Skip to main content

Posts

Showing posts from March, 2022

बैलगाडा शर्यतींमधले खटले मागे घेणार-मंत्रीमंडळ निर्णय

राज्यात बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्यामुळे दाखल झालेले खटले मागे घेण्यास मान्यता देण्यात आली. हे खटले मागे घेण्यासाठी खालील अटी निश्चित करण्यात आल्या आहेत. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.बैलगाडी शर्यतीच्या घटनेत जिवीत हानी झालेली नसावी, खाजगी व सार्वजनिक मालमत्तेचे 5 लाखापेक्षा जास्त नुकसान झालेले नसावे, या खटल्यांवर पोलीस आयुक्त व जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील क्षेत्रिय समिती कडून निर्णय घेण्यास मान्यता देण्यात आली.  सर्वोच्च न्यायालयाने रिट याचिकेमध्ये दिलेल्या निर्णयानुसार ज्या खटल्यांमध्ये विद्यमान व माजी खासदार व आमदार यांचा समावेश आहे, असे खटले उच्च न्यायालयाच्या संमतीशिवाय मागे घेण्यात येऊ नये, असे निर्देश दिले आहेत. त्याला अनुसरुन विद्यमान व माजी खासदार व आमदार यांचा ज्या खटल्यात समावेश आहे ते खटले मागे घेणे योग्य असल्याचे क्षेत्रिय समितीचे मत झाल्यास समितीने त्याबाबत शिफारस करुन उच्च न्यायालयाकडे तशी विनंती करण्यास मान्यता देण्यात आली.  

गुढीपाडव्यापासून राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध मागे-नववर्षापासून नवीन संकल्प करुयात-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि.31- गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून  आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (2 एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले. यावेळी त्यांनी मंत्रिमंडळाच्या वतीने राज्यातील जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या. मात्र कोरोनाचा भविष्यात धोका उद्भवू नये यासाठी नागरिकांनी मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे कोरोना प्रतिबंधक लस घेणे आवश्यक आहे. आरोग्याचे नियम पाळून आपली तसेच इतरांची देखील काळजी घ्यावी, असे आवाहन देखील त्यांनी केले आहे. याबाबतीतले सविस्तर आदेश तातडीने देण्याचे निर्देश देखील त्यांनी प्रशासनाला दिले. गेल्या दोन वर्षापासून राज्यातील डॉक्टर्ससह सर्व फ्रंटलाईन कर्मचारी, एवढेच नव्हे तर सर्व नागरिकांनी कोरोनाशी लढतांना एकमु

जग जिंकायचं असेल तर मोठी स्वप्ने बघायला हवीत-पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेl

अलिबाग, दि.30 (जिमाका):- आपल्याला जग जिंकायचं असेल तर मोठी स्वप्ने बघायला हवीत. समोर आलेल्या अडचणींवर आत्मविश्वासाने मात करून विकासाकडे वाटचाल करायला हवी आणि यासाठी मी सदैव तुमच्या सोबत असेन, आपण सर्वजण एकत्र काम करू, असे प्रतिपादन पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज लोणेरे येथे केले. लोणेरे येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ परिसरातील इन्‍क्युबेशन सेंटर व पदव्युत्तर संशोधन केंद्र इमारतीचे भूमीपूजन तसेच अनुसूचित जाती जमातीच्या मुलींच्या वसतिगृहाचे भूमीपूजन पर्यटन, पर्यावरण, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते संपन्न झाले. त्यावेळी ते बोलत होते.      यावेळी रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री कु.आदिती तटकरे, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री श्री.उदय सामंत, परिवहन मंत्री ॲड.अनिल परब, खासदार श्री.सुनिल तटकरे, आमदार श्री.अनिकेत तटकरे, आमदार श्री.भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, आमदार महेंद्र थोरवे, आमदार योगेश कदम, आमदार प्रकाश सुर्वे, किशोरभाई जैन, मुंबई इमारत सुधार व पुर्नरचना मंडळाचे अध्यक्ष श्री.विनोद घोसाळकर, जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर, महाराष्ट्र राज्य

घुसखोर बांगलादेशी नागरिकांना न्यायालयाचा दणका ! आता वास्तव्य करून देणार्‍यांचेही दणाणले धाबे

