Skip to main content

Posts

Showing posts from April, 2022

लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवा..पनवेल भाजपाचे राज्य सरकारविरोधात ‘कंदील’ आंदोलन

पनवेल(प्रतिनिधी) अघोषित लोडशेडिंग आणि वीजवसुलीच्या विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. पनवेल शहर भाजपाकडून सोमवारी सायंकाळी पनवेल शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात महाविकास आघाडी सरकारच्या निषेधार्थ भाजपाने उत्तर रायगड जिल्हाध्यक्षग आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली 'कंदील आंदोलन' केले. यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी देण्यात आली. यावेळी लोडशेडिंग आणि सक्तीची वीजवसुली थांबवण्याची मागणी यावेळी भाजपा कार्यकर्त्यांकडून करण्यात आली.सरकारला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे लक्ष द्यायला वेळ नसल्याची टीका यावेळी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. महावितरण कंपनीच्या अघोषित भारनियमनाच्या विरोधात घोषणाबाजीही करण्यात आली. या आंदोलनात आमदार प्रशांत ठाकूर, महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर, शहराध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक अजय बहिरा, नगरसेवक ऍड. मनोज भुजबळ, नगरसेवक तेजस कांडपिळे, नगरसेविका दर्शना भोईर, हेमलता म्हात्रे, रुचिता लोंढे, जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव, पंचायत समिती सदस्य भूपेंद्र पाटील, शिक्षक सेलचे जिल्हाध्यक्ष के. सी. पाटील, युवा मोर्चाचे जिल्

शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी बबनदादा पाटील

पनवेल / प्रतिनिधी  :-  मुख्यमंत्री व शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने रायगड जिल्हा संपर्क प्रमुखपदी बबनदादा पाटील यांची ( पनवेल, उरण, कर्जत विधानसभा) नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्ध केलेल्या पत्रकाद्वारे करण्यात आली आहे.       बबनदादा हे गेल्या २६ वर्षांपेक्षा जास्त काळ पूर्ण रायगड जिल्ह्यात जिल्हाप्रमुख म्हणून कार्यरत होते तर सध्या ते रायगड जिल्हा सल्लागारपदी नियुक्त होते, तसेच अत्ता ते दि.बा.पाटील प्रकल्पग्रस्त समितीचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या कार्याची दखल घेत शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांना पनवेल , उरण , कर्जत विधानसभा संपर्कप्रमुखपदी नेमणूक करून मोठी जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.     त्यांच्या या नियुक्तीमुळे सर्व स्तरावर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून नागरिकांमध्ये तसेच शिवसैनिकांमध्ये आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण पसरले आहे.

मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱया खारघरमधील ओश्यानिक स्पावर छापा, स्पा चालक व मालक ताब्यात, पाच महिलांची सुटका

पनवेल दि २८ (वार्ताहर) : स्पा आणि मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविणाऱया खारघर सेक्टर-7 मधील ओश्यानिक स्पा ऍन्ड सलुनवर अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाने छापा मारुन मसाज पार्लर चालक मालक या दोघांना ताब्यात घेतले आहे. या कारवाईत पोलिसांनी सदर मसाज पार्लरमध्ये वेश्याव्यसायासाठी ठेवण्यात आलेल्या 5 महिलांना ताब्यात घेऊन त्यांची सुटका केली आहे.    खारघर सेक्टर-7 मधील रावेची हाईट्स इमारतीतील ओश्यानिक स्पा ऍन्ड सलुनमध्ये बॉडी मसाजच्या नावाखाली वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची माहिती अनैतिक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्षाला मिळाली होती. सदर माहितीच्या आधारे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पराग सोनवणे व त्यांच्या पथकाने ओश्यानिक स्पा ऍन्ड सलुनमध्ये एक बनावट ग्राहक पाठवून खातरजमा केली. यावेळी सदर स्पामध्ये वेश्याव्यवसाय चालविण्यात येत असल्याची खात्री पटल्यानंतर पोलिसांच्या पथकाने सदर स्पावर छापा मारला. यावेळी सदर स्पामध्ये बॉडी मसाजसाठी ठेवण्यात आलेल्या 5 महिलांकडून मसाजच्या नावाखाली वेश्याव्यसाय करुन घेण्यात येत असल्याचे आढळुन आले.   यावेळी पोलिसांनी सदर महिलांकडे केलेल्या च

अनाथ मुलांच्या मदतीसाठी संगीत कार्यक्रम; कार्यक्रमातून अनाथ विद्यार्थ्यांना करण्यात येणार मदत

पनवेल(प्रतिनिधी) येथील आपुलकी फाऊंडेशनच्या वतीने भारतरत्न स्व. लता मंगेशकर, बप्पी लाहिरी, बाल सुब्रहमण्यम यांच्या गाण्यावर आधारित 'ए म्युझिकल ट्रिब्यूट' हा गायन कार्यक्रम  संपन्न झाला.  अनाथ मुलांच्या मदतीसाठी या संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमास भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांची विशेष उपस्थिती लाभली. यावेळी त्यांनी आयोजनाबद्दल आणि अनाथ मुलांना करण्यात येणाऱ्या मदतीबद्दल फॉउंडेशनचे कौतुक केले.            यावेळी आपुलकी फाउंडेशनचे सल्लागार नगरसेवक अनिल भगत, नगरसेवक अजय बहिरा, माजी नगरसेविका सुलोचना कल्याणकर, डॉ. सचिन जाधव, कामगार नेते अनिल जाधव, आपुलकी फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय जाधव, प्रविण मोहोकर, दिनेश भास्कर, मिलिंद उरणकर, रमेश गरुडे, जितेंद्र खैरे, संजय जगताप, सचिन दुन्द्रेकर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमात प्रसिद्ध गायक गोविंद मिश्री, जया पियुष, संदिप शहा, शाकंबरी बागडे, डी. महेश यांनी गायनाने उपस्थितांची मने जिंकली. या संगीत कार्यक्रमाला अरुण कारेकर यांच

