मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण?
पनवेल / प्रतिनिधी : पनवेल महापलिका स्थापन होऊन अंदाजे 6 ते 7 वर्षे झाली मात्र आजही ग्रामपंचायतसारख्या सुविधा पनवेलकरांना मिळत आहे. पनवेल महापालिका अग्निशमन दलाचा तक्रार करण्याचा टेलिफोन गेले काही दिवस बंद असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष तथा डॅशिंग पत्रकार केवल महाडिक यांना मिळाली त्यानुसार त्यांनी लगेचेच पनवेल महापालिका अग्निशमन दलाच्या 02227461500 या क्रमांकावर फोन केला व स्वतः अग्निशमन विभागाच्या कार्यालयाबाहेर जाऊन पुन्हा फोन लावून शहानिशा केली मात्र रिंग होत होती मात्र कोणताही फोन याठिकाणी येत नव्हता तसेच त्याठिकाणी असणारा अधिकारी कर्मचारी वर्ग झोपलेला होता तर एक जण फोनजवळ बसून होता याबाबत पत्रकार मित्रांसोबत केवल महाडिक यांनी ऑनकॅमेरा प्रश्न विचारल्यावर सर्व खडबडून जागे झाले व फोन बंद असल्याची कबुली दिली मात्र जर का कोणत्याही ठिकाणी मोठी आग लागल्यास व तात्काळ फोन न लागल्यास त्यास होणाऱ्या जीवितहानस जबाबदार कोण? असा प्रश्न देखील उपस्थित केला मात्र आम्ही अनेकदा तक्रार दिली असून याबाबत mtnl अधिकारी देखील लक्ष देत नाही असे सांगितले गेले. मात्र अशा प्रकारे पनवेलच्या जनतेला धोक्यात ठेवणाऱ्या पालिका अधिकारी व mtnl अधिकारी यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई होणे गरजेचे आहे व फोन लवकरात लवकर चालू न केल्यास दोन्ही फोन आयुक्तांच्या टेबलावर नेऊन ठेवू असा इशारा केवल महाडिक यांनी दिला आहे.
Comments
Post a Comment