Skip to main content

लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवा..पनवेल भाजपाचे राज्य सरकारविरोधात ‘कंदील’ आंदोलन


पनवेल(प्रतिनिधी) अघोषित लोडशेडिंग आणि वीजवसुलीच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. पनवेल शहर भाजपाकडून सोमवारी सायंकाळी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपाने उत्तर रायगड जिल्हाध्यक्षग आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 'कंदील आंदोलन' केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवण्याची मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. महावितरण कंपनीच्या अघोषित भारनियमनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनात आमदार प्रशांत ठाकूर, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष के. सी. पाटील, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर, तालुकाध्यक्ष आनंद ढवळे, शहराध्यक्ष रोहित जगताप, भाजपचे शहर सरचिटणीस अमरीश मोकल, संजय जैन, गोपीनाथ मुंढे, माधुरी कोडरू, अभिषेक भोपी, किशोर सुरते, केदार भगत,  यांच्यासह भाजप कार्यकर्ते यांच्यासह पनवेलकरसहभागी झाले होते.

कोट- देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देश विविध क्षेत्रात आघाडी घेत आहे. पण जे जे भाजप करेल त्याच्या उलट करण्याचे ठरवल्यामुळे महाविकास आघाडी प्रत्येक पातळीवर अपयशी ठरतंय. कोळशाचा तुटवडा होत असताना बाकीची राज्ये उपाययोजना करीत होती. मग महाराष्ट्राला काय अवघड होते. विविध रिपोर्ट सांगतायत कि, या स्थितीमध्ये महाराष्ट्राला सर्वात जास्त कोळसा देण्याचे काम केंद्राकडून झाले आहे पण या महाविकास आघाडी सरकारला कृत्रिम टंचाई निर्माण करायची होती व त्या अनुषंगाने महागड्या दराने वीज खरेदी करायची होती, खिसे भरायचे होते आणि या उद्देशाने टंचाई होऊ दिली.  त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी कुठे घोषित तर अघोषित भारनियमन सुरु आहे. वीज महागड्या दराने खरेदी त्याची वाढीव दराने ग्राहकांना बिले देण्यात येत आहे त्यामुळे जनता प्रचंड संतापली आहे. या जनतेच्या वतीने हे कंदील आंदोलन केले आहे. वीज ग्राहक हा वीज वितरणाचा कायमचा ग्राहक आहे, आणि त्याला स्पर्धा नाही आहे कि तो दुसऱ्या कडून वीज खरेदी करेल अशा स्थितीत सुरक्षा अनामत रक्कम घेणे अन्यायकारक आहे,  त्यामुळे त्याचा व भारनियमनचा आणि महाविकास आघाडीचा आम्ही निषेध करतो. -आमदार प्रशांत ठाकूर 

यावेळी पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महाविकास आघाडीच्या सरकारवर टीकेची झोड उठविताना सांगितले की, गेल्या सुमारे तीन आठवड्यांपासून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहकांच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्रे अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे. विजेची मागणी कमी असतानाच्या काळात करावयाची देखभाल दुरुस्तीची कामे ऐन उन्हाळ्यात हाती घेऊन सरकारने वीजटंचाईच्या समस्येत भर घातली आहे. तसेच सरकारी कार्यालयांची बिले थकविणारे व ग्राहकांची लुबाडणूक करणारे आघाडी सरकार हेच असून तातडीने थकबाकीची रक्कम वीज मंडळास देऊन वाढीव सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा, असा इशारा यावेळी परेश ठाकूर यांनी दिला. यावेळी सरकारच्या बेशिस्तीमुळे वीज मंडळाचा कारभार ढासळला आहे. तसेच देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर असताना भारनियमनमुक्त असलेल्या महाराष्ट्रावर आघाडी सरकारने पुन्हा वीजटंचाई लादली, असा आरोपही भारतीय जनता युवा मोर्चाचे उत्तर जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांनी केला

Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.