एमजीएम डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबई कामोठे यांनी पाळला तंबाखू निषेध दिन ; काढली जनजागृती रॅली "
पनवेल,दि.३१ (संजय कदम ) : विश्व तंबाखू निषेध दिवस म्हणजेच आजच्या 31 मे 2022.रोजी एमजीएम डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबई कामोठे यांनी तंबाखू निषेध दिननिमित्त याचा निषेध करून सामान्य जनतेसाठी जनजागृती रॅली विध्यार्थ्यानी काढली होती .
यानिमित्ताने आज सकाळी मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरातून निषेधात्मक रॅली विध्यार्थ्यानी काढली होती . यावेळी निषेधात्मक घोषणा देण्यात आल्या पर्यावरणासाठी हानिकारक आहे हा तंबाकू अश्या निषेधाचे फलक सुद्धा हाती घेऊन विध्यार्थ्यानी याचा निषेध केला . श्रीवल्ली नटराजन, डीन, एमए डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, कामोठे , नवी मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली "तंबाखू हा पर्यावरणाला धोकादायक आहे अशी रॅली मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरात काढण्यात आली व स्थानिक नागरिकांना तंबाकू सेवन करू नका असे आवाहन करण्यात आले तसेच तंबाकू निर्मित कुठलेही पदार्थ व तंबाखू उत्पादनांच्या निर्मिती आणि सेवनामुळे होणारे नुकसान याबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी डॉ. दीक्षा शेट्टी, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागाच्या प्रमुख आणि डॉ. . पंकज लोखंडे सहाय्यक प्राध्यापक, पब्लिक हेल्थ डिपार्टमेंट ऑफ डेंटल आणि एमएएम डेंटल अँड हॉस्पिटलचे इंटर याच्यासह इतर प्राचार्य आणि विध्यार्थी सहभागी झाले होते.
फोटो -एमजीएम च्या विद्यार्थ्यांनी काढली रॅली
Comments
Post a Comment