लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'राम कृष्ण हरी' चा गजर करीत ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकारांचा गौरव
पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'राम कृष्ण हरी' चा गजर करीत ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार यांचा गौरव करण्यात आला.
खांदा कॉलनीमधील श्री कृपा सभागृहात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी झालेल्या या सोहळ्यास माजी मंत्री संजय भेंगडे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप आध्यात्मिक सेल जिल्हा संयोजक काशीनाथ पारठे, उप महापौर सिताताई पाटील, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक हरेश केणी, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, नगरसेविका दर्शना भोईर, पुष्पा कुत्तरवडे, रुचिता लोंढे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, अमोघ ठाकूर, शशिकांत शेळके, एकनाथ देशेकर, माजी नगरसेविका निता माळी, सुहासिनी केकाणे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते .
यावेळी बोलताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी, आज माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून येथे साधू संतांचा सत्कार झाला याबद्दल मला अतिशय आनंद होत आहे. साधू- संतांच्या सहवासात एक ऊर्जा मिळत असते. त्यांच्या सोबत थोडा जरी वेळ घालवला तर आपल्या आयुष्याचे भले होऊ शकते अशी त्यांच्या वाणी मध्ये ताकद असते. ज्ञानेश्वर आणि तुकराम महाराजांची वाणी ते आपल्या पर्यंत पोहचवत असतात अशा या साधू संतांचा सत्कार करण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांचे हस्ते पदमाकर महाराज, पुरुषोत्तम महाराज, आप्पा पांचाळ , गोविंद महाराज, सीताराम महाराज, बाळासाहेब लाड, चंद्रकला आई यांच्यासह १६३ ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार यांचा गौरव भगवान विठ्ठल- रखूमाईची मुर्ती, उपरणे व तुलसीचे रोपटे देऊन करण्यात आला. यावेळी कीर्तनकार व प्रवचनकार यांनीही लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सत्कार करून त्यांना अभिष्टचिंतन केले.
यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले कि, तुमच्या पारायणाचे पुण्य आम्हालाही तुमच्या कुटुंबाचा एक भाग असल्याने लाभत आहे. तुमच्यामुळे सकारात्मक ऊर्जा या परिसराला मिळते. देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करीत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा विकासाचा वारू वेगवेगळ्या दिशेने धावत असताना त्यांची किर्ती जगाच्या पातळीवर उंचावत आहे. त्यांच्या पंतप्रधान पदाला ही आठ वर्ष पूर्ण होत असल्याने 'आठ वर्ष सेवा पुर्ततेची, गरीब कल्याणाची' असा उपक्रम भारतीय जनता पक्षाने सुरू केला आहे. त्यात आज दुग्ध शर्करा योग म्हणजे लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७१ वा वाढदिवस आहे. वाढदिवसाच्या पूर्व संध्येला आपल्या सारख्या सकारात्मक ऊर्जा देणार्या संतांचा सत्कार केला पाहिजे या भावनेतून आम्ही हा कार्यक्रम आयोजित केला असल्याचेही त्यांनी यावेळी नमूद केले.
कोट- : महाराष्ट्र आणि देश ज्यांच्या आशीर्वादाने आणि विचाराने टिकला. हिंदुत्वाचे वेगळे नाते ज्यांनी संपूर्ण जगाला दाखवून दिले त्या कीर्तनकार आणि प्रवचनकारांच्या सन्मानाला येण्याची संधी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त मिळाली हे खर्या अर्थाने माझे भाग्य समजतो. अशा प्रकारचा सत्कार आयोजित केल्याबद्दल आयोजकांना धन्यवाद देतो. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी जगतगुरू संत तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या लोकार्पण सोहळ्याला येत आहेत, त्यावेळी उपस्थित राहण्यासाठी आपल्याला निमंत्रण देतो. - संजय भेंगडे , माजी राज्य मंत्री
Comments
Post a Comment