सीवूडमध्ये वैसाखी मेला कार्यक्रमासह " गोल गप्पे " आणि " " तस्करी " चित्रपटाचे पोस्टर आणि ट्रेलर यांच्यामाध्यमातून प्रमोशन

नवी मुंबई दि. २४ (प्रतिनिधी) : शीख समुदाय नवीन वर्ष म्हणून बैसाखी साजरी करतात. या काळात पिके परिपक्व होऊन त्यांची काढणी होते, त्याच्या आनंदात हा सणही साजरा केला जातो. त्याला धार्मिक महत्त्वही आहे. शीखांचे १० वे गुरु गोविंद सिंग यांनी १३ एप्रिल १६९९ रोजी बैसाखीच्या मुहूर्तावर खालसा पंथाची स्थापना केली होती, त्यामुळे शीख समुदायासाठी बैसाखीचे विशेष महत्त्व आहे. याच पार्श्वभूमीवर नवी मुंबई येथे ' आया वैसाखी मेला' कार्यक्रम पार पडला. यावेळी जणू 'पंजाब नवी मुंबईत अवतरला असल्याचा भास होता होता. या रंगारंग कार्यक्रमाचे आयोजन निर्वैर प्रॉडक्शन, व्हॅल्यू ऑफ स्माइल संस्था, अकाल ज्योत सेवक ज्यथा, चरडी कला स्पोर्ट्स अँड सोशल असोसिएशन यांनी केले होते. प्रसिद्ध गायक रंधावा ब्रदर्स, मनजीत सिंग सोही आणि कबाल सरूपवाली यांनी काही चमकदार बैसाखी आणि त्यांची इतर सुप्रसिद्ध गाणी ऐकून प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले. रजत बेदी, अभिनेता आणि निर्माता (कोई मिल गया, पार्टनर, जोडी नंबर १, आंतरराष्ट्रीय खिलाडी), अभिनेत्री इहाना ढिल्लन (राधे, भुज, हेट स्टोरी), अभिनेत्री जा

उरणच्या कॉन्वेअर सीएसएफ वेअरहाऊसमधील प्रश्न मार्गी; तीन महिन्यांची मुदतवाढ

पनवेल(प्रतिनिधी) पंजाब स्टेट कंटेनर वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनच्या कॉन्वेअर सीएसएफ या वेअरहाऊसमधील कामगारांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यामुळे न्याय मिळाला आहे. या वेअरहाऊससाठी जीएडी लॉजिस्टीकला तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्याबद्दल कामगारांनी लोकनेते रामशेठ ठाकूर आणि जय भारतीय कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांचे आभार मानले आहेत. उरण तालुक्यातील धुतूम येथे पंजाब स्टेट कंटेनर वेअरहाऊसिंग कॉर्पोरेशनच्या कॉन्वेअर सीएसएफ वेअरहाऊस हे जानेवारी ते मार्च असे तीन महिने बंद होते. या वेअरहाऊसाठी तीन वेळा टेंडर काढण्यात आले होते, मात्र कोणीही टेंडर भरले नाही. त्यामुळे वेअरहाऊसमध्ये काम करणार्‍या सुमारे 350 स्थानिक कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला होता. स्थानिकांच्या कामाच्या प्रश्नासंदर्भात भारतीय जनता पक्ष पुरस्कृत जय भारतीय कमागार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी अनेक वेळा चर्चा केली. अखेर या कामगारांच्या प्रश्नाबाबात माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी प्रयत्न केले. त्यानुसार या वेअरहाऊससाठी जीएडी लॉजिस्टीकला तीन महिन्यांसाठी मुदतवाढ देण्या

पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात; सभागृह नेते परेश ठाकूर यांनी घेतला आढावा

पनवेल(प्रतिनिधी)  पनवेल महापालिका क्षेत्रात मान्सूनपूर्व कामांना सुरुवात झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी महापालिका हद्दीतील तळोजा मजकुर येथे भेट देऊन नाले आणि रस्त्यांच्या कामांची पाहणी केली तसेच अधिकार्‍यांना आवश्यक त्या सूचना केल्या. पावसाळ्याच्या अगोदर ही सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास त्यांनी या वेळी व्यक्त केला. पनवेल महापालिका हद्दीतील तळोजे मजकुर येथे असलेल्या नाल्याला पावसाळ्यात मोठा प्रवाह असतो. त्यामुळे या नाल्याचे काम न झाल्यास नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागू शकतो. त्या पार्श्वभूमीवर सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या नाल्याची आणि तसेच रस्त्यांच्या कामाची अधिकार्‍यांसह पाहणी केली व त्यांना सूचना दिल्या. या वेळी नगरसेवक हरश केणी, भाजप नेते निर्दोश केणी, दिनेश केणी, महापालिकेचे कार्यकारी अभियंता संजय कटेकर यांच्यासह पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

दारूची नशा भागवण्यासाठी रेल्वेच्या सिग्नल यंत्रणेला कंट्रोल करणार्‍या केबलची चोरी; 3 गजाआड, दोन फरार

पनवेल (संजय कदम ) : पनवेल हर्बर रेल्वे मार्गावरील सिग्नल यंत्रणेला कंट्रोल करणाऱ्या, सिग्नल लोकेशन बॉक्स मधील केबल ची वायर तोडून त्याची भंगारात विक्री करणाऱ्या आरोपीच्या मुसक्या आवळण्यात पनवेल रेल्वे सुरक्षा बल यांना यश आले आहे. या प्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. या तीन आरोपींनी अन्य दोन मित्राच्या मदतीने पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील पोल नंबर 48 जवळील सिग्नल लोकेशन बॉक्स मधील केबल चोरली होती. या केबल चोरीमुळे पनवेल हर्बर रेल्वे मार्ग 4 तास ठप्प झाला होता.सुनील लोंगरे, अनिल लोंगरे, आकाश कोळी, रईश सय्यद, सईद अब्दुल सलाम असे पाच आरोपीची नावे आहेत. या पाच आरोपीनी संगनमतांनी 13 एप्रिल रोजी पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील पोल नंबर 48 जवळील सिग्नल यंत्रणेला कंट्रोल करणाऱ्या लोकेशन बॉक्स मधील केबल ची चोरी करून पोबारा केला होता. या केबल चोरीमुळे 13 एप्रिल रोजी पहाटे  एक ही लोकल  सी एस टी च्या दिशेने धावू शकली नाही त्यामुळे पनवेल, खांदेश्वर, मानसरोवर, खारघर रेल्वे स्थानकात रेल्वे प्रवाशांची तोबा गर्दी झाली होती. तब्बल चार तास रेल्वे सेवा ठप्प झाली होती.या चोरीच्या प्रकारा नं

