Skip to main content

नवी मुंबईने उभारलेले बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार स्मारक देशात नंबर वन - श्री.हरी नरके


देशापरदेशातील वीसहून अधिक स्मारकांना भेटी देण्याचा योग आला असून त्यामध्ये बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना अभिवादन करणारे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक नंबर वन असल्याचे सांगत सुप्रसिध्द साहित्यिक, व्याख्याते श्री. हरी नरके यांनी स्मारकातील सुसज्ज ग्रंथालय व इतर वैशिष्टपूर्ण सुविधांच्या माध्यमातून लोकांच्या काळजापर्यंत बाबासाहेब पोहचविण्याची धडपड दिसत असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले. परिचयातील सर्वांना हे स्मारक आवर्जून बघायला जाण्यास सांगेन असे ते म्हणाले.   
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 30 मार्चपासून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा केला जात असून "जागर 2022" उपक्रमांतर्गत मान्यवर वक्त्यांची व्याख्याने श्रोत्यांच्या मोठ्या संख्येने उत्साही उपस्थितीत संपन्न होत आहेत. यामध्ये महात्मा फुले जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रसिध्द साहित्यिक व व्याख्याते श्री. हरी नरके यांचे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेतून महात्मा फुले यांची विचारक्रांती" या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते.

महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोघांना जोडणारी 42 सूत्रे असल्याचे सांगत श्री.हरी नरके यांनी राजकीय स्वातंत्र्याआधी सामाजिक सुधारणेला महत्व देणारी महात्मा फुले यांची विचारधारा हा त्यांच्यामधील महत्वाचा घागा असल्याचे सांगितले. बाबासाहेबांनी केलेले कार्य हे देशातील सर्व समाज घटकांच्या भल्याचे असे विविध उदाहरणे देत स्पष्ट करीत श्री. हरी नरके यांनी बाबासाहेबांना एका समाजाच्या चौकटीत बंदिस्त करू नका, ते 'आमचे बाबासाहेब नाहीत' तर 'आपले बाबासाहेब आहेत' अशा शब्दात बाबासाहेबांच्या सर्वात्मकतेचा विशेष उल्लेख केला.

संयोजकांनी वेगळा विषय देऊन या दोन्ही महामानवांच्या साम्य स्थळावर बोलायला सांगितले हे वैशिष्टयपूर्ण असल्याचे सांगत श्री.हरी नरके यांनी बाबासाहेबांनी महात्मा फुले यांना गुरूस्थानी मानले यामागे कोणती विचारसूत्रे असतील याचा अनेक घटनांची तारीखवार माहिती देत सविस्तर आढावा घेतला. महात्मा फुले यांच्या मृत्यूनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म झाल्याने त्यांची कधीही भेट झाली नसली तरी समानतेच्या विचारधाग्यांनी ते परस्परांशी जोडले गेले असल्याचे त्यांनी सांगितले. बाबासाहेबांचे वडील सुभेदार मेजर रामजी यांचे आणि महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांचे आपुलकीचे संबंध होते अशी माहिती त्यांनी दिली. महात्मा फुले याच्या बाबासाहेबांना भावलेल्या पंचसूत्रीवर बोलताना त्यांनी सर्वांना शिक्षण, स्त्री पुरूष समानता, जातीनिर्मुलन, संसाधनाचे फेरवाटप आणि संवाद अशा पंचसूत्रीवर विस्तृत विवेचन केले.

कोणतीही वैचारिक चळवळ उभी करण्यासाठी एक आदर्श नजरेसमोर असावा लागतो, तो छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने महात्मा फुले यांनी नजरेसमोर ठेवला. रायगडावर जाऊन शिवरायांची समाधी शोधून काढली. शिवजयंती उत्सव सुरू केला. 1 जून 1869 साली पहिले शिवचरित्र लिहिले, ज्याची नोंद पुस्तक अभिरक्षक कार्यालयात आहे अशी विस्तृत माहिती त्यांनी सोदाहरण सांगितली.

बाबासाहेबांसह कोणत्याही महापुरूषांचे विचार आज मांडताना आपण ते विचार त्यांनी कोणत्या कालखंडात व कोणत्या संदर्भाने मांडले याचा प्राधान्याने विचार करायला हवा असे स्पष्ट करीत श्री.हरी नरके यांनी कालानुरूप व अनुभवानुरूप विचार बदलत असतात, त्यामुळे एखाद्या विषयावरील त्या महापुरूषाचे विचार अभ्यासताना वा मांडताना जे कालानुरूप सर्वात अद्ययावत आहेत तेच प्रमाण मानावेत असे बाबासाहेबांनीच सांगितले असल्याचे श्री.हरी नरके यांनी स्पष्ट केले.

महात्मा फुले हे 1876 ते 1883 या कालावधीत पुणे नगरपालिकेचे कमिशनर होते अशी वेगळी माहिती देत त्यांच्या कमिशनरपदाच्या कालखंडात पाणीपुरवठा, स्वच्छता, दिवाबत्ती, वस्त्यावस्त्यांमध्ये शाळा अशा विविध स्वरूपात झालेल्या कामांवर श्री. हरी नरके यांनी प्रकाशझोत टाकला. महात्मा फुले यांनी स्वत:च्या स्थापत्य क्षेत्रातील कंपनीव्दारे केलेली उल्लेखनीय कामे, प्रकाशक म्हणून वाचनसंस्कृती वृध्दींगत करण्याचे काम, शेतक-यांच्या मालाला चांगली बाजारपेठ मिळावी म्हणून पुण्याहून मुंबईला शेतीमाल पाठविणारे वितरक, सोन्याच्या दागिने निर्मितीसाठी लागणा-या मुशी बनविण्याच्या कामातील एकमेव असे सर्वसामान्यपणे माहीत नसलेल्या क्षेत्रातील महात्मा फुले यांच्या कर्तृत्वाची माहिती त्यांनी दिली.

मतदानाच्या अधिकाराव्दारे देशातील प्रत्येक नागरिकाच्या हक्काचा बाबासाहेबांनी केलेला विचार, आपल्या कृषिप्रधान देशातील शेतीच्या प्रगतीसाठी मांडलेले विचार असे अनेक विषयांतील बाबासाहेबांचे काम हे देशातील सर्वांच्या अधिकारासाठी व विकासासाठी असल्याचे स्पष्ट करीत बाबासाहेब 'भारत भाग्यविधाता' असल्याचे श्री.हरी नरके यांनी सांगितले.

"जागर 2022" उपक्रमांतर्गत 13 एप्रिल रोजी विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजवितानाच वाचनाचे वेड जपणारे युवक व्याख्याते "युवकांच्या नजरेतून.." या कार्यक्रमांतर्गत "आम्ही वाचलो - तुम्हीही वाचा" या विषयाच्या अनुषंगाने स्वविकासासाठी वाचनाचे महत्व या विषयावर अनुभव कथन करणार आहेत. तरी नव्या पिढीचा पुस्तकांविषयी, वाचनाविषयी दृष्टीकोन जाणून घेण्यासाठी या अभिनव विचार जागरात मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहभागी व्हावे असे आवाहन महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे

 


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.