, पनवेल (संजय कदम) : पनवेल परिसरात बेकायदेशीररित्या वास्तव्य करणार्‍या तीघा बांगलादेशीयांविरोधात पनवेल मा.न्यायालयाने सजा सुनावली आहे. यामुळे अशा प्रकारे आपल्या चाळीत किंवा घरात नियमाचे उल्लंघन करून बांगलादेशीयांना वास्तव्य करून देणार्‍यांचे धाबे दणाणले आहेत. पनवेल तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नेरेपाडा येथील म्हात्रे चाळ या ठिकाणी अनधिकृतरित्या तीन घुसखोर बांगलादेशीय नागरिक राहत असल्याची माहिती पनवेल तालुका पोलीस ठाण्याचे वपोनि रवींद्र दौंडकर व त्यांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार सदर ठिकाणी छापा टाकून श्रीमती.लाखी गुलाम मालिक (45), मासुद राणा इंदुशेख (27) व श्रीमती.जमुना मासुद राणा शेख (21) व सोबत लहान मुलगी कु.नाजिया (1) यांना ताब्यात घेवून त्यांच्या अधिक चौकशीमध्ये त्यांनी कोणतीही वैध प्रवासी कागदपत्राशिवाय अवैध मार्गाने भारत-बांगला सिमेवरुन लपत छपत भारतात प्रवेश करून पनवेल परिसरात अनधिकृतपणे वास्तव्य केल्याचे निष्पन्न झाल्याचे त्यांच्या विरुद्ध तालुका पोलीस ठाण्यात पारपत्र (भारतात प्रवेश), नियम 1950 चे कलम 3 (ए), 6 (ए) सह विदेशी नागरिक अधिनियम 1946 चे कलम 14 (

पनवेलमध्ये छम छम बंद ! दोन बारचे परवाने रद्द; पोलिसांच्या पाठपुराव्याला यश

पनवेल (संजय कदम ) : पनवेल तालुक्यातील विविध नियमांचा भंग केल्याप्रकरणी पनवेल तालुका पोलिसांनी वेळीच केलेल्या कारवाईमुळे त्यानंतर शासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे अखेरीस रायगड जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी दोन बारचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्याचे आदेश काढले आाहेत. विविध नियमांचा भंग केल्याप्रकरणी पनवेल तालुक्यातील कोन गावाच्या हद्दीतील साईदर्शन व साईराज बारवर रायगडचे जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांनी धडक कारवाई करून या दोन्हीही बारचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले आहेत. बार मधील महिला वेटर्स व गिर्हाईके यांच्यात अश्‍लील हातवारे, बीभत्स वर्तन होत असल्याबाबत यापूर्वी पनवेल तालुका पोलिसांकडे अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. याबाबत वपोनि रवींद्र दौंडकर व त्यांच्या सहकार्‍यांनी गुन्हे दाखल करून देखील वारंवार नियमांचा भंग करून बार चालवण्यात येत असल्याचे निष्पन्न झाल्याने अखेर रायगडचे जिल्हाधिकारी डॉक्टर महेंद्र कल्याणकर यांनी धडक कारवाई करून या दोन्ही बारचे परवाने कायमस्वरुपी रद्द करण्यात आले आहेत. पनवेल तालुक्यातील कोन गावाच्या हद्दीतील हॉटेल साईदर्शन बार

शारिरीक अपंगात्वावर मात करीत पनवेलमधील एका तरुणाने गाठले यशाचे शिखर

पनवेल (संजय कदम) ः शारिरीक अपंगत्वावर मात करीत पनवेलमधील एका तरुणाने यशाचे शिखर गाठताना इंटरनेट मार्केटींग, एरलिक मिडीया या कंपनीची स्वतः स्थापना करून त्यात घवघवीत यश मिळविल्याने त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. पनवेलमधील मध्यमवर्गीय कुटुंबियात वास्तव्यास असलेला परिक्षित शहा याला जन्मतः शारिरीक अपंगामुळे दुसर्‍याच्या आधाराशिवाय जागेवर थोडाही हलू शकत नव्हता. असे असले तरी शिक्षणाची आवड व ध्यास याच्यावर त्याने अपंगात्वावर सुद्धा मात करीत अंथरुणावर पडूनच आजपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले आहे. परिक्षित शहा नुसताच पास न होता दहावीच्या परिक्षेत हा घवघवीत यश मिळवून पुढे आला. त्याची हाडे ठिसूळ असल्यामुळे तो स्वतःच्या पायावर कधीही उभा राहू शकणार नव्हता. त्याला ऑस्टिओजेनेसिस नावाचा आजार असल्यामुळे तो त्याच्या आईच्या आधाराशिवाय एका जागेवरुन दुसर्‍या जागेवर हलू शकत नव्हता, असेही असताना त्याने दहावी व बारावीची परिक्षा चांगल्या श्रेणीत पास होवून तो यशस्वी झाला. शिक्षणाची मुळातच आवड असल्याने पुढे त्याने 2017 ला पुणे युनिव्हर्सिटीमधून एम.ए. इकॉनॉमिक्स पूर्ण केले. आणि त्याच वर्षी मुंबई युनिव्हर्सिटीमधून

