Skip to main content

Posts

Showing posts from November, 2022

मानसरोवर रेल्वे स्थानक परिसरातील वाहनांना लागल्या आगी

  पनवेल, दि.28 (वार्ताहर) ःहार्बर रेल्वे मार्गांवरील मानसरोवर रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरात गवताला आग लागून परिसरात उभ्या असलेल्या अनेक दुचाकी आगीच्या भक्षस्थानी पडल्या आहेत. आज सव्वापाच वाजण्याच्या सुमारास घडलेल्या या घटनेची माहिती मिळताच कळंबोली अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून ते आगीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आगीत किती दुचाकींचे नुकसान झाले याची माहिती अद्याप हाती लागली नसून, चार ते पाच दुचाकीचे नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. स्थानक परिसरात प्रधानमंत्री आवास योजनेचे काम सुरु असल्याने स्थानक परिसरातील वाहनतळ बंद असल्याने हार्बर मार्गांवरून प्रवास करणार्‍या प्रवाशांना नाईलाजाने परिसरातील मोकळ्या मैदानाचा वापर वाहन उभी करण्यासाठी करावा लागतो. आगीची झळ पोहचलेल्या दुचाकी रेल्वे प्रवाशांच्या असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घटनेची माहिती मिळताच कामोठे पोलीस ठाण्याचे पथक सुद्धा घटनास्थळी रवाना झाले होते.

खारघर येथील निरसूख बार ऍण्ड रेस्टोरंटचा परवाना रद्द करण्याची शिवसेनेची मागणी

  पनवेल (संजय कदम) : पनवेल महानगर पालिका हद्दीतील खारघर सेक्टर १० येथील निरसूख बार एण्ड रेस्टोरंट ला देण्यात आलेला परवाना त्वरित रद्द करावा अशी मागणी जिल्हा प्रमुख शिरीष घरत यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना खारघर शहर प्रमुख गुरुनाथ पाटील यांनी शासनाकडे केले आहे. खारघर वसाहत हि पूर्वी पासून नो लिकर झोन( दारू मुक्ती) शहर ओळखले जात असून याच शहरामध्ये सेक्टर १० येथील निरसूख बार एण्ड रेस्टोरंट ला राज्य उत्पादन शुल्क विभागाने परवानगी दिल्याने खारघर वसाहत परिसरात आणखी मोठ्या प्रमाणात बार तसेच आगामी काळात लेडीज बार सुद्धा सुरु होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे नो लिकर झोन( दारू मुक्ती) शहर या संकल्पनेला तडा जाण्याची शक्यता आहे अश्या प्रकारच्या परवानग्यांमुळे येथील रहिवासीयांच्या भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत. हा परिसर शैक्षणिक नगरी म्हणून ओळखला जातो सन २००७ साली सेक्टर २० येथे जलवायू सोसायटी शेजारी श्याम वाईन्स सुरु करण्यात आला होता त्याला येथील रहिवासीयांनी, विविध संघटना, संस्था शिवसेनेसह विविध राजकीय पक्ष यांनी एकत्रित येऊन मोर्चे व आंदोलने उभारून प्रखर विरोध केला होता. न

राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीतून चार महिन्यात ६ कोटी ४० लाखांची मदत राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत वैद्यकीय मदत कक्ष पोहचवण्याचा संकल्प - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई दि. १७ - जनतेला चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणे हा शासनाचा प्राधान्याचा विषय आहे. यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातील गरजू रुग्णांपर्यंत मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाची मदत पोहचवण्याचा संकल्प करा, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार कक्षाचे कार्य सुरु असून अवघ्या चार महिन्यातच १ हजार ०६२ रुग्णांना ६ कोटी ४० लाखांची मदत उपलब्ध करून देण्यात आली आहे.   सर्वांना चांगले वैद्यकीय उपचार मिळवून देणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उद्दीष्ट आहे. त्यानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्षाचे काम सुरू आहे. जास्तीत जास्त रुग्णांनी मदत देण्यासाठी आणि त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी आम्ही उपलब्ध आहोत, असे मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांनी सांगितले. त्यानुसार मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सहायता कक्ष वेगाने कामाला लागला आहे. मुख्यमंत्र्यां

मुंबईतील गोवर आजार नियंत्रणाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

