खारघरच्या डोंगरावर लागलेल्या आगीबद्दल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांची मागणी
खारघर : खारघर मधील डोंगरावर लागलेल्या आगीसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा . पर्यावरणाचा विध्वंस करणाऱ्या व खारघर डोंगरावरील वनसंपदा, पक्षी, प्राणी याना आगीत भस्मसात करणार्यांवर कायदेशीर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी खारघर पोलिसांकडे केली आहे.
दोन दिवसांपूर्वी खारघरमधील डोंगरावर मोठ्या स्वरूपात आग लागली. या आगीत मोठ्याप्रमाणावर डोंगरावर राहणारे पशुपक्षी, प्राणी होरपळून मृत्युमुखी पडले. दरवर्षी खारघर डोंगरावर काही अज्ञात गुंड व अपप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून आग लावण्यात येते. त्यानंतर बेसुमार वृक्षतोड करण्यात येते. स्थानिक वन अधिकारी याला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. खारघरमध्ये लागलेली आग ही पूर्वनियोजित असावी, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन गाड्या व मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागले. तरी ही आग आटोक्यात आलेली नव्हती. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment