नवीन पनवेल(रत्नाकर पाटील): पनवेल पोलीस संघ विरुद्ध पनवेल पत्रकार संघ यांच्यात प्रदर्शनीय क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पत्रकार संघाने बाजी मारत प्रदर्शनीय सामना जिंकला.
करंजाडे येथे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या पुढाकाराने गावदेवी क्रीडा मंडळ करंजाडे येथे मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन लोकनेते दि. बा. पाटील क्रीडांगणावर करण्यात आले होते. प्रदर्शनीय सामन्याचा टॉस करण्यासाठी पत्रकार संघाकडून रत्नाकर पाटील तर पोलीस संघाकडून अभय शिंदे मैदानात उपस्थित होते, यावेळी पोलीस संघाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पत्रकार संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरले. प्रथम फलंदाजी करताना पोलीस संघाने 4 षटकात 20 धावा करून पत्रकार संघाला 21 धावांचे आव्हान दिले होते. यामध्ये शिंदे 8 चेंडूत 5 धावा, महाडेश्वर 2 चेंडूत 4 धावा, राहुल 2 चेंडूत 4 धावा, मोकल 2 चेंडूत 1 धाव आणि अवांतर 6 धावा, अशा एकूण 20 धावा पोलीस संघाने काढल्या, यावेळी गोलंदाजी करताना पत्रकार संघाच्यावतीने विशालने 1 षटकात 9 धावा 2 विकेट, तुषारने 1 षटकात 4 धावा 1 विकेट, समीर 1 षटकात 2 धावा 1 विकेट तर रत्नाकरने 1 षटकात 4 धावा 1 विकेट घेऊन पोलीस संघाला 20 धावांवर रोखण्यात पत्रकार संघाला यश आले.
यानंतर पत्रकार संघाकडून फलंदाजीसाठी सलामीला शैलेश चव्हाण आणि रत्नाकर पाटील ही जोडी मैदानात उतरली. शैलेश जोरदार फटका मारण्याच्या प्रयत्नात असताना झेलबाद झाला. त्यानंतर सुरज आणि रत्नाकर या जोडीने जोरदार फटकेबाजीने धावफलक हालता ठेवला, सुरजने चांगली फलंदाजी करत 3 चेंडूत 1 षटकाराच्या सहाय्याने 11 धावा काढल्या, तर रत्नाकरने 6 चेंडूत 1 चौकरसह 9 धावा काढल्या आणि पत्रकार संघाला विजय मिळाला.यादरम्यान पत्रकार संघाकडून जोरदार गोलंदाजी पहावयास मिळाली . तुषार जाधव, विशाल सावंत, समीर जाधव आणि रत्नाकर यांच्याकडून चांगली गोलंदाजी पहावयास मिळाली. तर शैलेश चव्हाण कडून उत्कृष्ट क्षेत्ररक्षण दिसून आले.
पनवेल पोलिस संघात अभय शिंदे, दयानंद महाडेश्वर, नेलवाडे, कुंभार, अमोल डोईफोडे, माधव शेवाळे यांनी सहभाग नोंदविला तर पत्रकार संघात मंदार दोंदे, रत्नाकर पाटील, शैलेश चव्हाण, विशाल कांबळे, सनीप कलोते, मयूर तांबडे, कुणाल जैतपाल, दत्ता मोकल, गणपत वारागडा, सूरज जाधव, तुषार पवार यांचा सहभाग होता.
शेवटी माजी सरपंच रामेश्वर आंग्रे यांच्या हस्ते दोन्ही संघांना आकर्षक चषक प्रदान करण्यात आले.
*पोलीस संघाचा धावफलक*
शिंदे 8 चेंडूत 5 धावा, महाडेश्वर 2 चेंडूत 4 धावा, राहुल 2 चेंडूत 4 धावा, मोकल 2 चेंडूत 1 धावा, अवांतर 6 धावा.
*पत्रकार संघाची गोलंदाजी*
विशाल 1 षटकात 9 धावा 2 विकेट, तुषार 1 षटकात 4 धावा 1 विकेट, सागर 1 षटकात 2 धावा 1 विकेट, रत्नाकर 1 षटकात 4 धावा 1 विकेट
*पोलीस संघाची गोलंदाजी*
शिंदे 1 षटकात 10 धावा 1 विकेट, राहुल 3 चेंडूमध्ये 11 धावा
Comments
Post a Comment