Skip to main content

Posts

Showing posts from March, 2023

पत्रकार विरुद्ध पोलीस क्रिकेट सामन्यात पनवेल पत्रकार संघ विजयी

  नवीन पनवेल(रत्नाकर पाटील): पनवेल पोलीस संघ विरुद्ध पनवेल पत्रकार संघ यांच्यात प्रदर्शनीय क्रिकेट सामना आयोजित करण्यात आला होता. यामध्ये पत्रकार संघाने बाजी मारत प्रदर्शनीय सामना जिंकला.         करंजाडे येथे माजी सरपंच रामेश्वर आंग्रे आणि माजी उपसरपंच योगेंद्र कैकाडी यांच्या पुढाकाराने गावदेवी क्रीडा मंडळ करंजाडे येथे मर्यादित षटकांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन लोकनेते दि. बा. पाटील क्रीडांगणावर करण्यात आले होते. प्रदर्शनीय सामन्याचा टॉस करण्यासाठी पत्रकार संघाकडून रत्नाकर पाटील तर पोलीस संघाकडून अभय शिंदे मैदानात उपस्थित होते, यावेळी पोलीस संघाने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पत्रकार संघ क्षेत्ररक्षणासाठी मैदानात उतरले. प्रथम फलंदाजी करताना पोलीस संघाने 4 षटकात 20 धावा करून पत्रकार संघाला 21 धावांचे आव्हान दिले होते. यामध्ये शिंदे 8 चेंडूत 5 धावा, महाडेश्वर 2 चेंडूत 4 धावा, राहुल 2 चेंडूत 4 धावा, मोकल 2 चेंडूत 1 धाव आणि अवांतर 6 धावा, अशा एकूण 20 धावा पोलीस संघाने काढल्या, यावेळी गोलंदाजी करताना पत्रकार संघाच्यावतीने विशालने 1 षटकात 9 धावा 2 विकेट, तुषारने 1

आपला आधार फाउंडेशनची लवकरच बैठक, नव्या चेहऱ्यांना मिळणार संधी, बैठकीत होणार विविध पदनियुक्ती

पनवेल / प्रतिनिधी : राजकारण व समाजकारणात एक नावाजलेली संस्था म्हणून प्रचलित असलेली आपला आधार फाउंडेशन ही संस्था गेली अनेक वर्षे पनवेल तालुक्यात कार्यरत आहे. संस्थेचे संस्थापक हे एक संपादक असून त्यांचा राजकारण व समाजकार्यातील अनुभव दांडगा आहे. आपला आधार फाउंडेशनच्या कार्यातून त्यांनी अनेक महिला व पुरुष सदस्यांना घडवून एक ओळख निर्माण करून दिलेली आहे. याच उद्देशाने आपला आधार फाउंडेशन या संस्थेची बैठक पार पडणार असून रायगडमधील विविध पद, तालुक्यातील पद व महिला अध्यक्षा व कार्यकारणी निवडली जाणार असल्याची माहिती संस्थेच्या सल्लागार प्राजक्ता महाडिक यांनी यावेळी दिली.

महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचा विमानाने गोवा अभ्यास दौरा

  पनवेल / प्रतिनिधी :  महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या स्थापनेनंतर धडाक्यात कार्यक्रम सुरु आहेत. सामाजिक राजकीय क्षैक्षणिक क्षेत्रात महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन काम करत आहे. पत्रकारांच्या अनेक संघटना अस्तित्वात आहेत मात्र महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन या संस्थेत नव्याने पत्रकारिता करणार्‍या बंधू - भगिनींना देखील प्रथम सामावून घेण्याचा उद्देश ठेवण्यात आला आहे. नव्याने पत्रकारिता क्षेत्रात आल्यानंतर अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, काम करताना अनेकदा खच्चीकरण झाल्यासारखे वाटते त्यातच कमाईचे स्रोत अत्यल्प असल्याने लाईट बिल भरणे देखील कधी कधी मुश्किलीचे होऊन जाते. महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन संघटनेने या सर्वांची दखल घेत शुक्रवार दिनांक 24 मार्च 2023 रोजी विमानाने गोवा अभ्यास दौरा आयोजित केला आहे. प्रथमच विमानाने प्रवास करणार्‍या सदस्यांच्या इच्छेनुसार या दौरा आयोजित करण्यात आला असून विमानात बसणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते व त्याच हेतूने आम्ही हा गोवा दौरा आयोजित केला असल्याचे अध्यक्ष केवल महाडिक, उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव संतोष सुतार, सहसचिव शैलेश चव्हाण, कार्याध्यक्

महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन संघटना वाढीसाठी पूर्ण प्रयत्न करणार : नवी मुंबई कार्याध्यक्षा फ्लावीया अहिरवार यांची माहिती

पनवेल / प्रतिनिधी : महाराष्ट्रासह नवी मुंबई परिसरातील पत्रकारिता क्षेत्रात महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन व पत्रकार मित्र असोसिएशन संस्थेची वाटचाल यशस्वीरित्या सुरु असून सल्लागार दिपक महाडिक, अध्यक्ष केवल महाडिक, उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव संतोष सुतार, कार्याध्यक्ष संतोष भगत यांच्या मार्गदर्शननानुसार जोमाने सुरु आहे. नवी मुंबई अध्यक्ष नितीन जोशी यांच्या नेतृत्वात नवी मुंबईतील खारघर, कामोठे, कळंबोली, खारघर, तळोजा या परिसरात कार्यकारणी काम करत आहे. नवी मुंबई कार्याध्यक्षा फ्लावीया अहिरवार यांचा पत्रकारिता व समाजसेवेतील अनुभव हा संघटनेसाठी फायद्याचा ठरणार असून भविष्यात एक उत्तम व्यक्तिमत्व म्हणून फ्लावीया आहिरवार यांच्याकडे जनता पाहत आहे. नवी मुंबई कार्याध्यक्षापदी निवड झाल्याबद्दल नवी मुंबई परिसरातील मान्यवरांनी फ्लावीया यांचे फोनद्वारे व प्रत्यक्ष भेटून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. कोट : महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवलजी महाडिक व नवी मुंबई अध्यक्ष नितीनजी जोशी यांच्या नेतृत्वात मी काम करणार असून त्यांच्या आदेशाचे पालन करून संघटना वाढीसाठी पूर्ण प्रयत्न करणार आ

पनवेल महापालिका अग्निशमन दलाचा फोन गेले अनेक दिवस नॉट रिचेबल

मोठी दुर्घटना होऊन जीवितहानी झाल्यास जबाबदार कोण? पनवेल / प्रतिनिधी : पनवेल महापलिका स्थापन होऊन अंदाजे 6 ते 7 वर्षे झाली मात्र आजही ग्रामपंचायतसारख्या सुविधा पनवेलकरांना मिळत आहे. पनवेल महापालिका अग्निशमन दलाचा तक्रार करण्याचा टेलिफोन गेले काही दिवस बंद असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष तथा डॅशिंग पत्रकार केवल महाडिक यांना मिळाली त्यानुसार त्यांनी लगेचेच पनवेल महापालिका अग्निशमन दलाच्या 02227461500 या क्रमांकावर फोन केला व स्वतः अग्निशमन विभागाच्या कार्यालयाबाहेर जाऊन पुन्हा फोन लावून शहानिशा केली मात्र रिंग होत होती मात्र कोणताही फोन याठिकाणी येत नव्हता तसेच त्याठिकाणी असणारा अधिकारी कर्मचारी वर्ग झोपलेला होता तर एक जण फोनजवळ बसून होता याबाबत पत्रकार मित्रांसोबत केवल महाडिक यांनी ऑनकॅमेरा प्रश्न विचारल्यावर सर्व खडबडून जागे झाले व फोन बंद असल्याची कबुली दिली मात्र जर का कोणत्याही ठिकाणी मोठी आग लागल्यास व तात्काळ फोन न लागल्यास त्यास होणाऱ्या जीवितहानस जबाबदार कोण? असा प्रश्न देखील उपस्थित केला मात्र आम्ही अनेकदा तक्रार दिली असून याबाबत mtnl अधिकारी देखील लक