मंगळसूत्र खेचून चोरट्यांचे पलायन, महिलांमध्ये भीतीचे वातावरण 

पनवेल (संजय कदम ) : खारघर मध्ये सकाळी फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडलेल्या साठ वर्षीय महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी खेचून चोरट्यांनी पळ काढल्याने महिला वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. खारघर सेक्टर-१८ मध्ये राहणाऱ्या शोभा प्रेमराज राऊत (वय ६०) या नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाठी घराबाहेर पडल्यानंतर खारघर सेक्टर १८ मधील मैदान आणि माऊली सोसायटी लगतच्या रस्त्यावर समोरुन आलेल्या महिलेशी संवाद साधत असताना मोटाररुन आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र आणि सोनसाखळी खेचून पळ काढल्याने महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. विशेषतः सकाळी पोलिसांची गस्त नसते. तसेच रस्त्यावर वर्दळ कमी असल्याचा फायदा चोरटे घेत आहेत. या चोरी प्रकरणी शोभा राऊत यांनी खारघर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. त्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही मधील फुटेज घेवून तपास सुरु केला आहे.

खारघरमध्ये श्री विद्यादान सोसायटीत जन्मोत्सव उत्साहात साजरा..

खारघर :कोविड काळात गेली दोन वर्षे हनुमान जयंती उत्सव जल्लोषात साजरा झाला नव्हता, यावेळी कोविडचे बंधन नसल्याने मोठ्या जल्लोषात व उत्साहात हनुमान जन्मोत्सव  श्री विद्यादान सोसायटीत श्री हनुमान मंदिरात साजरा झाला. हजारोंच्या संख्येने दिवसभरात भाविकांनी दर्शनाचा व प्रसादाचा लाभ घेतला. हनुमान  जयंतीनिमित्त सकाळी श्री देव हनुमंताची विधिवत पूजा-अर्चा व जन्माचा पाळणा म्हणून उत्सवाची सुरवात झाली. तसेच संध्याकाळी  ह .भ .प .अंकुश महाराज खारघरकर यांनचे प्रवचन ऐकुन भाविकांचे मन प्रसन्न झाले ,   त्यानंतर  रात्री श्री विद्यादान महिला भजन मंडळ यांच्याकडुन भजन करण्यात आले.यावेळी पुष्षा सोनमळे, नंदा भगत ,शारदा भोसले, सुनिता काशिद,सवाखंडे व विजया साळुखे यांच्यावतीने भजन करण्यात आले. यावेळी  श्री विद्यादान सोसायटीचे अध्यक्ष सुरेश भगत , उपाध्यक्ष जीवन कांबळे , सेक्रेटरी संपत कासुर्डे , खजिनदार ज्ञानेश्वर म्हस्के ,सदस्य सुरेश कोल्हे ,बाळासाहेब भोसले तुकाराम डुंबरे ,पोपट सांळुखे व तसेच महिला सदस्य श्रीमती .सुमित्रा पवार आदी मान्यवर व सेवेकरी उपस्थित होते.

नामदार नितीन गडकरी यांचे कौतुक करू तेवढे कमी आहेत - आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल(प्रतिनिधी) महाविकास आघाडीच्या कुबड्या घेऊन चालणाऱ्या शेतकरी कामगार पक्षाच्या कारभाराला कार्यकर्ते तसेच जनता त्रस्त झाली आहे. पर्यायाने शेकापक्षातील पदाधिकारी जुलमी राजकारणाला कंटाळून दुसऱ्या पक्षात सामिल होत आहेत. या पार्श्वभूमीवर पनवेल तालुक्यातील आणि उरण विधानसभा संघात समाविष्ट असलेल्या केळवणे जिल्हा परिषदेचे सदस्य ज्ञानेश्वर घरत, आपटा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच दत्ता पाटील, कर्नाळा ग्रामपंचायतीचे माजी सरपंच शेखर कानडे, माजी सरपंच राजू पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल पाटील, माजी उपसरपंच संजय पाटील, विलास ठाकूर, महादेव म्हात्रे, राजेश घरत, संजय कोळी, मिलिंद कोळी, महेंद्र भोईर, प्रदीप भोईर, गणेश शेलार, रोशन भोईर, ग्रामपंचायत सदस्य वंदना वाघे यांच्यासह शेकाप व शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून सर्वोत्कृष्ट पर्याय असलेल्या असलेल्या भारतीय जनता पार्टीत जाहीर पक्ष प्रवेश केला. या प्रवेशामध्ये युवकांची संख्या शेकडोहून अधिक होती. या पक्षप्रवेशामुळे उरण विधानसभा मतदार संघात भाजप अधिक मजबूत झाला आहे तर महाविकास आघाडीच्या दावणीला बांधलेल्या शेकापचे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती पंचशील नगर मध्ये प्रथमतःच सलग चार दिवस साजरी