  लसीकरणाच्या  जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्या* *उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश* मुंबई, दि. १७ : मुंबई महानगरातील गोवरचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यासाठी लसीकरणावर भर देऊन रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या बालकांची विशेष काळजी घ्यावी. गोवरमुळे होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण शून्यावर आणावे. लसीकरणाविषयी जाणीवजागृतीसाठी विविध धर्मगुरूंची मदत घ्यावी, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे दिले. मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील गोवर साथ नियंत्रणाबाबत आढावा बैठक घेतली. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार, आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीष महाजन, शिक्षण मंत्री दीपक केसरकर, कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव आदी यावेळी उपस्थित होते. मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांनी यावेळी मुंबईतील गोवर आजाराच्या प्रतिबंधासाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मुख्यमंत्री यावेळी म्हणाले, लसीकरणाच्या अभावी बालकांना गोवरचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ज्या भागात गोवरचा उद्रेक होत आहे तेथ

सेवा पंधरवडा काळात ९५ टक्के अर्ज निकाली;अर्ज निकाली काढण्याची मोहिम सुरूच ठेवा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

  मुंबई, दि. १७ : राज्यात दि. १७ सप्टेंबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत राबविण्यात आलेल्या सेवा पंधरवडा कालावधीत विविध १४ सेवा आणि पोर्टलवरील प्रलंबित प्रकरणांचा ९५ टक्के निपटारा करण्यात आला आहे. या मोहिमेत एकूण ८३ लाख ५७ हजार २१८ प्रलंबित अर्जांपैकी ७९ लाख ४५ हजार २२ अर्ज निकाली काढण्यात आले. याबद्दल आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादरीकरण करण्यात आले. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन करीत यापुढेही प्रलंबित अर्जांवर मोहिम स्वरुपात कार्यवाही करून सामान्यांना दिलासा देण्याचे निर्देश दिले. सामान्य नागरिकांच्या तक्रारी, अर्जांवर कालमर्यादेत निपटारा व्हावा यासाठी राज्यात दि. १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा’ आयोजित करण्यात आला होता. या पंधरवड्याच्या पहिल्या टप्प्यानंतर दि. ३ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत दुसरा टप्पा राबविण्याचे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी दिले होते.  दि. १० सप्टेंबरपर्यंत प्रलंबित असलेल्या एकूण ४९ लाख १८ हजार १०९ अर्जांपैकी ४६ लाख ५२ हजार २६० अर्ज निकाली काढण्य

पनवेल तालुक्यात “सुवर्णा” भात जातीच्या पिकाचा पीक कापणी प्रयोग पूर्ण

  अलिबाग, दि.17 (जिमाका):- महाराष्ट्रात पिकांच्या उत्पादनाची माहिती अंतिम करण्यासाठी सन 1944 सालापासून खरीप व रब्बी हंगामात पीक कापणी प्रयोग राबविण्यात येत असून, याबाबत महाराष्ट्र शासनाने पीक कापणी प्रयोग व्यवस्थित रितीने होण्यासाठी वेळोवेळी आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल, कृषी व ग्रामविकास विभाग यांच्यामध्ये आवश्यक त्या प्रमाणात वाटप करुन व समन्वय साधून पिक कापणी प्रयोगाची आखणी व अंमलबजावणी गेली अनेक वर्षे सुरु आहे.      या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यामध्ये खरीप हंगामासाठी पीक कापणी प्रयोगाकरीता तालुका कृषी अधिकारी यांच्याकडील दि.13 ऑक्टोबर 2022 रोजीच्या सुधारीत यादीनुसार गावनिहाय एकूण 18 (एका गावासाठी प्रत्येकी 2 असे एकूण 36) पीक कापणी प्रयोग निश्चित केले आहेत. त्यानुसार आंबे तर्फे वाजे येथे शेतकरी बाळाराम पालांडे आणि वसंत पाटील यांच्या शेतात सुवर्णा या भात जातीच्या पिकाचा पीक कापणी प्रयोग पूर्ण करण्यात आला. यावेळी नायब तहसिलदार राहूल सुर्यवंशी, मंडळ अधिकारी अजित पवार, तलाठी श्रीनिवास मेतरी, कोतवाल पद्माकर चौधरी व सिताराम वारगडा हे उपस्थित होते.      शासनाकडील निर्देशानु

अज्ञात कारणावरून पनवेलमध्ये 22 वर्षीय तरुणाची हत्या; संशयितांचा शोध सुरू

  पनवेल (संजय कदम) : अज्ञात कारणावरून एका इसमाची धारदार हत्याराने मानेवर गळ्यावर वार करून व तोंडावर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याची घटना नवीन पनवेल सेक्टर १८ विठ्ठल रुख्मिणी मंदिराच्या पाठीमागे घडली आहे. फारुक फकीर अहमद ब्यापारी (वय २२) रा. पोदी नंबर २ नवीन पनवेल हा मजूरी काम करत होता त्याची कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार हत्याराने मानेवर गळ्यावर वार करून व तोंडावर मारहाण करून त्याची हत्या करण्यात आली आहे. या घटनेची माहिती मिळताच खांदेश्वर पोलिसांचे पथक घटनास्थळी रवाना झाले होते. त्याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहिती नुसार व गुप्त बातमीदारांच्या माहितीनुसार काही संशयितांचा शोध खांदेश्वर पोलीस करत आहेत.

