सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयातील विविध कक्षांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन-भव्य, देखण्या आणि सुसज्ज वास्तूचे कौतुक
पनवेल(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयाचे काम पूर्णत्वास येत आहे. त्या अंतर्गत विद्यालयात चेअरमन केबिन, अॅडमिन रूम, लहान मुलांसाठी प्ले रूम आणि स्टाफ रूम तयार झाली आहे. या विविध कक्षांचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी (दि. 22) झाले. या वेळी उपस्थितांनी या भव्य, देखण्या आणि सुसज्ज विद्यालयाचे तोंडभरून कौतुक केले.
या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगिरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मीनाताई जगधने, सचिव विठ्ठलराव शिवणकर, सहसचिव संजय नागपुरे, प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य गणेश ठाकूर, आर. डी. गायकवाड, जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महापालिका सभागृह नेते तथा स्कूल कमिटी चेअरमन परेश ठाकूर, न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन शरद खारकर, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्राचार्य मुक्ता खटावकर, छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, विभागीय अधिकारी आर. पी. ठाकूर, सहाय्यक विभागीय अधिकारी शहाजी फडतरे, पीआरओ बाळासाहेब कारंडे, विश्वनाथ कोळी, पी. ए. कोळी, आर. एस. भोईर, जे. एस. ठाकूर, पी. ए. गोळे, निलेश खारकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते व शिक्षणप्रेमी उपस्थित होते.
Comments
Post a Comment