पनवेल/ प्रतिनिधी:-  पंचशील नगर रहिवाशी सामाजिक संस्थेच्यावतीने  पंचशील नगर,नवीन पनवेल येथे दि.१३,१४,१५ आणि १६ एप्रिल अशी एकूण सतत ४ दीवस विविध सामाजिक व सांस्रोकृतिक उपक्रम राबवून साजरी करण्यात आली. यामधील कार्यक्रम दिनांक १३ एप्रिल रोजी सायंकाळी भीम गीताचा ऑर्केस्ट्रा ठेवण्यात आला आणि रात्री १२-०० नंतर पनवेलच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ शेकडो अनुयायांनी मेणबत्त्या लावून बाबासाहेबांना अभिवादन केले. दिनांक १४ एप्रिल रोजी बुद्ध विहार पंचशील नगर येथे चित्रा देशमुख यांच्यामार्फत वही-पेन वाटप करण्यात आले. तसेच डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढून भीम गीता वरती हजारो बंधू-भगिनी भीम अनुयायांनी उपस्थित राहून वाजत- गाजत मनसोक्त नाचून मिरवणुकीचा आनंद लुटला.मिरवणुकीत प्रदीप गायकवाड यांनी महाखीर दान तसेच अनील पटेकर यांनी जिलेबी वाटप केले.दिनांक १५ एप्रिल रोजी रात्री समाजप्रबोधनाचा चित्रपट एलसीडी वरती दाखवण्यात आला. दि.१६ एप्रिल रोजी स्थानिक लहान मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. चार दिवस दिवाळी प्रमाणे पंचशील नगर

सत्ताधाऱ्यांनी बोलल्याप्रमाणे राजीनामे द्यावेत आम्ही मालमत्ता कर कमी करून दाखवू : विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे

स्थायी समितीच्या बैठकीला सभागृह नेत्यांची अनुपस्थिती गोंधळलेल्या सत्ताधारी स्थायी समिती सदस्यांना "फोन ए फ्रेंड" चा सहारा पनवेल : पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत अर्थसंकल्पावर चर्चा होत असताना दुहेरी मालमत्ता कराचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला. अर्थसंकल्पामध्ये 8 क्रमांकाच्या तरतुदीत 250 कोटी रुपये कराच्या स्वरुपात अधोरेखित केलेले आहेत. ही तरतूद म्हणजे कराचा बोजा लादून केलेली वसुली असेल अशी भूमिका घेत महाविकास आघाडीच्या स्थायी समितीमधील सदस्यांनी या तरतुदीस विरोध दर्शविला. अखेरीस हा मुद्दा मतास टाकण्यात आला. बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी ही तरतूद मंजूर करवून घेतली.याबाबत प्रसिद्धिमाध्यमांशी संवाद साधताना विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे म्हणाले की वाढीव मालमत्ता कराच्या मुद्द्यावर सत्ताधारी नगरसेवकांनी राजीनामे देण्याच्या वल्गना केल्या आहेत, मी त्यांना आव्हान देतो, तुम्ही बोलल्याप्रमाणे राजीनामे द्या वाढीव मालमत्ता कर आम्ही कमी करून दाखवू.      प्रसिद्धीमाध्यमांना सत्ताधाऱ्यांचा दुटप्पीपणा सांगण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत प्रीतम म्हात्रे यांच

सायन-पनवेल महामार्गावरील झाडांची कत्तल करणाऱ्या फलक मालकावरती कारवाई करा;अन्यथा रास्ता रोको आंदोलन करू-विजय मयेकर

खारघर (प्रतिनिधी) : -सायन-पनवेल महामार्गावरती कोपरा गांव ते घरकुल-स्पॕघेटी बस थांब्यापर्यंत शासन दरवर्षी सामान्य जनतेच्या करामधील लाखो रूपये खर्चून झाडे लावीत असते;पण ती झाडे जरा मोठी झाली की,या परिसरातील होर्डींगवाले आपले होर्डींग दीसत नाही म्हणून झाडांची सरसकट कत्तल करीत आहेत.या बाबीकडे शासनातील बडे अधिकारी अक्षम्य दुर्लक्ष्य करीत आहेत.त्यामुळे हे होर्डींगवाले ही कत्तल करायला धजावत आहेत.अशी तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ओबीसी सेलचे पनवेल शहर जिल्हा अध्यक्ष विजय मयेकर यांनी केली आहे.सदर निवेदनाच्या प्रती संबंधित विभाग आणि प्राधिकरणाबरोबरच पर्यावरण मंत्री,पालक मंत्री व नगर विकास मंत्री यांना सुद्धा दील्याचे त्यांनी सांगीतले.         सदर झाडांची वरचेवर कत्तल करणाऱ्या होर्डींगवाल्यानवरती योग्य ती कडक आणि कायदेशीर कारवाई न केल्यास आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने परिसरातील निसर्गप्रेमी नागरिकांना बरोबर घेऊन सायन-पनवेल महामार्गावरती रास्ता-रोको आंदोलन करू.असा ईशारा विजय मयेकर यांनी दिला.

आर्थिक मदतीचा परतावा करत डॉ. समीर श्रीपत आगलावे यांनी युवा पिढीपुढे आदर्श ठेवला-  वाय. टी. देशमुख 

पनवेल(प्रतिनिधी) वैद्यकीय शिक्षणासाठी घेतलेल्या आर्थिक मदतीचा परतावा करत डॉ. समीर श्रीपत आगलावे यांनी युवा पिढीपुढे आदर्श ठेवला आहे, असे प्रतिपादन  रामशेठ ठाकूर इंटरनॅशनल स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सचे जनरल सेक्रेटरी  वाय. टी. देशमुख यांनी आज (दि. १५) येथे केले.        पनवेल तालुक्यातील कोळवाडी येथील डॉ. समीर श्रीपत आगलावे यांना इंग्लडमध्ये वैद्यकीय शिक्षण घेण्याकरिता आर्थिक मदतीची आवश्यकता होती. त्या अनुषंगाने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेल्या श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ या सेवाभावी संस्थेकडून त्यांना ०२ लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली होती. आपले शिक्षण पूर्ण करून डॉ. समीर आगलावे सक्षम झाले आहेत, त्यामुळे डॉ. समीर यांनी  पुढील गरजवंताला उपयोग होण्याकरिता शिक्षणाकरिता घेतलेली आर्थिक मदतीचा परतावा केला. सदरचा दोन लाख रुपयांचा धनादेश डॉ. समीर यांचे वडील श्रीपत आगलावे यांनी ज्येष्ठ नेते वाय. टी. देशमुख यांच्याकडे आज सुपूर्द केला. यावेळी डॉ. समीर आगलावे, श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास

