दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात ४ कोटी ७३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन
पनवेल(प्रतिनिधी) सर्वसामान्यांचे आधारवड असलेले दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील पेंधर, ओवे, धरणा कॅम्प, पिसार्वे, तुर्भे, घोटचाळ, घोट, नागझरी, देवीचापाडा, पालेखुर्द या ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या एकूण ४ कोटी ७३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.०२) करण्यात आले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती 'अ' मधील पेंधर गावातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व गटार बनविणे, प्रभाग क्रमांक ३ मधील ओवे गावात नवीन जलवाहिन्या टाकणे, प्रभाग क्रमांक १ मधील धरणा कॅम्प गावातील अंतर्गत गटारे बांधणे, पिसार्वे गावातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व गटार बनविणे, तुर्भे गावातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व गटार बनविणे, घोटचाळ गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, घोट गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे व आरसीसी गटार बांधणे, नागझरी गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, प्रभाग क्रमांक २ मधील देवीचापाडा येथे गटार बांधणे, रस्ता डांबरीकरण आणि समाज मंदिराचे बांधकाम करणे, तसेच पालेखुर्द गावातील गणेश मंदिर ते स्मशानभूमी पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण आणि आरसीसी गटार बांधणे या विकासकामे करण्यात येणार असून या कामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
या भूमिपूजन सोहळ्यास उपमहापौर सीता पाटील, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, प्रभाग समिती सभापती संजना कदम, नगरसेवक हरेश केणी, संतोष भोईर, दिनेश केणी, भाजपचे तालुका उपाध्यक्ष सचिन पाटील, मन्सूर पटेल, कृष्णा पाटील, गौरव भोईर, विनोद पाटील, राम पाटील, अशोक साळुंखे, युवा नेते दिनेश खानावकर, नंदकुमार म्हात्रे, समीर कदम, संतोषबुवा पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.
Comments
Post a Comment