Skip to main content

Posts

Showing posts from October, 2022

द पनवेल को. ऑपरेटिव्ह अर्बन बँक मध्यवर्ती निवडणुका करिता महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर धोंडू बडे व शहर प्रमुख पनवेल प्रवीण पोपटराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज

पनवेल प्रतिनिधी : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे साहेब यांच्या आदेशाने तसेच शिवसेना नेते तथा संपर्क नेते कोंकण विभाग सन्माननीय सुभाषजी देसाई साहेब यांच्या सूचनेनुसार तसेच शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड मा.श्री. शिरीष घरत साहेब यांच्या नेतृत्वाखाली द पनवेल को. ऑपरेटिव्ह अर्बन बँक मध्यवर्ती निवडणुका करिता महाविकास आघाडी मधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे चे अधिकृत उमेदवार शिवसेनेचे तालुका प्रमुख ज्ञानेश्वर धोंडू बडे व शहर प्रमुख पनवेल प्रवीण पोपटराव जाधव यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला. यावेळी शेकापचे आमदार बाळाराम पाटील, शिवसेना जिल्हासंपर्क प्रमुख बबनदादा पाटील, जिल्हासल्लागार शिरीष बुटाला, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटिल, महानगरप्रमुख एकनाथ म्हात्रे, महानगर समन्वयक दिपक घरत, उपमहानगरप्रमुख किरण तावदरे, रामदास पाटिल, शहर प्रमुख यतीन देशमुख, शेकापचे काशिनाथ काशीनाथ, राजेंद्र पाटील, राष्ट्रवादी कोंग्रेस चे सुदाम पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.

पनवेल अर्बन बँकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल

पनवेल(प्रतिनिधी) पुढील महिन्यात पनवेल अर्बन बँकेची निवडणूक असून या निवडणुकीकरिता भरतीत जनता पार्टीच्या उमेदवारांनी भाजपचे रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आज (दि. २७) आपले उमदेवारी अर्ज दाखल केले. उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी उमेदवारांनी पनवेल तालुका व शहर भाजपच्या कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, भाजपचे तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, शहर अध्यक्ष जयंत पगडे, जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, सचिन पाटील, सरचिटणीस राजेंद्र पाटील, कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, शहर सरचिटणीस माजी नगरसेवक नितीन पाटील, माजी उपमहापौर चारुशीला घरत, माजी नगरसेवक अनिल भगत, हरेश केणी, मनोहर म्हात्रे, बबन मुकादम, अमर पाटील, विकास घरत, विजय चिपळेकर, प्रदीप भगत, मुकीत काझी, माजी नगरसेविका नीता माळी, माजी पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, युवा नेते विनोद साबळे, ज्येष्ठ कार्यकर्ते कर्णा शेलार, प्रभाकर जोशी, ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, सरचिटणीस दशरथ म्हा

जनसभा वृत्तपत्राच्या १२ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन आ.प्रशांतजी ठाकूर यांच्या शुभहस्ते संपन्न

पनवेल (प्रतिनिधी)- जनसभा वृत्तपत्राच्या १२ व्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन भारतीय जनता पार्टी रायगडचे अध्यक्ष आमदार सन्माननिय प्रशांतजी ठाकूर यांच्या शुभहस्ते पनवेल येथे एका शानदार समारंभात संपन्न झाले. जनसभा हे वृत्तपत्र गेल्या १२ वर्षांपासून पनवेल-रायगड,नवी मुंबई,ठाणे आणि मुंबई या विभागातील जनतेच्या समस्यांना वाचा फोडण्याचे कार्य अविरतपणे करीत आहे.तसेच सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील घडामोडी मांडणारे प्रभावी माध्यम बनले आहे .बदलत्या काळाबरोबर जनसभाने कात टाकत YouTube.com/c/ JansabhanewsLive हे ट्यूब चैनल आणि www. Jansabha.page हे web portal सुरू करून दृक-श्राव्य आणि डीजिटल मिडीयामध्ये पदार्पण करून जनहिताचे आपले कार्य व्यापक आणि गतिमान केले आहे. अशा या सामाजिकदृष्टीकोन बाळगणाऱ्या वृत्तपत्राच्या प्रकाशनाप्रसंगी आमदार प्रशांतजी ठाकूर यांनी संपादक-आप्पासाहेब मगर आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या १२ वर्षाच्या कार्याचे कौतुक केले.त्याचबरोर जनसभाचा हा दिवाळी विशेषांक वाचनीय असून विविध सामाजिक,वैज्ञानिक विषयांबरोबर ललित लेख आणि कवितांसह साहित्याचा फराळ आपल्या वाचकांना देण्याचा प्रय