पत्रकार मयूर तांबडे साई सन्मान पुरस्काराने सन्मानित

नवीन पनवेल : पनवेल येथील पत्रकार मयूर गुरुनाथ तांबडे यांना पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल साई सन्मान पुरस्काराने रिटघर येथे आमदार बाळाराम पाटील यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. आई निवास, रिटघर येथे १४ एप्रिल रोजी श्री साईबाबा उत्सव आणि सत्यनारायणाची महापुजा आयोजित करण्यात आली होती. यावेळी साईबाबांचा अभिषेक, पुजा, चक्रीभजन, भजन, दिंडी सोहळ्याचे आयॊजन करण्यात आले होते. यावेळी सुभाषशेठ भोपी सामाजिक विकास संस्थेचे अध्यक्ष सुभाषशेठ भोपी, साई संस्थान वहाळचे रवीशेठ पाटील, क्रांतिकारी सेवा संघाचे नामदेवशेठ फडके, जिल्हा परिषद सदस्य विलास फडके, राजेश केणी, भारत भोपी, बबन विश्वकर्मा, देवेंद्र पाटील, अल्लौद्दीन शेख, नितिन जोशी, पत्रकार सय्यद अकबर, गणपत वारगडा, सामाजिक कार्यकर्ते रवींद्र पाटिल, महादेव गायकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

ऐरोली मधील सर्व सेक्टर एकत्र येऊन संयुक्त भीम जयंती 2022 जल्लोष आणि उत्साहात साजरी

ऐरोली  ( नवी मुंबई ) : दिनांक 14एप्रिल 2022 रोजी भारताचे नेते भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती मोठ्या थाटाने उस्तहाने साजरी झाली . यावेळी तब्बल दोन वर्षानी ऐरोलीतील  संपूर्ण भिममय झाले  . ऐरोलीत जयंतीनिमित्त  नवी मुंबई सामाजिक समता यांच्या वतीने  भव्य अशी *बाईक रॅली*  काढण्यात आली असून  रॅलीत सहभागी झालेल्या तरुणींना त्यांच्या वतीने   सुंदर अशी पारितोषिके  सन्मान चिन्हे देण्यात आली व तसेच ऐरोलीतील सर्व मान्यवर  संस्था  यांनी एकत्र  येऊन भव्य असे मिरवणुक काढण्यात आली त्या वेळी DJ  तालावर नाचणाऱ्या तरुण तरुणीचा आनंद  चेहऱ्यावर झळकत होता कोणतेही गालबोट न लागता मिरवणुकीची सांगता  झाली  तसेच *महानगपालिकेने* भव्य दिव्य असे *भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांचे डोळ्याचे पारणे फेडणारे स्मारक उभारले* त्याची भव्यता पाहण्यासाठी ही विविध भागातून भीम अनुयायी आले नवी मुंबई  महानगपालिकेच्या मार्फत  दिवसभर अल्पोआहार  देण्यात आला व भोजनाची ही सोय करण्यात आली , व त्याच प्रमाणे *भीम जयंतीच्या अनुषंगाने शीख  धर्मियांनी ही देखील   भीम अनुयायांना शीतपेय  वाटप करून *सर

किरकोळ वादातून दगडाने केली मारहाण

पनवेल (संजय कदम ) : तु माझ्या भावाला त्रास का देतो या बोलाचालीतून पूर्वीचा राग मनात धरुन शिवीगाळ करून आरोपीने जवळ असलेला दगड उचलून समोरच्याच्या डोक्यात मारुन त्याच्या डोक्याच्या डाव्या बाजूस दुखापत तसेच नाकास किरकोळ स्वरुपाची दुखापत केल्याचा गुन्हा पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आला आहे. अविराज यादव (21) नवनाथ नगर याला आरोपी शकील शेख याने त्याच्या घराबाहेर बोलावून तु माझ्या भावाला त्रास का देतो असे बोलून पूर्वीचा राग मनात धरुन शिवीगाळ करून जवळ असलेला दगड उचलून शकील याने अविराज याच्या डोक्यात मारुन त्याला जखमी केल्याने तसेच त्याला शिवीगाळ केल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

खारघरमध्ये गांजा विकणाऱ्या महिलेला अटक

पनवेल  (संजय कदम ) : बेलपाडावाडी येथे गांजा विक्री करणाऱ्या महिलेस पोलिसांनी अटक करून १४ हजारांचा ५५० ग्रॅम गांजा हस्तगत केला. खारघरमध्ये गांजा विक्री की होत असल्याची माहिती अमली विरोधी पथकाला मिळाली होती. पथकाने धाड टाकून गांजा विक्री करणाऱ्या एका महिलेस अटक केली. बेलपाडा वाडीलगतच्या डोंगरावर मोठ्या प्रमाणात अनधिकृत झोपड्या उभारण्यात आल्या आहेत. याठिकाणी बेकायदा व्यवसाय होत असल्याने सिडको आणि महापालिका प्रशासनाने कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत.

पनवेल परिसरात बेकायदेशीर दारू विकणाऱ्यावर गुन्हा दाखल

पनवेल (संजय कदम ) : पनवेल परिसरातील आदई या ठिकाणी बेकायदेशीर रित्या विनापरवाना दारू विक्री करण्याऱ्यावर पोलिसांनी कारवाई केली आहे. पोलिसांनी आयुक्तालय क्षेत्रात विनापरवाना दारू विकणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे. आदई गावात घरक्रमांक १५६ च्या बाजूला एक व्यक्ती दारू विक्री करीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे छापा टाकून दारूच्या २२ बाटल्या जप्त केल्या आहेत. याबाबत खांदेश्वर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आता आहे.

