उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील घारापुरी येथील लेण्यांच्या देखभालीसाठी एस.आय .एस या कंपनीचे सिक्युरिटी गार्ड तैनात आहेत.मात्र सदरचे सर्व सिक्युरिटी गार्ड हे परप्रांतीय असल्याने घारापुरी येथील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीवर घेण्याचा आग्रह ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांनी कंपनीकडे केला होता.त्याप्रमाणे सन 2018 पासुन भारतीय पुरातत्त्व विभाग व एस.आय.एस.सिक्युरिटी कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला होता.त्याप्रमाणे सदरच्या कंपनीने सुरूवातीला तीन सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीवर रुजू करून घेतले असून लवकरच प्रलंबित असलेल्या अर्जदारांनाही नोकरीची संधी मिळणार आहे.सिक्युरिटी गार्ड म्हणून भरती करण्यासाठी योग्य ते सहकार्य राजिप सदस्य विजय भोईर यांनी केले.स्थानिक भूमीपुत्रांना सेक्युरिटी गार्ड म्हणून रोजगार उपलब्ध झाला आहे. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुढेही उपलब्ध होणार असल्याने स्थानिक भूमीपुत्रांनी, ग्रामस्थांनी सरपंच बळीराम ठाकूर, घारापुरी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे आभार मानले आहे. स्थानिक भूमीपुत्रांना आहे त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण्याचा सरपंच बळीराम ठाकूर यांनी निर्धार केला असून त्या दृष्टीने प्रयत्न चालू असल्याचे सरपंच बळीराम ठाकूर यांनी सांगितले.
खारघर : किरण गिते यांच्या वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे . खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता घेण्यात येणार असून संध्याकाळी साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .
Comments
Post a Comment