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते कोकण संध्या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

पनवेल / प्रतिनिधी : वृत्तपत्र सृष्टीमध्ये तब्बल सोळा वर्षांपूर्वी पनवेलच्या शासकीय विश्रामगृहामध्ये पेरलेले साप्ताहिक कोकण संध्या या वृत्तपत्राचा बघता-बघता सोळा वर्षांत महावृक्ष झाला आहे. असंख्य वाचक, जाहिरातदार, व्यावसायिक हितचिंतक आणि कोकण संध्या परिवारातील रायगड, ठाणे शहर व परिसरातील पत्रकार यांच्या परिश्रमाने आज साप्ताहिक कोकण संध्या एक वटवृक्ष रायगड, नवी मुंबई, ठाणे, मुंबई परिसरात उभा राहीला. वृत्तपत्र सृष्टीच्या गर्दीत साप्ताहिक कोकण संध्या तब्बल सोळा वर्ष यशस्वी   वाटचाल करीत वाचक, जाहिरातदार, हितचिंतक यांच्या कसोटीला उतरलेले रायगड, नवी मुंबई आणि ठाण्यातील एकमेव साप्ताहिक म्हणजे कोकण संध्या ठरले आहे. या सोळा वर्षांच्या आणि दिड दशकाच्या वाटचालीत अनेक अनुभव आणि अनुभवाच शिदोरी कोकण संध्या परिवाराच्या गाठीशी आहे. तब्बल १६ वर्षांचा काटकसरीचा वनवास आणि खडतर प्रवासाचा वनवास पूर्ण करीत सक्षमपणे सोळा वर्ष सुरळीत आणि अखंडित एकसंघ वाटचाल कोकण संध्या परिवाराने करून आता यंदा १७ व्या वर्षात पदार्पण करत आहे. दरम्यान या सोळा वर्षांच्या कालावधीत अनेक मित्र भेटले, नवीन जाहिरातदार यांच

खारघरमधील मोटर सायकल स्वाराची पत्रकारला मारहाण

दि.१० आॕक्टो. खारघर (प्रतिनिधी) :- खारघरमधील "नवलोकहित दृष्टी" या साप्ताहिकाचे संपादक संदेश सोनमळे काही कामानिमीत्त सेंट्रल पार्कच्या रस्त्यावरून मोटर सायकलवर जात असताना .एका अज्ञात मोटर सायकल स्वाराने काल रात्री ७:३० ते ८ :०० वाजताच्या सुमारास सेंट्रल पार्कच्या रस्त्यावरती वाहनाला बाजू देण्याच्या कारणांवरून मारहाण व शिविगाळ केली.संदेश सोनमळे यांनी याबाबतची तक्रार खारघर पोलीस स्थानकात दाखल केली असून पोलीस पुढील तपास करीत आहेत. मारहाण करणाऱ्या व्यक्तीच्या मोटर सायकलचा फोटो वरती देण्यात आला आहे.

राज्यातील सर्वात मोठ्या दिवाळी अंक स्पर्धेचा निकाल जाहीर; राज्यस्तरीय स्पर्धेत 'दुर्ग' ने तर जिल्हास्तरीय स्पर्धेत 'साहित्य आभा' ठरले मानकरी

 बक्षिसांच्या रक्कमेत भरघोस वाढ; राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाला ०१ लाख रुपये, जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकास ४० हजार रुपयांचे बक्षिस   पनवेल(प्रतिनिधी) शैक्षिणक, सामाजिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणाऱ्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या २१ व्या राज्यस्तरीय दिवाळी अंक स्पर्धेत 'दुर्ग' अंकाने तर रायगड जिल्हास्तरीय स्पर्धेत 'साहित्य आभा' य दिवाळी अंक प्रथम क्रमांकाच्या पारितोषिकाचे मानकरी ठरले, असल्याची  माहिती श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी आज (शुक्रवार, दि. ०७ ऑक्टोबर) येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत दिली. तर या दिवाळी अंक स्पर्धेपासून बक्षिसांच्या रक्कमेत वाढ केली असल्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी जाहीर केले. त्यामुळे राज्यस्तरीय स्पर्धेचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक ७५ हजारावरून ०१ लाख रुपये, तर जिल्हास्तरीय स्पर्धेत ३० हजारांचे बक्षिस ४० हजार रुपये करण्यात आले आहे. तसेच इतर पारितोषिक