Skip to main content

Posts

Showing posts from June, 2022

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार प्रशांत ठाकूर यांनीही केले रक्तदान 

पनवेल(प्रतिनिधी) सर्वसामान्यांचे आधारवड व दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त भारतीय युवा मोर्चा पनवेल शहर व ग्रामीण तर्फे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, शहर अध्यक्ष जयंत पगडे यांच्यासह ७१ रक्तदात्यांनी रक्तदान केले.             पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या या शिबिरास भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत, महापालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, नगरसेवक मनोज भुजबळ, नगरसेविका चारुशीला घरत, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य राज पाटील, भूपेंद्र पाटील, युवा मोर्चाचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, युवा नेते दिनेश खानावकर, चिन्मय समेळ, गौरव कांडपिळे, मयूर कदम, आकाश भाटी, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

दानशूर व्यक्तिमत्व लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून महापालिका क्षेत्रातील ग्रामीण भागात ४ कोटी ७३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन

पनवेल(प्रतिनिधी) सर्वसामान्यांचे आधारवड असलेले दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातील पेंधर, ओवे, धरणा कॅम्प, पिसार्वे, तुर्भे, घोटचाळ, घोट, नागझरी, देवीचापाडा, पालेखुर्द या ग्रामीण भागात करण्यात येणाऱ्या एकूण ४ कोटी ७३ लाख रुपयांच्या विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर व तालुकाध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत आज (दि.०२) करण्यात आले.  पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील प्रभाग समिती 'अ' मधील पेंधर गावातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व गटार बनविणे, प्रभाग क्रमांक ३ मधील ओवे गावात नवीन जलवाहिन्या टाकणे, प्रभाग क्रमांक १ मधील धरणा कॅम्प गावातील अंतर्गत गटारे बांधणे, पिसार्वे गावातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व गटार बनविणे, तुर्भे गावातील रस्त्यांचे कॉक्रीटीकरण व गटार बनविणे, घोटचाळ गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे, घोट गावातील रस्त्यांचे काँक्रीटीकरण करणे व आरसीसी गटार बांधणे, नागझरी गावातील रस्त्यांचे काँक्रीट

वाढदिवसानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव

पनवेल(प्रतिनिधी) अफाट लोकप्रियता असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे ७१ व्या वाढदिवसानिमित्त सामाजिक, शैक्षणिक, कला, क्रीडा, राजकीय, वैद्यकीय अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हितचिंतक नागरिकांनी अभिष्टचिंतन करून शुभेच्छांचा वर्षाव केला.  सर्वसामान्यांचा आधारवड असेलेले लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी नेहमीच समाजातील प्रत्येक घटकासाठी मदतीचा ओघ दिला आहे.  महापूर असो वा कोरोना वैश्विक महामारी किंवा कुठलीही आपत्ती लोकांवर आलेले संकट आपले आहे, असे मानून लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सतत कार्य केले आहे. वाढदिवसाचे निमित्त असले तरी वर्षभर विविध समाजोपयोगी उपक्रम राबविणारे महाराष्ट्रातील उतुंग व्यक्तिमत्व म्हणून सुपरिचित आहेत. मागील वर्षी कोरोना वैश्विक महामारीच्या अनुषंगाने वाढदिवस घरगुती व साध्यापणाने साजरा झाला असला तरी तब्बल ०१ लाख कुटुंबांना सामाजिक बांधिलकीतून जीवनावश्यक वस्तू तसेच कोरोनाच्या अनुषंगाने वैद्यकीय सामुग्री देऊन त्या कुटुंबाचे जीवन सुरक्षित केले होते. यंदा वाढदिवसानिमित्त ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार यांचा सन्मान सोहळा, ज्येष्ठ नागरिकांचा सत्कार, रक्तदान शिबी

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून 'राम कृष्ण हरी' चा गजर करीत ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकारांचा गौरव

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पक्ष पनवेलतर्फे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या ७१ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून  'राम कृष्ण हरी' चा गजर करीत ज्येष्ठ कीर्तनकार व प्रवचनकार यांचा गौरव करण्यात आला.      खांदा कॉलनीमधील श्री कृपा सभागृहात लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी झालेल्या या सोहळ्यास माजी मंत्री संजय भेंगडे, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, भाजप आध्यात्मिक सेल जिल्हा संयोजक काशीनाथ पारठे, उप महापौर सिताताई पाटील, भाजप शहर अध्यक्ष जयंत पगडे, उत्तर रायगड जिल्हा संघटन सरचिटणीस अविनाश कोळी, जिल्हा उपाध्यक्ष प्रल्हाद केणी, तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, कामोठे मंडल अध्यक्ष रवींद्र जोशी, खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेश पटेल, नगरसेवक हरेश केणी, मनोहर म्हात्रे, एकनाथ गायकवाड, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, नगरसेविका दर्शना भोईर, पुष्पा कुत्तरवडे, रुचिता लोंढे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, अमोघ ठाकूर, शशिकांत शेळके, एकनाथ देशेकर, माजी

खारघर वसाहती मधील नागरी समस्या त्वरीत सोडविण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची पनवेल महानगर पालिकेकडे मागणी.

खारघर वसाहती मधील नागरी समस्या त्वरीत सोडविण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस ची पनवेल महानगर पालिकेकडे मागणी पनवेल दि ०२( संजय कदम): खारघर वसाहती मधील नागरी समस्या त्वरीत सोडविण्याची राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या पदाधिकाऱ्यांनी पनवेल महानगर पालिकेकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष तथा पनवेल महानगरपालिकेचे नगरसेवक सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल महानगर पालिकेच्या अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर यांची भेट घेतली. या वेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे कार्याध्यक्ष शहबाज फारूक पटेल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते, लवकरच पावसाळा सुरु होत आहे या पावसाळ्यामध्ये खारघर मधील सर्वच रस्त्यावर झाडांची वाढ झाली आहे. या वाढलेल्या फांद्या किंवा झाडांची पाने यांची छाटणी करणे अत्यंत गरजेचे आहे. खारघर हिरानंदानी पासून ते सेक्टर ४० पर्यंत रस्त्यावर असणाऱ्या झाडांच्या फांद्या वेळोवेळी छाटणे गरजेचे बनले आहे त्यामुळे अपघात टळण्यास मदत होणार आहे त्याचप्रमाणे गटारांची साफसफाई, मोठे नाले साफ करणे, रस्त्यातील खड्डे बुजविणे आदी कामे पनवेल मह