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी

पनवेल(प्रतिनिधी) भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती पनवेलमध्ये मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयजयकार पनवेलमध्ये दुमदुमला होता.  पनवेल बसस्थानकाजवळील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळ्याला अभिवादन करून शहरात भव्य मिरवणूक मोठ्या उत्साहात पार पडली. यावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, आयुक्त गणेश देशमुख, उपमहापौर सीता पाटील, सभागृहनेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, माजी नगराध्यक्ष संदीप पाटील, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, डॉ. अरुणकुमार भगत, प्रकाश बिनेदार, राजू सोनी, महिला व बाल सभापती हर्षदा उपाध्याय, नगरसेविका दर्शना भोईर, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष मयुरेश नेतकर यांच्यासह आजी माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, भीम अनुयायांनी बाबासाहेबांच्या पुतळ्यास अभिवादन करून मिरवणुकीत सहभाग घेतला. यावेळी पनवेल भाजपच्यावतीने नागरिकांसाठी ताक व सरबतचे मोफत वाटप करण्यात आले होते. तसेच पनवेल महानगरपालिकेच्या वतीने स्वातंत्

क्रीडा गणवेशामुळे हरवलेल्या मुलाचा शोध : रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलचा क्रीडा गणवेश महत्त्वाचा ठरला दुवा

पनवेल प्रतिनिधी  : खारघरमधील गरीब कुटुंबातील १० वर्षीय मुलाला त्याच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून देण्यासाठी रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलचा क्रीडा गणवेश महत्त्वाचा दुवा ठरला आहे. मानसिक दृष्ट्या सक्षम नसलेल्या ‘सोवित’ नामक या मुलाने सोमवारी परराज्यातील ट्रेनमध्ये चढून मध्यप्रदेशात ५८० किमी प्रवास केला. युनिफॉर्म व्यतिरिक्त, प्रवाशाची सतर्कता आणि रामशेठ ठाकूर पब्लिक स्कुलच्या प्राचार्या राज अलोनी यांचा तडफदारपणा यामुळे “मानसिकदृष्ट्या अस्थिर” मुलाला ओळखण्यास आणि त्याच्या पालकाकडे सुखरूप सुपूर्द करण्यात महत्वाची मदत झाली.        दरम्यान सोमवारी वाराणसीला जाताना अरविंद पाठक या प्रवाशाला, रेल्वे कल्याणमधून पुढे रवाना झाल्यानंतर एक मुलगा पीटी युनिफॉर्म परिधान केलेला निदर्शनास आला. तो खेळकर होता. “परंतु अनस्कॉर्ट केलेल्या मुलाला तो कोठे जात होता किंवा तो ट्रेनमध्ये का आला होता याचा काहीच पत्ता त्याला नव्हता, त्याच्याकडे सतत चौकशी केल्यानंतरही त्याला आपल्या आई-वडिलांचे एकेरी नाव व्यतिरिक्त कोणतीच माहिती देता येत नव्हती. फक्त “पेठगाव” असा तो उल्लेख करत होता. दरम्यान त्या मुलाने परिधान

एकच ध्यास.. घारापुरीचा विकास !"-घारापुरी ग्रामपंचायतीच्या प्रयत्नांना मोठे यश !

उरण दि 13(विठ्ठल ममताबादे ) : उरण तालुक्यातील घारापुरी येथील लेण्यांच्या देखभालीसाठी एस.आय .एस या कंपनीचे सिक्युरिटी गार्ड तैनात आहेत.मात्र सदरचे सर्व सिक्युरिटी गार्ड हे परप्रांतीय असल्याने घारापुरी येथील सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीवर घेण्याचा आग्रह ग्रामपंचायतीचे सरपंच बळीराम ठाकुर यांनी कंपनीकडे केला होता.त्याप्रमाणे सन 2018 पासुन भारतीय पुरातत्त्व विभाग व एस.आय.एस.सिक्युरिटी कंपनीकडे पाठपुरावा करण्यात आला होता.त्याप्रमाणे सदरच्या कंपनीने सुरूवातीला तीन सुशिक्षित बेरोजगारांना नोकरीवर रुजू करून घेतले असून लवकरच प्रलंबित असलेल्या अर्जदारांनाही नोकरीची संधी मिळणार आहे.सिक्युरिटी गार्ड म्हणून भरती करण्यासाठी योग्य ते सहकार्य राजिप सदस्य विजय भोईर यांनी केले.स्थानिक भूमीपुत्रांना सेक्युरिटी गार्ड म्हणून रोजगार उपलब्ध झाला आहे. आणि ग्रामपंचायतच्या माध्यमातून पुढेही उपलब्ध होणार असल्याने स्थानिक भूमीपुत्रांनी, ग्रामस्थांनी सरपंच बळीराम ठाकूर, घारापुरी ग्रामपंचायत व जिल्हा परिषद सदस्य विजय भोईर यांचे आभार मानले आहे. स्थानिक भूमीपुत्रांना आहे त्याच ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देण

पनवेल मनपाचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांच्या प्रयत्नाने रस्त्याच्या मध्यभागी असणारे विजेचे धोकादायक खांब काढले