गार्डन मधील अनावश्यक असणारे शौचालय रद्द करा,माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांची मागणी

  पनवेल :  नवीन पनवेल सेक्टर  3  येथील भूखंड क्रमांक  56  आणि  57  या गार्डन भूखंडावर नव्याने सुशोभीकरण होत आहे. ते होत असताना सदरच्या प्लॅनिंग मध्ये दोन्ही ठिकाणी शौचालय नव्याने उभारणी होत आहे. सदर गार्डन पासून  50  ते  100  मीटर अंतरावर दोन्ही बाजूवरील मुख्य रस्त्यांवर सार्वजनिक शौचालय आहेत. तसेच त्या परिसरात राहणाऱ्या आणि त्या परिसरात बाहेरून येणाऱ्या व्यक्तींसाठी सद्यस्थितीमध्ये सुरू असलेली दोन्ही शौचालय आहेत. असे असताना सुद्धा पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून विकसित करण्यात येत असलेल्या गार्डनमध्ये नव्याने शौचालय बांधण्यात आल्याने नागरिकांच्या पैशाचा व्यवस्थित वापर होत नाही तसेच गार्डन मधील जागा शौचालयासाठी विनाकारण वापरली जात होती.            या काही गोष्टींमुळे तेथे राहणाऱ्या स्थानिक नागरिकांचा या नव्याने होत असलेल्या शौचालयाला विरोध आहे. ही तक्रार विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे यांच्याकडे स्थानिक नागरिकांसोबत नवीन पनवेलचे शेकाप नेते प्रभाकर कांबळे यांनी केली. सदरची गोष्ट संबंधित विभागातील अधिकारी राजेश कर्डिले यांच्यासोबत प्रत्यक्षरीत्या साईट विजीट करून नागरिकांच्या समवेत चर

वळवली गावात येत्या काळात अनेक विकासाची कामे होणार- माजी सभागृहनेते परेश ठाकूर

  पनवेल(प्रतिनिधी) वळवली गावात येत्या काळात अनेक विकासाची कामे होणार असल्याने हे गाव सुंदर आणि आदर्श गाव म्हणून ओळखले जाईल, असे मत पनवेल महानगरपालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांनी रस्त्याच्या कामाच्या भुमीपूजनावेळी केले. भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांमुळे महापालिका हद्दीतील अनेक विकासाची कामे मार्गी लागत आहेत. त्यापार्श्वभुमीवर महापालिकेच्या माध्यमातून वळवली गावातील मुख्य रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येणार आहे. या विकास कामाचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी भुमीपूजन झाले.        यावेळी माजी नगरसेवक माजी नगरसेवक हरेश केणी, महादेव मधे, माजी सरपंच शशिकांत शेळके, भाजपनेते कृष्णा चौधरी, वॉर्ड अध्यक्ष सचिन चौधरी, मारुती चिखलेकर, महिला मोर्चाच्या प्रतिभा भोईर, कृष्णा पालेकर, गोवर्धन पाटील, आनंत भोईर, विजय भगत, महेश पाटील, चंद्रकांत पाटील, हरिचंद्र पाटील, हरिचंद्र चौधरी, रुपेश म्हात्रे, कचेर भोईर, माजी उपसरपंच दिपक पाटील, जगदीश उगडा, चंद्रकांत पारधी,

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते महिला लेफ्टनंट ऑफिसर ऋचा दरेकर यांचा सत्कार

  पनवेल मधील प्रथम महिला लेफ्टनंट ऑफिसर म्हणुन नियुक्ती मिळवुन आपल्या कतृत्वाने उत्तुंग यश संपादन करून ऋचा दरेकर यांनी अभिमानास्पद कामगिरी बजावली आहे. त्यांना मिळालेल्या या भरघोस यशामुळे रायगडकरांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्याबद्दल जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी महाविद्यालयाच्या माध्यामतून ऋचा दरेकरचा सत्कार सोहळा शनिवारी आयोजित  करण्यात आला होत. यावेळी संस्थेचे चेअरमन तथा माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते ऋचा दरेकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे व्हाईस चेअरमन वाय. टी. देशमुख, पनवेल महापलिकेच्या माजी महापौर कविता चौतमोल, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, अॅडव्होकेट संजय पाटील, महाविद्यालयाचे प्राचार्य एस. के. पाटील, विजया कदम यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी आणि मान्यवर उपस्थित होते.

