नवी मुंबई प्रतिनिधी (संदीप जाधव) : नवी मुंबई एनटीटी विभागामार्फत कामगारांबाबत व वाहन चालकांबाबत वाहतूक सुरक्षे विषयी जनजागृती करण्याकरिता दिनांक 11 जानेवारी ते 12 जानेवारी 2023 या कालावधीत रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे त्याच अनुषंगाने नवी मुंबई एनटीटी सिक्युरिटी लीड प्रद्यमानसिंग राठोड, आशुतोष आनंद, प्रवीण पाटील सेफ्टी ऑफिसर तेजस शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली जनजागृती करण्यात आली, या ठिकाणी श्री प्रद्युमनसिंग राठोड यांनी स्वतः सुरक्षित रहा व इतरांना सुरक्षित ठेवा वाहन चालवताना सेफ्टी बेल्ट ड्रिंक अँड ड्राईव्ह अपघात झाला असता त्यांना प्रथम प्रथमोपचार नजीकच्या इस्पितळात दाखल करणे हे प्रथम कर्तव्य!... याविषयी मार्गदर्शन करून ड्रॉईंग बक्षीस वाटप करण्यात आले प्रथम क्रमांक इलेक्ट्रॉमॅक्स (अफात फारूक) यांना देण्यात आला. कार्यक्रमास उपस्थित सिक्युरिटी सुपरवायझर अभय सिंग, प्रदीप तिवारी, इंद्रजीत यादव नितीन गुप्ता योगेश तायडे संग्राम मोरे योगेश जगदाळे राहुल रेड्डी राहुल टिल्लू प्रथमेश ढवळे ईशाक देसाई चंद्रकांत तिवारी यांच्या उपस्थितीत पार पडला....