Skip to main content

Posts

Showing posts from February, 2023

NSS Unit of Saraswati College of Engineering Kharghar organised 5 Days Residential Leadership Training Programme 2022-23 under Azadi ka Amrit Mahotsav from 14th February to 18th February 2023

  Navi Mumbai : 34 Volunteers from 18 colleges in Navi Mumbai (Thane Zone IV) participated in this camp. Day one was full of energy for all volunteers. The day started with Registration of all the volunteers present at the Venue. Later on the inauguration of LTP camp was done by the Deputy Commissioner Panvel Municipal Corporation Shri. Ganesh Shetty, Dist. Coordinator  Dr. Nitin Deshmukh, Area-Coordinator, Navi Mumbai, Dr. Laxman Gavali and NSS PO and Area-Coordinator Dr. Sunita Pal. Sessions were arranged with a motto to build Soft skills and leadership quality. Shri Ganesh Shetty took the session on Role of Youth in social reform. Topics of Personality Development, Public Speaking, Soft Skills and Leadership were taken by Prof. Alka Purohit, Mr. Mushtaq Shaikh, Prof. Meghna Chatterjee, Mr. Rahul Jadhav and Prof. Royal D'Souza, respectively. Shri Sushil Shinde (NSS Officer On Special Duty) visited the LTP camp and made participants aware of "What NSS Exactly is?". India

खारघर पत्रकार संघाचे सचिव संतोष वाव्हळ यांच्या निवासस्थानी गजानन महाराज प्रकट दीन धार्मिक वातावरणात साजरा

 खारघर दि.१३,(प्रतिनिधी)- शेगावच्या गजानन महाराजांचा प्रकट दीन सोहळा सालाबादप्रमाणे याहीवर्षी संतोष वाव्हळ यांच्या निवासस्थानी अत्यंत उत्साहात आणि धार्मिक वातावरणात संपन्न झाला. वाव्हळ दांम्पत्त्याची गजानन महाराजानवरती अपार श्रद्धा असून त्यांच्या कुटूंबात आणि आप्तस्वकीयांच्या देव्हाऱ्यात गजानन महाराजांना मानाचे स्थान आहे. पुजा, होम-हवन अशा धार्मिक विधीबरोबरच भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजनही भक्तीभावाने केले जाते. त्यामुळे सालाबादप्रमाणे याही वर्षी दर्शनासाठी खारघमधील सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी आणि सौ.राजश्री वाव्हळ या पोलिस सेवेत कार्यरत असल्यामुळे पोलिस अधिकारी आणि जवानांनी मोठ्या संख्येने दर्शनाचा आणि महाप्रसादाचा लाभ घेतला. दर्शनासाठी आवर्जून उपस्थित राहिल्यांमध्ये भाजपा खारघर-तळोजा मंडलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल, पनवेल महानगरपालिकेचे माजी सभापती प्रविण पाटील, शत्रुघ्न काकडे, भाजपा रायगड युवा मोर्चा पदाधिकारी समीर कदम, गिता चौधरी, अमर उपाध्याय, किर्ती नवघरे, किरण पाटील, शेकापचे खारघर अध्यक्ष अशोक गिरमकर, शेकाप पनवेल विधानसभा उपाध्यक्ष अजित अड

गरजुंना ब्लॅंकेट वाटप करून महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या कार्याची सुरुवात

महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचा उपक्रम पनवेल / प्रतिनिधी : पनवेल शहरातील रेल्वे स्थानक भागात राहत असलेल्या बेघर -गरजू बांधवांचे थंडीपासून रक्षण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशन व श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टच्या वतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले. महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या अध्यक्ष पदाची धुरा तरुण तडफदार पत्रकार केवल महाडिक यांनी सांभाळल्यानंतर समाजपयोगी कामाची सुरुवात त्यांनी केली आहे. यामध्ये श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्ट यांच्या सहकार्याने महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी महाराष्ट्र राज्य पत्रकार असोसिएशनचे अध्यक्ष केवल महाडिक, कार्याध्यक्ष संतोष भगत, सचिव संतोष सुतार, श्री प्रल्हादराय झुलेलाल ट्रस्टचे ऍड. मनोहर सचदेव, सदस्य नितीन जोशी,निलेश घाग, शशिकांत दळवी, संतोष आमले आदी उपस्थित होते.