पनवेल : पनवेल शहरातील अमरधाम ते स्वा.सावरकर चौक या रस्त्याचे काँक्रीटीकरण पूर्ण झाले असून पथदिवे लावण्याच्या कामाला ही सुरवात झाली आहे. पण या रस्त्यावरील आशियाना सोसायटी आणि विरुपाक्ष हॉल समोरील विजेचे धोकादायक खांब काढण्यात आले नव्हते, त्यासाठी पनवेल पालिकेचे विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यानी सतत पाठपुरावा करून या ठिकाणच्या विद्युत वाहिन्या भूमिगत कारण्यासाठी प्रयत्न केले. विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांच्या प्रयत्नामुळे दोन्ही ठिकाणचे वाहतुकीस धोकादायक ठरत असलेले विद्युत खांब काढून घेण्याचे काम पूर्ण करून घेण्यात आले आहे.  त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.                सावरकर चौक ते अमरधाम स्मशानभूमी या रस्त्यावर महावितरण कंपनीचे पोल रुंदीकरण झालेल्या रस्त्यात अडथळा निर्माण करत होते. हे विद्युतवाहिनी पोल याबाबत त्वरित कार्यवाही करणे गरजेचे असल्याचे विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांनी कळवले होते. त्यामुळे रस्त्याच्या मधोमध असणारे विजेचे खांब काढण्याची मागणी पालिका व महावितरणकडे करण्यात आली होती. विरोधी पक्ष नेते प्रीतम म्हात्रे यांच्या पाठपुराव्याला य

नवी मुंबईने उभारलेले बाबासाहेबांचे प्रेरणादायी विचार स्मारक देशात नंबर वन - श्री.हरी नरके

देशापरदेशातील वीसहून अधिक स्मारकांना भेटी देण्याचा योग आला असून त्यामध्ये बाबासाहेबांच्या प्रेरणादायी विचारांना अभिवादन करणारे नवी मुंबई महानगरपालिकेने उभारलेले हे स्मारक नंबर वन असल्याचे सांगत सुप्रसिध्द साहित्यिक, व्याख्याते श्री. हरी नरके यांनी स्मारकातील सुसज्ज ग्रंथालय व इतर वैशिष्टपूर्ण सुविधांच्या माध्यमातून लोकांच्या काळजापर्यंत बाबासाहेब पोहचविण्याची धडपड दिसत असल्याबद्दल नवी मुंबई महानगरपालिकेचे कौतुक केले. परिचयातील सर्वांना हे स्मारक आवर्जून बघायला जाण्यास सांगेन असे ते म्हणाले.    नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने 30 मार्चपासून भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव साजरा केला जात असून "जागर 2022" उपक्रमांतर्गत मान्यवर वक्त्यांची व्याख्याने श्रोत्यांच्या मोठ्या संख्येने उत्साही उपस्थितीत संपन्न होत आहेत. यामध्ये महात्मा फुले जयंती दिनाच्या पूर्वसंध्येला सुप्रसिध्द साहित्यिक व व्याख्याते श्री. हरी नरके यांचे "डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नजरेतून महात्मा फुले यांची विचारक्रांती" या विषयावर आयोजित व्याख्यानाप्रसंगी ते बोलत होते

विश्वासाने सर्वस्व झोकून देउन कष्ट करा- डॉ. विजय जोशी

खारघर (प्रतिनिधी) - मानसीकता बदला, स्वतःवर विश्वास ठेवा आणि त्या विश्वासाने आपण जे काम करतोय त्याला सर्वस्व झोकून देउन कष्ट करा असा मोलाचा सल्ला मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे मुख्य सल्लागार डॉ. विजय जोशी यांनी खारघरमध्ये आज झालेल्या समारंभात विद्यार्थ्यांना दिला. जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर कॉलेज ऑफ कॉमर्स अँन्ड सायन्स महाविद्यालयाचा पदवी प्रमाणपत्र वितरण समारंभ (सोमवार, दि. ११)  मुंबई विद्यापीठाचे माजी अधिष्ठाता तसेच राष्ट्रीय उच्चस्तर शिक्षा अभियानाचे मुख्य सल्लागार डॉ. विजय जोशी यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि जनार्दन भगत शिक्षण संस्थेचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली समारंभपूर्वक  संपन्न झाला.   त्यावेळी डॉ. विजय जोशी बोलत होते.      या समारंभात ज्या विद्यार्थ्यांनी अथक परीश्रम घेऊन उज्वल यश संपादीत केले आहे अश्या विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला आमदार तथा जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेचे का

नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर आणि ई श्रम कार्ड अभियान; आमदार प्रशांत ठाकूर यांची लाभली प्रमुख उपस्थिती 

पनवेल(प्रतिनिधी) महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक अजय बहिरा यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीर तसेच मोफत ई श्रम महानोंदणी अभियान आणि ई श्रम कार्ड वाटप तक्का गाव येथे आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाचे उदघाटन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमास महापौर डॉ. कविता चौतमोल, महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, भाजपचे शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक नितीन पाटील, अनिल भगत, तेजस कांडपीळे, नगरसेविका चारुशीला घरत, वृषाली वाघमारे, रुचिता लोंढे, भाजपचे कामोठे अध्यक्ष रविंद्र जोशी, माजी नगरसेवक प्रभाकर बहिरा, संदीप बहिरा, युवा नेते प्रतिक बहिरा, अमन अख्तर, किरण बहिरा, जितू खुटकर, प्रशांत बहिरा, तुषार बहिरा, श्रेयस बहिरा, राम सागर, संदेश घरत, प्रमोद बहिरा, भारत बहिरा, किरण बहिरा, यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.            यावेळी उपस्थितांनी नगरसेवक अजय बहिरा यांचे वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन केले. यावेळी कच्छ युवक संघ पनवेल व नगरसेवक अजय बहिरा यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या शिबिरात ९० रक्तदात्य

नवी मुंबई महानगरपालिका- कंत्राटी कामगारांनाही कोव्हीड विशेष भत्ता देण्याच्या आयुक्त श्री.अभिजीत बांगर यांच्या निर्णयाबद्दल आनंद

