सीवूडमध्ये वैसाखी मेला कार्यक्रमासह " गोल गप्पे " आणि " " तस्करी " चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर यांच्यामाध्यमातून प्रमोशन
नवी मुंबई दि. २४ (प्रतिनिधी) : शीख समुदाय नवीन वर्ष म्हणून बैसाखी साजरी करतात. या काळात पिके परिपक्व होऊन त्यांची काढणी होते, त्याच्या आनंदात हा सणही साजरा केला जातो. त्याला धार्मिक महत्त्वही आहे. शीखांचे १० वे गुरु गोविंद सिंग यांनी १३ एप्रिल १६९९ रोजी बैसाखीच्या मुहूर्तावर खालसा पंथाची स्थापना केली होती, त्यामुळे शीख समुदायासाठी बैसाखीचे विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथे ' आया वैसाखी मेला' कार्यक्रम पार पडला. यावेळी जणू 'पंजाब नवी मुंबईत अवतरला असल्याचा भास होता होता. या रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन निर्वैर प्रॉडक्शन, व्हॅल्यू ऑफ स्माइल संस्था, अकाल ज्योत सेवक ज्यथा, चरडी कला स्पोर्ट्स अँड सोशल असोसिएशन यांनी केले होते.
प्रसिद्ध गायक रंधावा ब्रदर्स, मनजीत सिंग सोही आणि कबाल सरूपवाली यांनी काही चमकदार बैसाखी आणि त्यांची इतर सुप्रसिद्ध गाणी ऐकून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रजत बेदी, अभिनेता आणि निर्माता (कोई मिल गया, पार्टनर, जोडी नंबर १, आंतरराष्ट्रीय खिलाडी), अभिनेत्री इहाना ढिल्लन (राधे, भुज, हेट स्टोरी), अभिनेत्री जास्मिन भसीन (नागिन, बिग बॉस, खतरों के खिलाडी), एम चंद्रमौली (केजीएफच्या अध्याय १ आणि २ चे लेखक), चिता यज्ञेश शेट्टी अभिनेता, निर्माता आणि एक्का मार्शल आर्ट तज्ज्ञ आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते सिमरजीत सिंग आणि अमृत राज , सिंगश्रीदेवी शेट्टी, सीईओ, कौसमीडिया, निर्वैर प्रॉडक्शनचे हरदीप सिंग संधू, टाईम ग्रुप अध्यक्ष प्रवीण शहा, आदींची देखील या कार्यक्रमाला उपस्थिती होती.
हरदीप सिंग संधू यांच्या निर्वैर प्रॉडक्शनची पहिली हिंदी वेब मालिका 'तस्करी'च्या पोस्टरचे अनावरण कार्यक्रमात करण्यात आले. तसेच सुप्रसिद्ध अभिनेता आणि निर्माते रजत बेदी यांच्या "गोल गप्पे" या पंजाबी विनोदी चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर प्रेक्षकांना या निमित्ताने प्रथम पाहता आले. कमल मुकुट, सोहम रॉकस्टार एंटरटेनमेंट आणि जान्हवी टेलिफिल्म्स यांच्या संयुक्त विद्यमाने ट्रायफ्लिक्स एंटरटेनमेंटची निर्मिती असलेला हा चित्रपट आहे.
वर्ष २०१९ मध्ये स्थापन झालेल्या निर्वैर प्रॉडक्शन या निर्मितीगृहाचे सध्या विविध प्रकल्पावर कामे सुरू आहेत. सर्जनशील कलावंत असलेले हरदीप सिंग संधू यांनी त्यांचे वैयक्तिक आणि व्यावसायिक अनुभव आणि जीवनातील विविध किस्से त्यांच्या पहिल्या महत्वाकांक्षी प्रकल्प - “तस्करी”साठी कथासार म्हणून पुढे आणले आहेत. या माध्यमाद्वारे संधू आणि निर्वैर प्रॉडक्शन दोहोंचा अर्थपूर्ण आणि परिणामकारक कथा घडविणाऱ्या भविष्याकडे प्रवास सुरू झाला आहे. आगामी काळात निर्वैरकडून हिंदी आणि पंजाबी चित्रपट प्रकल्पांची अतिशय रोमांचक मालिका येऊ घातली आहे
Nice
ReplyDelete