / वार्ताहर : -सिडकोने २००३ पासून कामोठे नोड विकसित करण्यास सुरुवात केली. आजमितीला कामोठे शहरातील लोकसंख्या 2-3 लाखात आहे.त्यात सिडकोने पंतप्रधान आवास योजना राबवून कामोठेला बकाल स्वरूप प्राप्त होत आहे. शहरात अनेक समस्या असून त्यात पार्किंगची समस्या भयानक आहे. कोरोनाच्या महामारीमुळे नागरिक गर्दीत जाण्यास टाळाटाळ करत आहेत, त्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबात दुचाकी-चार चाकी गाडीचा प्रवेश झाला.        कामोठे मध्ये बहुसंख्य घरात गाड्या आल्या मात्र गाडी पार्क कुठे करणार हा मात्र यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे. त्यात वाहतूक पोलिस कार्यवाही करत आहेत. खांदेश्वर आणि मानसरोवर स्टेशनवर खांदा कॉलनी तसेच कळंबोली मधील प्रवासी स्टेशन परिसरात वाहने पार्किंग करून पुढे कामावर जात आहेत. मात्र दोन्ही स्टेशन परिसरात पार्किंगसाठी जागा अपुरी असल्याने रस्त्याच्या दुतर्फा गाड्या उभ्या केल्या जातात. त्यामुळे गर्दीच्या वेळेस मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जॅम होत आहेत. नागरिकांना चालणे देखील मुश्किल झाले आहे. गेल्या पाच वर्षात परिस्थिती अतिशय गंभीर झाली आहे पण त्याचवेळी पालिकेतील सत्ताधारी आणि आता प्रशासन यांनी सोयीनु

हृदयविकाराच्या झटक्याने बीएसएफ जवानाचं दार्जिलिंग येथे निधन

  लिंब : सातारा तालुक्यातील लिंब येथील सुपुत्र पश्चिम बंगाल येथे  बीएसएफमध्ये कार्यरत असलेले जवान सुनील तुळशीदास सावंत (वय ३६) यांचे हृदयविकाराच्या आजाराने दार्जिलिंग येथे निधन झाले .त्यांच्या निधनाने ऐन दसऱ्याच्या सणामध्ये लिंब गावावर शोककळा पसरली आहे .यावेळी त्यांच्या घरासमोर बीएसएफच्या जवानांनी त्यांना मानवंदना दिली. मानवंदना देताच त्यांच्या पत्नीने 'भारत माता की जय' ची घोषणा देताच उपस्थितांच्या डोळ्यात पाणी आले.         बुधवारी सकाळी जवान सुनील सावंत यांचे पार्थिव लिंबमध्ये आणण्यात आले. यावेळी लिंब फाट्यापासून सजवलेल्या ट्रॅक्टरमधून अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी ठिकठिकाणी त्यांच्या पार्थिवावर फुले वाहत, औक्षण करत श्रद्धांजली वाहण्यात येत होती. जवान सुनील यांचे पार्थिव घरी आणताच त्यांच्या आई, पत्नी, बहीण, वडील, भाऊ व नातेवाईकांनी फोडलेला टाहो पाहून उपस्थितांचे काळीज पिळवटून गेले. त्यानंतर अंत्यसंस्कारासाठी अंत्ययात्रा निघाल्यानंतर चौकामध्ये विविध संस्थांच्या वतीने पार्थिवास हार घालून श्रद्धांजली वाहण्यात आली.        यावेळी स्मशानभूमीमध्ये आमदार शिवेंद्रराजे भोसले, सातार

पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे दसऱ्यानिमित्त गोर -गरिबांना श्रीखंड वाटप

 सातत्यपूर्ण उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक पनवेल / प्रतिनिधी : पत्रकार मित्र असोसिएशन संस्था गेली अनेक वर्षे पत्रकरिता व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी संस्था म्हणून कार्यरत आहे. गेली अनेक वर्षे संस्थेतर्फे विविध सणानिमित्त सामाजिक उपक्रम राबविण्यात येतात. यावर्षीही दसऱ्यानिमित्त पनवेलमधील विविध ठिकाणी असणाऱ्या गरीब वस्तीतील लहान मुले व नागरिकांना श्रीखंड वाटप करण्यात आले. दसरा असला कि प्रत्येकाच्या घरी श्रीखंड पदार्थ असतो मात्र ज्यांच्या घरात एक टाइम जेवण देखील शिजत नाही अशा लोकांना श्रीखंड काय असते हे आजही माहित नाही त्यामुळे सणासुदीला त्यांच्याही मुखात गोडधोड पडावे या हेतूने आम्ही हा उपक्रम राबवीत असल्याचे अध्यक्ष केवल महाडिक यांनी सांगितले.   सोने म्हणून लुटण्यात येणारी आपट्याची पाने... पिवळ्या-केशरी झेंडूच्या माळा... गोड-धोड पदार्थ आणि नवीन वस्तू घरात आणण्याची लगबग... असं उत्साहपूर्ण वातावरण असतं ते दसरा साजरा करण्यासाठी. ‘दसरा सण मोठा, नाही आनंदाला तोटा’ या उक्तीनुसार पनवेल परिसरातील गोर - गरीब लहान मुलांना पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे दसऱ्यानिमित्त नवनाथ नगर, डी मार्ट पुढील गरीब

सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेजच्या वतीने एक धाव स्वच्छता अभियानाकडे

  खारघर :खारघरच्या सरस्वती इंजिनिअरिंग कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) एकत्र येऊन स्वच्छता ही सेवा" अभियानाच्या भारतीय स्वरूपातील एक महत्वाच्या घटनेचा भाग घेतला .         प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी राष्ट्राच्या सर्व राज्यात स्वच्छता अभियान संबोधित केल्यानुसार पनवेल म्युनिसिपल कॉर्पोरेशनसह (पीएमसी) ,बेलापूरमध्ये एनएमएमसी आणि गिरगाव चौपाटी या ठिकाणी १ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ९:३० ते ११:३० वाजता उत्साहाने संपन्न झाला. स्वच्छता अभियानाच्या अंतर्गत आरोग्य आणि कल्याणाच्या संवेदनशीलतेने संबोधित केल्यामुळे स्वागत करण्यात आले होते. महात्मा गांधींच्या जन्मदिवसानिमित्त स्वच्छतेसाठी "एक तास स्वच्छतेसठी श्रमदान " हा उपक्रम ठेवला , ज्याचा महत्व "स्वच्छांजली" म्हणून गांधीजीला समर्पण केला.        स्वच्छता अभियानाच्या मुख्य उद्देश्याची आवड फक्त स्वच्छतेकडे नसताना विस्तार करण्यात आली .या ही सामाजिक विरासत आणि संस्कृती असलेली नागरिकत्वाच्या संरक्षणाच्या दिशेने आहे.ह्या प्रयत्नांमुळे स्वच्छता अभियानाच्या मूल्यांकनातील मोजण्यासाठी आपल्याला विविध प्रकारच्या मानवनिर्मित