पनवेल शहरासह खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात उभी करण्यात येत असलेल्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिकांसह महिला वर्गाला नाहक त्रास
पनवेल (संजय कदम ) : पनवेल रेल्वे स्टेशन परिसर तसेच खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने लावण्यात येत असल्याने येथून ये-जा करणार्या ज्येष्ठ नागरिकांसह महिला वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे.
येथील प्रवाशांची सोयी साठी स्टेशन परीसर व स्टेशन बिल्डिंग मध्ये दुकाने व कॅन्टींन शॉप बांधण्यात आले आहे कि जेणे करुन प्रवाशांची सोय होईल. पण आजपर्यंत सिडकोने दुकाने कॅन्टीन कोणालाही भाड्याने दिले नाही व स्वतःही चालू केली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.
तसेच सिडको प्रशासनाचे आत्ता पर्यंत करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरीही प्रशासनाला जाग येत नाही. त्याचप्रमाणे खांदेश्वर रेल्वे स्टेशन परिसरातील समोरील ओपन असलेली जागा पंतप्रधान आवास योजनेला दिली असून येणार्या प्रवाशांच्या गाडयांना पार्किंग राहिली नसल्याने पार्किंग स्टेशन आवारात व रस्त्यावरती जागा मिळेल तिथे गाड्या पार्किंग करतात.
त्यामुळे येणार्या जाणार्या वृध्द महिला पुरुष लहान मुले यांना येण्या जाण्याचा फार त्रास होत आहे, सिडकोने स्टेशन आवाराच्या बाहेर दोन वाहनतळ तयार केले आहे पण तेथे कुठलाही ठेकेदार न दिल्या मुळे ते पडून आहे. त्याचे आर्थिक नुकसान सिडको भोगत आहे. यावर लवकरात लवकर सिडकोने काहीतरी निर्णय घेण्यात यावा अशी मागणी प्रवाशी संघटना करत आहे.
Comments
Post a Comment