पनवेल/ प्रतिनिधी:- पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्यावतीने पंचशील नगर,नवीन पनवेल येथे दि.१३,१४,१५ आणि १६ एप्रिल अशी एकूण सतत ४ दीवस विविध सामाजिक व सांस्रोकृतिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. यामधील कार्यक्रम दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी भीम गीताचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला आणि रात्री १२-०० नंतर पनवेलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शेकडो अनुयायांनी मेणबत्त्या लावून बाबासाहेबांना अभिवादन केले.
दिनांक १४ एप्रिल रोजी बुद्ध विहार पंचशील नगर येथे चित्रा देशमुख यांच्यामार्फत वही-पेन वाटप करण्यात आले. तसेच डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून भीम गीता वरती हजारो बंधू-भगिनी भीम अनुयायांनी उपस्थित राहून वाजत- गाजत मनसोक्त नाचून मिरवणुकीचा आनंद लुटला.मिरवणुकीत प्रदीप गायकवाड यांनी महाखीर दान तसेच अनील पटेकर यांनी जिलेबी वाटप केले.दिनांक १५ एप्रिल रोजी रात्री समाजप्रबोधनाचा चित्रपट एलसीडी वरती दाखवण्यात आला. दि.१६ एप्रिल रोजी स्थानिक लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
चार दिवस दिवाळी प्रमाणे पंचशील नगर मध्ये ठेवण्यात आलेल्या जयंतीला हजारो लोकांनी उपस्थिती दाखवली. हे कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देणगीदारांनी सढळ हाताने देणग्या दिल्या तसेच पंचशील नगर रहिवासी सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शंकर वायदंडे, उपाध्यक्ष अशोक आखाडे, सचिव राहुल पोपलवार, सहसचिव विनोद खंडागळे, खजिनदार भानुदास वाघमारे, सदस्य संतोष ढोबळे, अमेय इंगोले आदी सर्व कमिटी आणि अमन तायडे,अविनाश पराड,करण बोरुडे, अजय भट,आदित्य लोखंडे अशा अनेक तरुणांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे योगदान दीले.
Comments
Post a Comment