Skip to main content

सिडको वसाहतींमधील पाणीप्रश्नी पनवेल मनपा-सिडको सकारात्मक बैठक


निर्देशांचे पालन न झाल्यास आंदोलन : सभागृह नेते परेश ठाकूर

पनवेल(प्रतिनिधी) पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल आणि तळोजा या सिडको वसाहतींमध्ये होणार्‍या अपुर्‍या व अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासंदर्भात बुधवारी (दि. 23) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. बेलापूर येथील सिडको भवनामध्ये झालेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून शिंदे यांनी पाण्याची समस्या दूर करण्यासंदर्भातील निर्देश दिलेे. दरम्यान, या निर्देशांचे पालन झाले नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिला आहे.
पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमध्ये राहणार्‍या नागरिकांना अनेक वर्षांपासून पाण्याच्या तुटवड्याची समस्या भेडसावत आहेत. नुकतेच खारघर येथे पाण्याच्या प्रश्नावरून नगरसेवकांनी सिडको अधिकार्‍यांना घेराव घातला होता. त्या वेळी अधिकार्‍यांनी बुधवारी या समस्येवर सिडको भवनामध्ये बैठक घेऊ, असे सांगितले होते. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली व महापालिका सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली सिडकोचे सहव्यवस्थापक कैलास शिंदे यांच्यासोबत बैठक झाली.
या बैठकीला पनवेल महापालिकेचे आयुक्त गणेश देशमुख, स्थायी समिती सभापती नरेश ठाकूर, महिला व बालकल्याण सभापती हर्षदा उपाध्याय, प्रभाग समिती सभापती संजना कदम, नगरसेवक अभिमन्यू पाटील, हरेश केणी, निलेश बावीस्कर, बबन मुकादम, प्रवीण पाटील, नगरसेविका अनिता पाटील, नेत्रा पाटील, भाजप नेते किर्ती नवघरे, अमर उपाध्याय, समीर कदम, वासुदेव पाटील यांच्यासह अधिकारी, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
या बैठकीत सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी खारघर आणि कामोठ्यामध्ये जाणवणारा पाण्याचा तुटवडा एमजेपी आणि एमआयडीसीच्या माध्यमातून पूर्ण व्हावा तसेच कळंबोली आणि नवीन पनवेलमध्ये पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन व्हावे असे निर्देश दिले तसेच पाण्याची चोरी आणि टँकरबाबत असलेल्या समस्या दूर करण्यासंदर्भातही त्यांनी निर्देश दिले.
या बैठकीसंदर्भात सभागृह नेते परेश ठाकूर यांनी सांगितले की, सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांनी पाणीपुरवठ्याबाबत जे निर्देश दिले त्यांची अंमलबजावणी होते की नाही याची आम्ही पाहणी करणार आहोत. जर या निर्देशांचे पालन होताना दिसले नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल.


Comments

Popular posts from this blog

किरण गिते यांच्या वाढदिवसानिमित्त विविध उपक्रमाचे निमंत्रण

  खारघर : किरण  गिते यांच्या  वाढदिवसासाठी प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक व खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड आणि सर्व संत वामन भाऊ भगवानबाबा सेवाभावी संस्था सदस्य यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात येणार आहे .         खारघर कॉलनी अध्यक्षा श्रीमती लीना अर्जुन गरड  यांच्याकडून किरण अण्णासाहेब गिते यांचा सत्कार करण्यात येणार आहे . वाढदिवसानिमित्त विविध उपक्रम आयोजित केले आहे . या उपक्रमामध्ये २५ ऑगस्ट २०२३ रोजी लाइव्ह ऑर्केस्ट्रा संध्याकाळी ६ :३० वाजता  घेण्यात येणार असून संध्याकाळी  साडेआठ वाजता नंतर केक कापून स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित केला आहे . सर्व उपक्रमाचे ठिकाण आचार्य अत्रे गार्डन, प्लॉट नं.13, सेक्टर-21, खारघर येथे आयोजित केले आहे . सर्व नागरिकांनी उपस्थित राहून उपक्रमाचे शोभा वाढवण्यात यावी .

महाआवास अभियान - ग्रामीण अंतर्गत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत ई-गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न

नवी मुंबई, दि. १६ : महाआवास योजना अभियान-ग्रामीण अंतर्गत ई गृहप्रवेश कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथी गृह येथे घरकुलाच्या चावीचे वाटप करण्यात आले. विभागीयस्तरावर कोकण विभागीय आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात लाभार्थाना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले. कोकण विभाग आणि ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आयुक्त कार्यालयात हा ई गृहप्रवेश कार्यक्रम संपन्न झाला.  _*राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सहयाद्री अतिथीगृहात झालेल्या ई गृहप्रवेशाच्या कार्यक्रमात ठाणे जिल्हयातील पांडू गणपत दरोडा आणि रसिक रवींद्र गायकवाड त्याचबरोबर पालघर जिल्हयातील सोनी संदेश महाले, सुरेश पांडुरंग धिंडा आणि अशोक काशिनाथ घागरे  या लाभार्थ्यांना घरकुल चावीचे वाटप करण्यात आले.*_  यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष पुष्पा गणेश पाटील, ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी  डॉ. भाऊसाहेब दांगडे, उपायुक्त (प्रशासन) मनोज रानडे, उपायुक्त (विकास) गिरीष भालेराव, सहाय्यक आयुक्त (विकास)

अभिनेता भूषण प्रधानच्या चित्रपटांचा अल्ट्रा झकासवर चौकार

  मराठी सिनेसृष्टीत आपल्या दमदार अभिनयाबरोबरच हॅंडसम लुक आणि फिटनेसमुळे ओळखला जाणारा अभिनेता भूषण प्रधान याचे अल्ट्रा झकास या मराठी ओटीटीवर एका पाठोपाट एक चित्रपट जोरदार गाजत आहेत. महाराष्ट्राचा मराठी ओटीटी अल्ट्रा झकासने आजवर भूषण प्रधानचे 'ऊन सावली', 'फेक मॅरेज' आणि 'लग्न कल्लोळ' हे तीन चित्रपट प्रदर्शित केले आहेत. याचबरोबर नुकताच 'अल्ट्रा झकास'वर १७ मे २०२४ रोजी ‘रंगीत’ या नव्या कोऱ्या चित्रपटाचा थेट ओटीटी रिलीज - वर्ल्ड डिजिटल प्रीमियर झाला आहे. ऊन सावलीतला प्रणय, फेक मॅरेजमधला मिहिर, लग्न कल्लोळ मधला अथर्व प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. असेच रंगीत चित्रपटात भूषण प्रधानने साकारलेला सिद्धार्थही रसिकांना खोलवर भावत आहे. ऊन सावली चित्रपटात प्रणयला पहिल्या भेटीतच अन्वी आवडली आहे, मात्र अन्वीची लग्न करण्याची इच्छा नाही. फेक मॅरेज चित्रपटात स्वप्नांच्या मागे धावताना नाती आणि नात्यांतील होणारे बदल आयुष्याला एका अनपेक्षित वळणावर घेऊन जातात, हे दाखवले आहे. लग्न कल्लोळ चित्रपटात श्रुती आणि अथर्वची एका कुंडलीमुळे काय फजिती होते, ते धमाल पद्धतीने दाखवले आहे.