दारूची नशा भागवण्यासाठी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेला कंट्रोल करणार्या केबलची चोरी; 3 गजाआड, दोन फरार
पनवेल (संजय कदम ) : पनवेल हर्बर रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेला कंट्रोल करणाऱ्या, सिग्नल लोकेशन बॉक्स मधील केबल ची वायर तोडून त्याची भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पनवेल रेल्वे सुरक्षा बल यांना यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींनी अन्य दोन मित्राच्या मदतीने पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील पोल नंबर 48 जवळील सिग्नल लोकेशन बॉक्स मधील केबल चोरली होती. या केबल चोरीमुळे पनवेल हर्बर रेल्वे मार्ग 4 तास ठप्प झाला होता.सुनील लोंगरे, अनिल लोंगरे, आकाश कोळी, रईश सय्यद, सईद अब्दुल सलाम असे पाच आरोपीची नावे आहेत. या पाच आरोपीनी संगनमतांनी 13 एप्रिल रोजी पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील पोल नंबर 48 जवळील सिग्नल यंत्रणेला कंट्रोल करणाऱ्या लोकेशन बॉक्स मधील केबल ची चोरी करून पोबारा केला होता. या केबल चोरीमुळे 13 एप्रिल रोजी पहाटे एक ही लोकल सी एस टी च्या दिशेने धावू शकली नाही त्यामुळे पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर, खारघर रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. तब्बल चार तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती.या चोरीच्या प्रकारा नंतर, रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी आरोपीचा शोध घेण्यास सुरवात केली, त्यावेळी हे चोरटे रेल्वे स्थानकाच्या शेजारी असलेल्या झोपडपट्टी परिसरातील आहेत. या अधिक तपास केल्या नंतर दोन आरोपींना या जवानांनी पनवेल मधून अटक केली. या आरोपींना अटक केल्या नंतर अन्य साथीदाराचा शोध घेण्यास मदत मिळाली, त्या पैकी तीन आरोपी अटक असून दोन आरोपीचा शोध पोलीस घेत आहेत. यातील दोन आरोपी हे सराईत असून, या पूर्वी देखील रेल्वे परिसरातील केबल आणि अन्य चोरी च्या प्रकारात त्यांना अटक करण्यात आली होती. तर अन्य आरोपी हे दिवा परिसरातील रहिवासी असल्याचे इन्स्पेक्टर जशबीर राणा यांनी ही माहिती दिलीलदारूची नशा भागवण्यासाठी चोरी लागले करूरेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी, अटक केलेल्या पाच आरोपीनी केलेल्या केबल ची चोरी ही केवळ दारू ची नशा भागवण्यासाठी केल्याची कबुली त्यांनी दिली आहे. या केबल ची चोरी करून त्या तून येणारे पैसे दारू पिण्यासाठी वापरत असल्याचे त्याच्या कडून सांगितले
Comments
Post a Comment