Skip to main content

Posts

Showing posts from September, 2022

दिवाळी बोनसचा आगळावेगळा आणि भूतो न भविष्यतो असा करार;यंदा शेल इंडियाच्या कामगारांना मिळणार तब्बल ९५ हजार रुपये बोनस

पनवेल(प्रतिनिधी) औद्योगिक क्षेत्रात विशेषतः पगारवाढ किंवा तत्सम करारनामा होत असतो. मात्र तळोजा औद्योगिक क्षेत्रातील शेल इंडिया मार्केट लिमिटेड कंपनीमधील कामगारांसाठी दिवाळी बोनसचा आगळावेगळा आणि भूतो न भविष्यतो असा करार झाला आहे.       या करारानुसार यंदाच्यावर्षी दिवाळी बोनस म्हणून प्रत्येक कामगाराला तब्बल ९५ हजार रुपये बोनस मिळणार आहे. विशेष हि बाब येथेच थांबली नाही तर पुढच्या वर्षी ०१ लाख ०५ हजार तर त्याच्या पुढील वर्षी ०१ लाख १५ हजार रुपये कामगारांना बोनस मिळणार आहे. आणि कामगिरी केली आहे ती आमदार प्रशांत ठाकूर व कामगारनेते जितेंद्र घरत यांनी. त्यामुळे दिवाळीच्या एक महिन्यापूर्वीच या कंपनीतील ४० कामगारांची दिवाळी झाली आहे.             तळोजा औद्योगिक वसाहतीत शेल इंडिया लिमिटेड नामक ऑइल कंपनी आहे. या ठिकाणी पूर्वी कामगार काँग्रेसची कामगार संघटना कार्यरत होती. मात्र कामगारांनी आपल्या न्यायिक हक्कासाठी शेल इंडिया एम्प्लॉईज संघटनेचे आधारवड म्हणून कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांची सल्लागार तर अध्यक्ष म्हणून कामगारनेते जितेंद्र घरत यांच्या कार्याला पसंती दिली. देश

भारतीय जनता पार्टी, खारघर युवा मोर्च्याच्या वतीने सेवा पंधरवडाअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन

खारघर (प्रतिनिधी) दि.१८- भारतीय जनता पार्टी, खारघर युवा मोर्च्याच्या वतीने सेवा पंधरवडाअंतर्गत रक्तदान शिबिराचे आयोजन रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल येथे करण्यात आले. या रक्तदान शिबिरात अनेक युवकांनी तसेच विविध समाजाच्या व्यक्तीनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले. श्री साई ब्लड बँक पनवेल  यांच्या सहकार्याने रक्तदान शिबीर संपन्न झाले.        या शिबिराला उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष तथा आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल भाजप अध्यक्ष अरूणशेठ भगत, माजी सभागृहनेते परेश ठाकूर, खारघर मंडल अध्यक्ष ब्रिजेक्ष पटेल, युवा मोर्चा अध्यक्ष विनोद घरत, प्रदेश अल्पसंख्यांक सचिव मन्सूरभाई पटेल, भूपेंद्र पाटील ,माजी नगरसेवक हरीश केणी, अभिमन्यूशेठ पाटील, प्रवीण पाटील, नेत्रा पाटील, अनिता पाटील, रामजी बेरा, शत्रुघ्न काकडे, नीलेश बाविस्कर, अॅडव्होकेट नरेश ठाकूर, जिल्हा चिटणीस गीता चौधरी, सरचिटणीस दीपक शिंदे, उपाध्यक्ष दिलीप जाधव, बीना गोगरी, रमेश खडकर, वासुदेव पाटील, अमर उपाध्याय , शुभ पाटील,अक्षय पाटील , अंबालाल पटेल,सचिन वासकर, प्रभाकर जोशी, ऍड. इर्शाद पटेल, गिरीश गुप्ता, शैलेंद्र त्रिपाठी , नवनीत मारू, फुलाजी ठाकू