चागू काना ठाकूर स्वायत्त महाविद्यालयाच्या रौप्य वर्ष महोत्सवाचे आयोजन

  राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. विजय खोले यांची लाभणार प्रमुख उपस्थिती       पनवेल(प्रतिनिधी) दर्जेदार शिक्षणासोबत कला, क्रीडा, सामाजिक, सांस्कृतिक आदी क्षेत्रात अग्रेसर असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्टस, कॉमर्स अँड सायन्स (स्वायत्त) महाविद्यालयाला २५ वर्ष झाले असून त्या अनुषंगाने या महाविद्यालयाचा दोन दिवसीय 'रौप्य महोत्सव समारंभ' शनिवार दिनांक ११ मार्च रोजी राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील व रविवार दिनांक १२ मार्चला मुंबई विद्यापीठाचे माजी कुलगुरू मा. डॉ. विजय खोले यांच्या अध्यक्षतेखाली आणि संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली खांदा कॉलनी येथील सीकेटी महाविद्यालयाच्या प्रांगणात होणार आहे.          महाविद्यालयाला २५ वर्ष पूर्ण होऊन जी यशस्वी वाटचाल करत आहे त्याचे श्रेय संस्थेचे पदाधिकारी, सर्व विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांना देण्यात येते. त्यानिमित्ताने चांगु काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स  अँड सायन्स  कॉलेज, न्यू पन

खारघरमध्ये जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी मोफत विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन

  खारघर : भाजपा मा.नगरसेविका नेत्रा किरण पाटील व पोलारीस हॉस्पिटल यांच्या संयुक्त माध्यमातून जागतिक महिला दिनानिमित्त महिलांसाठी  मोफत विशेष तपासणी शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे .           या शिबिरात ईसीजी (ECG) ,ब्लड शुगर (RBS) ,बी एम डी (BMD) , PAP SMEAR ,डोळे तपासणी (Eye Check Up) मोफत करण्यात  येणार असुन व तसेच स्त्री-रोग तज्ञ डॉक्टरांचे मोफत मार्गदर्शन पोलारीस हॉस्पिटल प्लॉट नंबर १९ सी, सेक्टर २० खारघर  येथे  दिनांक ११ व १२ मार्च २०२३ रोजी सकाळी १० ते संध्या.५ वाजता घेण्यात येणार असुन  अधिक माहितीसाठी या नंबरवर 9372338820 / 9930008820 संपर्क करा .

महापालिकेच्यावतीने विविध कार्यक्रम सादर करत महिला दिन साजरा

पनवेल,दि,८: स्त्री आणि पुरूष ही एका रथाची दोन चाके आहेत. महापालिकेप्रमाणे सर्व कार्यालयात पुरूषांच्या खांद्याला खांदा लावून महिला काम करत आहेत.वरिष्ठ पदांवर,महापौर पदांवरतीही महिला उत्तम पध्दतीने काम करत आहेत. सर्वच क्षेत्रात महिलांची संख्या वाढत असून, त्यांचा सन्मानही वाढत आहे.असे प्रतिपादन आयुक्त श्री.गणेश देशमुख यांनी केले.        महिला दिनानिमित्त आज (८मार्च)आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात महापालिकेच्यावतीने महिला अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.यावेळी उपसंचालक नगररचना ज्योती कवाडे, उपायुक्त कैलास गावडे, आयुक्तांच्या सौभाग्यवती नेहा देशमुख, प्रिती डाके आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी महापालिकेच्यावतीने स्वच्छता महिला कर्मचारी तसेच आशा सेविकांना आयुक्तांच्या हस्ते साड्यांचे वाटप करण्यात आले.तसेच सर्व महिलांना कर्मचाऱ्यांना भेटवस्तु चे वाटप करण्यात आले.यावेळी उपसंचालक ज्योती कवाडे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.          महापालिकेच्यावतीने महिला दिनाच्या निमित्ताने 'अस्तित्वाची ओळख&#

महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त फणसवाडी येथील महिलांना साड्या वाटप

पनवेल / प्रतिनिधी : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत शहरासह, जिल्हाभर विविध उपक्रम उत्साहात पार पडले. महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या वतीने जागतिक दिनानिमित्त ग्रामपंचायत कसलळखंड शिवाजीनगर फणसवाडी येथील आदिवासी वस्तीतील महिलांना साडी वाटप करण्यात आले. यावेळी माजी पंचायत सभापती वसंत काठवले, सरपंच तानाजी पाटील, माजी प्रभारी सरपंच अनिल पाटील, माजी उपसरपंच महादेव पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य देविदास पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुभाष पाटील, महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष सुनील पाटील, खजिनदार सोनल नलावडे, प्रसिद्धीप्रमुख शीतल पाटील, खालापूर तालुकाध्यक्ष निलेश घाग, नवी मुंबई अध्यक्ष नितीन जोशी, सदस्य विद्याधर ठाकूर आदी उपस्थित होते. यावेळी रवींद्र वाघमारे यांनी विशेष सहकार्य केले.

महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी वाटपL

  *होळीच्या दिवशी एक पोळी गरिबांसाठी उपक्रम.*  पनवेल / प्रतिनिधी     होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्हावा तसेच प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी अशी संकल्पना महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांना सुचली न त्यानुसार गेल्या 6 वर्षापासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे काम विविध संस्थेतर्फे केले जाते. होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य पत्रकार यावर्षीही पनवेल शहरामधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल या ठिकाणी असलेल्या गोर - गरिबांना व गरजूंना पुरणपोळीचे वाटप केले गेले. होळी सणाच्या दिवशी अनेकांच्या घरी गोडधोड असते तसेच होळीत प्रसाद म्हणून अनेक ठिकाणी पुरणपोळी टाकण्याचे कार्यक्रम देखील होत असतात. मात्र या माध्यमातून अन्नाचा नास होते. तर दुसरीकडे अनेक गोर गरिबांना सणासुदीच्या दिवशीही उपाशीच झोपावे लागते. याची जाणीव ठेवूनच महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे पुरणपोळीचे वाटप करण्यात आले. या पुरणपोळी वाटप कार्य

महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनतर्फे होळीच्या दिवशी एक पोळी गरिबांसाठी या उपक्रमांतर्गत गोर - गरिबांना करण्यात येणार पुरणपोळी वाटप.

  पनवेल / प्रतिनिधी : होळीत प्रसाद म्हणून पुरणपोळी न टाकता तिचा उपयोग गरीब, गरजूंच्या व निराधार लोकांच्या पोटाची भूक शमविण्यासाठी व्हावा तसेच आजच्या महागाईच्या दुनियेत प्रत्येक गरिबाला होळी सणानिमित्त गोडधोड म्हणून पुरणपोळी खाण्यास मिळायला हवी अशी संकल्पना महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक यांना सुचली व त्यानुसार गेल्या 5  वर्षापासून होळीच्या दिवशी गरिबांना पुरणपोळी खाऊ घालण्याचे काम त्यांच्यावतीने केले जाते. होळीच्या दिवशी गरिबाला पोळी या संकल्पनेनुसार महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या वतीने यंदा पनवेल शहरामधील पनवेल, नवीन पनवेल, खांदा वसाहत, कळंबोली उड्डाणपूल, आसुडगाव या ठिकाणी असलेल्या गोर - गरिबांना व गरजूंना तसेच निराधार लोकांना पुरणपोळीचे वाटप केले जाणार आहे. सोमवार दिनांक 6 मार्च 2023 रोजी सदर उपक्रम राबविण्यात येणार असून ज्यांना कोणाला या उपक्रमास मदत करायची असेल त्यांनी 9619119797, 7400119797, 9004433998, 9773442989, 9833443207 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन कार्याध्यक्ष संतोष भगत, उपाध्यक्ष सुनील पाटील, सचिव संतोष सुतार व असोसिएशनतर्फे करण्यात