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून टेंभोडे गावात ओपन जिम

  भारतीय जनता पार्टीचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासकामे मार्गी लागत असून नागरीकांना विविध सुविधा मिळत आहेत. त्याअंतर्गत  टेंभोडे येथे गावात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या निधीमधून ओपन जिम बांधण्यात आली आहे. या जिमचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृहनेते परेश ठाकूर यांच्याहस्ते शनिवारी लोकार्पण झाले. यावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक हरेश केणी, महादेव मधे, आसुडगावचे माजी सरपंच शशिकांत शेळके, युवामोर्चा जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, अशोक गडगे, सचीन चौधरी, सुभाष भोईर, राघो कडव, संतोष भोईर, महिला मोर्चा तालुका चिटणीस प्रतिभा भोईर, मारुती चिखलेकर, संदिप भोईर, निवृत्ती भोईर, ललिता भोईर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

डायबिटीज जनजागृती मॅरेथॉनचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन

  पनवेल(प्रतिनिधी)  समाजात मधुमेहाविषयी जागरूकता आणि मधुमेह व्यवस्थापनात व्यायामाचे महत्त्व वाढवण्यासाठी रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल होरायझन आणि डायबेटीस हेल्थ फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष मॅरेथॉन रविवारी (दि. १३) नवीन पनवेल येथील डी मार्टसमोरील मैदानात आयोजित करण्यात आली होती. भारतीय जनता पक्षाचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते झेंडा दाखवून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. मधुमेह आणि त्याच्या संभाव्य गुंतागुंतीमुळे कुटुंब आणि समाजावर आरोग्यसेवेचा भार पडतो. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब व रोटरॅक्ट क्लब ऑफ पनवेल होरायझन आणि डायबेटीस हेल्थ फाउंडेशन ट्रस्टच्या वतीने मधुमेहाने त्रस्त व उपचार घेऊ शकत नसलेल्या गरजू, गरीब लोकांसाठी इन्सुलिन बँक संकल्पना आखण्यात आली आहे. या इन्सुलिन बँकेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना रेशनिंगच्या स्वरूपात इन्सुलिन उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या मॅरेथॉनमधून येणार्‍या डोनेशन रकमेचा उपयोग डायबिटीस हेल्थ फाउंडेशन चॅरिटेबल ट्रस्टकडून इन्सुलिन बँक उभारणीसाठी केला जाणार आहे. दोन गटांत झालेल्या या मॅरेथॉनमध्ये सुमारे ५००

संगीत शास्त्र सौंदर्य तत्व संकल्पनेला उजाळा देणारा कार्यक्रम; पंडित उमेश चौधरी यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध

  पनवेल(प्रतिनिधी) सुप्रसिद्ध सतारवादक  उस्ताद अझीम खान यांच्या संकल्पनेनुसार बोरिवलीतील प्रबोधनकार ठाकरे लघुनाट्यगृहात झालेल्या  'घराणा रंग' या संगीत   संवादात्मक  उत्सवात  पनवेलचे सुपूत्र तथा  सांस्कृतिक सेलचे तालुका अध्यक्ष  संगीत विशारद रायगड भूषण पंडित  उमेश   चौधरी यांच्या शास्त्रीय गायनाने रसिक श्रोते मंत्रमुग्ध झाले.  संगीत शास्त्र सौंदर्य तत्व आधारित संकल्पनेला उजाळा देणारा कार्यक्रम ठरला, त्यामुळे रसिकांनी या पर्वणीचा आनंद घेतल्याची पोचपावती त्यांची प्रशंसा करताना दिली.           संतांची भूमी असलेल्या महाराष्ट्राला संस्कृती आणि कलेचा वारसा आहे. त्यामुळे विविध क्षेत्रातील कलाकारांची मांदियाळी आहे. अशातच अनेक तप संगीत साधनेची सेवा करणारे या भूमीला लाभले आहेत. त्या अनुषंगाने शास्त्रीय संगीत साधनेचा जागर नवीन पिढीला अवगत व्हावा, यासाठी नादब्रह्म परिवार बोरिवलीच्या वतीने पंडित उमेश चौधरी यांच्या संगीत सुरमयी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.  प्रख्यात गायक उमेश चौधरी, संगीत शास्त्र तज्ज्ञ उस्ताद अजीम खान आणि संगीत रत्नाकर ग्रंथाचे निष्णात प्राचार्य विजया पाटील यांच्या स