Skip to main content

Posts

Showing posts from August, 2022

महाराष्ट्रात प्रथमच एचएम मोटार्सच्या माध्यमातून हिरो मोटार सायकल व स्कुटर सर्व्हिस आपल्या दारी हि अनोखी सेवा - माजी.विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे

नवीन पनवेल : देशात दुसरे व महाराष्ट्रात प्रथमच एचएम मोटार्सच्या माध्यमातून हिरो मोटार सायकल व स्कुटर सर्व्हिस आपल्या दारी हि अनोखी सेवा आजपासून सुरु झाली असून त्याचा फायदा सर्व मोटार सायकल धारकांना होणार आहे. यामुळे गाडीमालकांचे वेळ , पैसा व पेट्रोलची बचत होणार आहे त्यामुळे त्याचा फायदा निश्चितच होईल असे प्रतिपादन पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी सदर सेवेच्या उदघाटनाप्रसंगी केले.   या वेळी मा जी . विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्यासह झोनल सर्व्हिस हेड दि नेश खंडेलवाल , एचओ स्ट्रॅटेजी अँड प्लॅनिंग विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक अजय रैना , व्यवस्थापक आशिष धौंडियाल , एचएम मोटर्सचे मालक मनोज सुचक , सुनील सुचक , सीईओ हर्षल सुचक , सीईओ सिद्धार्थ सुचक आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना झोनल सर्व्हिस हेड दिनेश खंडेलवाल यांनी सांगितले कि ,प्रायोगिक तत्वावर हि सेवा सुरु केली असून एका वेळी १५ ते १६ गाड्यांचे सर्व्हिसिंग व इतर छोटी मोठी कामे करण्यात येणार आहे. सदर गाडी हि त्या-त्याठिकाणी जाऊन हि सेवा देणार असल्याने त्याचा फायदा गाडीम

आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरचे सुयश

पनवेल(प्रतिनिधी) जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खांदा कॉलनी मधील चांगू काना ठाकूर आर्टस्, कॉमर्स आणि सायन्स कॉलेजतर्फे रौप्य महोत्सवानिमित्त आंतर महाविद्यालयीन फूटबॉल स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूल खारघरमधील विद्ययार्थ्यांच्या तीन संघांनी सहभाग घेतला होता. विशेष म्हणजे या तीनही संघांनी चमकदार कामगिरी करत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.           या तीनही संघाचे जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष आमदार चेतन तुपे, पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, पुणे विभाग सहाय्यक अधिकारी शंकर पवार, यांनी अभिनंदन केले. तसेच प्राचार्या राज अलोनी, क्रीडा प्रशिक्षक मंदार मुंबईकर, विशाल फडतरे यांचे यांचे विशेष कौतुक करून अभिनंदन केले.    -

हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी केले कौतुक

पनवेल(प्रतिनिधी)-  लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलने विशेष प्राविण्यासह अव्वल स्थान मिळवत राज्यस्तरीय स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२१-२२ पटकाविला त्याचबरोबर हा बहुमान मिळवणारे रायगड, नवी मुंबई मधील एकमेव विद्यालय ठरले आहे. त्या अनुषंगाने  रयत शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष तसेच हडपसर मतदार संघाचे आमदार चेतन तुपे, पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे यांनी आज या विद्यालयाला सदिच्छा भेट देऊन लोकनेते रामशेठ ठाकूर तसेच शिक्षक वर्गाचे भरभरून कौतुक केले.  यावेळी रयत शिक्षण संस्थेच्या पुणे विभागाचे सहाय्यक अधिकारी शंकर पवार, जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, रायगड विभाग पीआरओ बाळासाहेब कारंडे,  रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलच्या प्राचार्या राज अलोनी, वास्तुविशारद श्री. पांचाळ आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आमदार चेतन तुपे,  पश्चिम विभाग चेअरमन राम कांडगे तसेच इतर मान्यवरांचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी पुष्पगुच्छ व लोकनेता पुस्तक देऊन स्वागत सत्कार केले.