Skip to main content

Posts

Showing posts from May, 2022

लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त ०५ जूनला उलवा नोडमध्ये 'भव्य सायक्लोथॉन स्पर्धा' 

पनवेल(प्रतिनिधी) सर्वसामान्यांचा आधारवड असलेले माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७१ वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०५ जून रोजी सकाळी ०६ वाजता उलवा नोडमध्ये 'भव्य उलवे सायक्लोथॉन २०२२ स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे.           सायकल चालविण्याचे अनेक फायदे आहेत, त्या अनुषंगाने सायकल संस्कृती वाढावी व सायकलबद्दल आवड निर्माण व्हावी, या हेतूने या स्पर्धेचे आयोजन उलवा नोडमधील रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले आहे. हि स्पर्धा महिला व पुरुष प्रकारात आणि २५ किमी, १५ किमी, १० किमी व ०३ किमी अंतर या चार गटात होणार असून या स्पर्धेतील विजेत्यांना भरघोस पारितोषिकांनी सन्मानित करण्यात येणार आहे. विशेष आकर्षण असलेल्या २५ किलोमीटर अंतराच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणाऱ्यास २० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास १० हजार रुपये, तृतीय क्रमांकास ०५ हजार रुपये, चतुर्थ व पाचव्या क्रमांकास अनुक्रमे ०

एमजीएम डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबई कामोठे यांनी पाळला तंबाखू निषेध दिन ; काढली जनजागृती रॅली "

पनवेल,दि.३१ (संजय कदम  )  :  विश्व तंबाखू निषेध दिवस म्हणजेच आजच्या  31 मे 2022.रोजी एमजीएम डेंटल कॉलेज अँड हॉस्पिटल नवी मुंबई कामोठे  यांनी  तंबाखू निषेध दिननिमित्त याचा निषेध करून सामान्य जनतेसाठी जनजागृती रॅली विध्यार्थ्यानी  काढली होती .                             यानिमित्ताने आज सकाळी मानसरोवर रेल्वे स्टेशन परिसरातून निषेधात्मक रॅली विध्यार्थ्यानी  काढली होती . यावेळी निषेधात्मक घोषणा देण्यात आल्या पर्यावरणासाठी हानिकारक आहे हा तंबाकू अश्या निषेधाचे फलक सुद्धा हाती घेऊन   विध्यार्थ्यानी   याचा निषेध केला .  श्रीवल्ली नटराजन, डीन, एमए डेंटल कॉलेज आणि हॉस्पिटल, कामोठे , नवी  मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली  "तंबाखू हा  पर्यावरणाला धोकादायक आहे अशी रॅली  मानसरोवर रेल्वे  स्टेशन परिसरात काढण्यात आली व स्थानिक नागरिकांना तंबाकू सेवन करू नका असे आवाहन करण्यात आले तसेच  तंबाकू निर्मित कुठलेही पदार्थ व तंबाखू उत्पादनांच्या निर्मिती आणि सेवनामुळे होणारे नुकसान याबाबत जनजागृती करण्यात आली यावेळी डॉ. दीक्षा शेट्टी, सार्वजनिक आरोग्य दंतचिकित्सा विभागाच्या प्रमुख आणि डॉ. . पंकज

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे लोकार्पण व साहित्य वाटप कार्यक्रम

पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नवीन पनवेलमध्ये विकासकामांचे लोकार्पण व साहित्य वाटप कार्यक्रम ०१ जून रोजी रात्री ८. ३० वाजता भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आणि महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे.          भाजपच्या नगरसेविका सुशीला घरत यांच्या नगरसेवक निधीतून बांठिया हायस्कूल, दत्त मंदिर व कालिका माता मंदिर सेक्टर १३ आणि १४ येथे उभारण्यात आलेल्या तीन हायमास्टचे लोकार्पण, सीकेटी विद्यालय जवळील मँगो गार्डनमध्ये तसेच सेक्टर १३ मधील शिव मंदिर जवळील टेकडी गार्डन येथे ओपन जिमचे लोकार्पण, त्याचबरोबर डस्टबीन आणि प्रभाग १७ मध्ये बेंचचे वाटप करण्यात येणार आहे.  नगरसेविका सुशीला घरत यांच्या नवीन पनवेल येथील जनसंपर्क कार्यालयात होणाऱ्या या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून महापौर डॉ. कविता चौतमल, भाजपचे ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख, तालुकाध्यक्ष अरूणशेठ भगत, शहराध्यक्ष जयंत पगडे, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा नाईक, माजी

लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त पत्रकार मित्र असोसिएशनतर्फे हनुमान चालीसा पठण व महामृत्युंजय मंत्राचा जप*

पनवेल / प्रतिनिधि : दानशूर व कणखर नेतृत्व तसेच सर्वसामान्य लोकांचा आधारवड असलेले लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांचा गुरुवार दिनांक ०२ जून रोजी ७१ वा वाढदिवस आहे. गेल्यावर्षी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७० व्या वाढदिवसाचे औचित्य साधून ७० कार्यक्रम राबविण्याचा संकल्प पत्रकार मित्र असोसिएशनचे अध्यक्ष तथा पत्रकार केवल महाडिक यांनी केला व सर्व कार्यक्रम यशस्वीरित्या राबविले. यावर्षी देखील त्यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला असून लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांना दिर्घायुष्य लाभावे व त्यांची प्रकृती नेहमी उत्तम राहावी यासाठी लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या ७१ व्या वाढदिवसानिमित्त बुधवार दिनांक १ जून २०२२ रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत पनवेल शहरातील श्री मारुती देवस्थान लिमये वाचनालयाच्या बाजूला असलेल्या हनुमान मंदिरात हनुमान चालीसा पठण व महामृत्युंजय मंत्राचा जप करण्याचे आयोजिले आहे. तरी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या सर्व हितचिंतकांनी व त्यांना मानणाऱ्या लोकांनी याठिकाणी उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक केवल महाडिक यांनी केले आहे.

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त सायक्लोथाॕन संदर्भात जनजागृती रॕली

पनवेल(प्रतिनिधी) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा ७१ वा वाढदिवस आणि जागतिक पर्यावरण दिनानिमित्त रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, उलवे सेना सामाजिक संस्था व सायकलिस्ट क्लब ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दिनांक ०५ जून रोजी उलवा नोडमध्ये 'भव्य सायक्लोथॉन स्पर्धा' आयोजित करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने सायक्लोथॉनचे महत्व नागरिकांना पटवून देण्यासाठी  रविवार दिनांक २९ मे रोजी उलवे नोडमध्ये जनजागृती रॅली काढण्यात आली.  रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे सीईओ व पनवेल महानगरपालिका सभागृह नेते परेश ठाकूर व भाजपचे तालुकाध्यक्ष अरुण शेठ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या रॅलीमध्ये गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते हेमंत ठाकूर, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स चे सदस्य भार्गव ठाकूर,  अजय भगत, जयवंत देशमुख शेखर काशीद  युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेटकर, ऍड. चेतन जाधव, सत्यवान नाईक, युवा मोर्चाचे शहर अध्यक्ष रोहित जगताप  चिन्मय समेळ, पल्लवी सुर्वे, अनिल सणस,  विलास साळवे, श्री. सिंह, अक्षय सिंग, अर्जुन भगत, रो