पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या प्रयत्नाने रस्त्याच्या मध्यभागी असणारे विजेचे धोकादायक खांब काढले
पनवेल : पनवेल शहरातील अमरधाम ते स्वा.सावरकर चौक या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून पथदिवे लावण्याच्या कामाला ही सुरवात झाली आहे. पण या रस्त्यावरील आशियाना सोसायटी आणि विरुपाक्ष हॉल समोरील विजेचे धोकादायक खांब काढण्यात आले नव्हते, त्यासाठी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी सतत पाठपुरावा करून या ठिकाणच्या विद्युत वाहिन्या भूमिगत कारण्यासाठी प्रयत्न केले. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे दोन्ही ठिकाणचे वाहतुकीस धोकादायक ठरत असलेले विद्युत खांब काढून घेण्याचे काम पूर्ण करून घेण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सावरकर चौक ते अमरधाम स्मशानभूमी या रस्त्यावर महावितरण कंपनीचे पोल रुंदीकरण झालेल्या रस्त्यात अडथळा निर्माण करत होते. हे विद्युतवाहिनी पोल याबाबत त्वरित कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी कळवले होते. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे खांब काढण्याची मागणी पालिका व महावितरणकडे करण्यात आली होती. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून विद्युत पोल काम हटवून भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.
अमरधाम स्मशानभूमी जवळिल रस्त्यावर विद्युत पोल मधोमध असल्याने अनेक दुर्घटना घडल्या. यात वाहनाचे देखील नुकसान झाले होते. त्यामुळे येथे जीवित हानी होण्याची शक्यताही नाकारता येत नव्हती. या गोष्टी लक्षात घेऊन विरोधी पक्ष नेते प्रितम म्हात्रे, नगरसेविका प्रीती जॉर्ज, डॉ. सुरेखा मोहोकर, सारीका भगत यांनी विद्युत वाहिनी भूमिगत करण्याची मागणी केली होती, या मागणीला यश आले असून विद्युत वाहिनी भूमिगत करण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे. त्यामुळे नागरिकांनी विरोधी पक्ष प्रीतम म्हात्रे यांचे आभार मानले आहेत. कोट प्रभाग क्रमांक 18 मधील रस्ते पाठपुरावा करून आम्ही सिमेंट काँक्रिटीकरण करून घेतले आहेत. अजूनही काही काम प्रगतीपथावर आहे. पूर्ण झालेल्या रस्त्यांवरील पथदिवे सुद्धा लवकरच लावून घेण्यात येतील:- प्रितम जनार्दन म्हात्रे, विरोधी पक्ष नेता, पनवेल महानगरपालिका
Comments
Post a Comment