कोव्हीड विरोधातील लढ्यात नवी मुंबई महानगरपालिका आस्थापनेवरील अधिकारी, कर्मचारीवृंदाप्रमाणेच कंत्राटी कामगारांनीही आपले कर्तव्य निष्ठेने पार पाडलेले आहे याची जाणीव ठेवत महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांनी  कायम अथवा करार पध्दतीने कार्यरत अधिकारी, कर्मचारी यांना अदा करण्यात आलेला प्रतिदिन रू. 300/- प्रमाणे विशेष भत्ता कंत्राटी कामगारांनाही देण्यात येत असल्याचे जाहीर केले आहे. दि. 23 मार्च 2020 ते 14 एप्रिल 2020 तसेच 15 एप्रिल 2020 ते 31 मे 2020 या कालावधीकरिता कंत्राटी कामगारांच्या उपस्थितीनुसार हा कोव्हीड विशेष भत्ता देण्यात येणार असून तशा प्रकारचा आदेश निर्गमित करण्यात आला आहे. आपण कोव्हीडच्या कठीण काळात केलेल्या कामाची जाणीव ठेवत आयुक्तांनी विशेष भत्ता दिल्याबद्दल कंत्राटी कामगारांमार्फत आनंद व्यक्त करण्यात येत आहे.*       * कोव्हीड विरोधातील लढ्यात नवी मुंबई महानगरपालिका अधिकारी, कर्मचारी यांनी केलेल्या कामाबद्दल कृतज्ञता व्यक्त करीत त्यांचा समुहाने सन्मान 7 एप्रिलला जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून विष्णुदास भावे नाट्यगृहात संपन्न झाला. यामध्ये प्रामुख्याने चतुर्

खारघर-कोपरा परिसरात अवैध दारू विक्री जोरात

नवीन पनवेल : दारूमुक्त असलेले खारघर शहर आता दारू युक्त म्हणून ओळखु लागलेले आहे. खारघर-कोपरा परिसरात अवैध पद्धतीने जोरात दारू विक्री केली जात आहे. कोपरागाव, खारघर गाव, मूर्बीगाव, रांजनपाडा गाव, पेठगाव या सर्व गावामध्ये ठीकठिकाणी बिंधास्तपणे दारू विक्री होत आहे. मात्र यावर कारवाई केली जात नाही.               कोपरा गावात सर्वात जास्त गावठी दारू विक्री धंदे जोरात चालत आहेत. यावर कोणाचा वरदहस्त आहे हे गुलदस्त्यात आहे. खारघरमध्ये फुटपाथवर राहणारे भिकारी सर्वात जास्त प्रमाणात असल्याने हे भिकारी, गर्दूल्ले दारू पिण्याकरता कोपरा गावात येत असतात. व दारू पिऊन रस्त्यावर कुठे ही पडतात. याकडे उत्पादन शुल्क विभाग आणि पोलीसाँचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. दारू विक्रेत्यांचे नाव पोलीसांकडे दिले तर आपले नाव उघड होईल या भीतीने नागरिक पुढे येण्यास घाबरत आहेत. या अवैध धंद्यांचा त्रास स्थानिक नागरिकांना होत असून या अवैध धंद्यांवर कारवाई करुन आळा घालण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांमधून केली जात आहे. खारघर-कोपरा परिसरात अनेक ठिकाणी बेकायदेशीर दारू विक्री चालू आहे. रात्रीच्या वेळी तळीराम बिं

"नक्षत्र-२०२२" विद्यार्थ्यांच्या कला गुणाचे उत्कृष्ट व्यासपीठ-प्राचार्य डॉ. डी.आर.सुरोशे

खारघर: प्रतिनिधी  सरस्वती इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी खारघर मध्ये विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलन "नक्षत्र- २०२२" चे आयोजन करण्यात आले होते. 'जोगवा' या कला नृत्यास प्रथम पारितोषिक देण्यात आले. क्रिकेटमध्ये तृतीय वर्ष सिव्हील हा संघ प्रथम विजेता ठरला. शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्यामध्ये झालेल्या सामन्यांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी अकाउंट सेक्शन हा संघ प्रथम विजेता ठरला. विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यासाठी प्रमुख प्रमुख पाहुणे म्हणून खारघर पोलीस स्टेशनचे धीरज पाटील तसेच खारघर पत्रकार संघाचे संस्थापक सचिव आणि सा.सार्थ लोकनितीचे संपादक संतोष वाव्हळ व माझं साम्राज्य न्युज आणि परिणीता सोशल फाऊंडेशनच्या संचालिका साक्षी सागवेकर या उपस्थित होत्या.

पनवेल शहरासह खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन परिसरात उभी करण्यात येत असलेल्या वाहनांमुळे ज्येष्ठ नागरिकांसह महिला वर्गाला नाहक त्रास

पनवेल (संजय कदम ) : पनवेल रेल्वे स्टेशन परिसर तसेच खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन परिसरात मोठ्या प्रमाणात दुचाकी व चारचाकी वाहने लावण्यात येत असल्याने येथून ये-जा करणार्‍या ज्येष्ठ नागरिकांसह महिला वर्गाला नाहक त्रास सहन करावा लागत आहे. येथील प्रवाशांची सोयी साठी स्टेशन परीसर व स्टेशन बिल्डिंग मध्ये दुकाने व कॅन्टींन शॉप बांधण्यात आले आहे कि जेणे करुन प्रवाशांची सोय होईल. पण आजपर्यंत सिडकोने दुकाने कॅन्टीन कोणालाही भाड्याने दिले नाही व स्वतःही चालू केली नाही. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. तसेच सिडको प्रशासनाचे आत्ता पर्यंत करोडो रुपयांचे नुकसान झाले आहे. तरीही प्रशासनाला जाग येत नाही. त्याचप्रमाणे खांदेश्‍वर रेल्वे स्टेशन परिसरातील समोरील ओपन असलेली जागा पंतप्रधान आवास योजनेला दिली असून येणार्‍या प्रवाशांच्या गाडयांना पार्किंग राहिली नसल्याने पार्किंग स्टेशन आवारात व रस्त्यावरती जागा मिळेल तिथे गाड्या पार्किंग करतात. त्यामुळे येणार्‍या जाणार्‍या वृध्द महिला पुरुष लहान मुले यांना येण्या जाण्याचा फार त्रास होत आहे, सिडकोने स्टेशन आवाराच्या बाहेर दोन वाहनतळ तयार केले आहे पण ते