सिडको वसाहतींमधील पाणीप्रश्नी पनवेल मनपा-सिडको सकारात्मक बैठक

निर्देशांचे पालन न झाल्यास आंदोलन : सभागृह नेते परेश ठाकूर पनवेल(प्रतिनिधी)  पनवेल महापालिका क्षेत्रातील कळंबोली, कामोठे, खारघर, नवीन पनवेल आणि तळोजा या सिडको वसाहतींमध्ये होणार्‍या अपुर्‍या व अनियमित पाणीपुरवठ्याच्या प्रश्नासंदर्भात बुधवारी (दि. 23) सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाची सिडकोचे सहव्यवस्थापकीय संचालक कैलास शिंदे यांच्यासोबत बैठक झाली. बेलापूर येथील सिडको भवनामध्ये झालेल्या या बैठकीत सकारात्मक चर्चा झाली असून शिंदे यांनी पाण्याची समस्या दूर करण्यासंदर्भातील निर्देश दिलेे. दरम्यान, या निर्देशांचे पालन झाले नाही, तर आंदोलनाचा पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा सभागृह नेते परेश ठाकूर यांनी दिला आहे. पनवेल महापालिका क्षेत्रातील सिडको वसाहतींमध्ये राहणार्‍या नागरिकांना अनेक वर्षांपासून पाण्याच्या तुटवड्याची समस्या भेडसावत आहेत. नुकतेच खारघर येथे पाण्याच्या प्रश्नावरून नगरसेवकांनी सिडको अधिकार्‍यांना घेराव घातला होता. त्या वेळी अधिकार्‍यांनी बुधवारी या समस्येवर सिडको भवनामध्ये बैठक घेऊ, असे सांगितले होते. त्यानुसार आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयातील विविध कक्षांचे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन-भव्य, देखण्या आणि सुसज्ज वास्तूचे कौतुक

पनवेल(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या उलवे नोड येथील सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर सीबीएसई विद्यालयाचे काम पूर्णत्वास येत आहे. त्या अंतर्गत विद्यालयात चेअरमन केबिन, अ‍ॅडमिन रूम, लहान मुलांसाठी प्ले रूम आणि स्टाफ रूम तयार झाली आहे. या विविध कक्षांचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील व अन्य मान्यवरांच्या हस्ते मंगळवारी (दि. 22) झाले. या वेळी उपस्थितांनी या भव्य, देखण्या आणि सुसज्ज विद्यालयाचे तोंडभरून कौतुक केले. या कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे व्हाईस चेअरमन भगिरथ शिंदे, मॅनेजिंग कौन्सिल सदस्य माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, मीनाताई जगधने, सचिव विठ्ठलराव शिवणकर, सहसचिव संजय नागपुरे, प्राचार्य शिवलिंग मेनकुदळे, प्राचार्य गणेश ठाकूर, आर. डी. गायकवाड, जनरल बॉडी सदस्य अरुणशेठ भगत, पनवेल महापालिका सभागृह नेते तथा स्कूल कमिटी चेअरमन परेश ठाकूर, न्यू इंग्लिश स्कूलचे चेअरमन शरद खारकर, सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर विद्यालयाच्या प्राचार्य मुक्ता खटावकर, छत्रपती शिवाजी विद्यालयाच्या प्राचार्य साधना डोईफोडे, मोरू नारायण म्हात्रे विद्यालयाचे चेअरमन भार्गव ठाकूर, विभागीय अधिका

खारघरच्या डोंगरावर लागलेल्या आगीबद्दल चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची शिवसेना जिल्हा प्रमुख शिरीषदादा घरत यांची मागणी

खारघर : खारघर मधील डोंगरावर लागलेल्या आगीसंदर्भात उच्चस्तरीय चौकशी करून संबंधितांवर गुन्हा दाखल करावा . पर्यावरणाचा विध्वंस करणाऱ्या व खारघर डोंगरावरील वनसंपदा, पक्षी, प्राणी याना आगीत भस्मसात करणार्‍यांवर कायदेशीर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक कारवाई करण्याची मागणी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी खारघर पोलिसांकडे केली आहे.         दोन दिवसांपूर्वी खारघरमधील डोंगरावर मोठ्या स्वरूपात आग लागली. या आगीत मोठ्याप्रमाणावर डोंगरावर राहणारे पशुपक्षी, प्राणी होरपळून मृत्युमुखी पडले. दरवर्षी खारघर डोंगरावर काही अज्ञात गुंड व अपप्रवृत्तीच्या व्यक्तींकडून आग लावण्यात येते. त्यानंतर बेसुमार वृक्षतोड करण्यात येते. स्थानिक वन अधिकारी याला जबाबदार असल्याचे बोलले जात आहे. खारघरमध्ये लागलेली आग ही पूर्वनियोजित असावी, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन गाड्या व मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागले. तरी ही आग आटोक्यात आलेली नव्हती. या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करून गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

30 मार्च पर्यंत प्रत्येक रविवारी विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम*

नवी मुंबई :24 मार्च हा दिवस जागतिक क्षयरोग दिन म्हणून जगभरात साजरा करण्यात येतो. यावर्षी जागतिक क्षयरोग दिनानिमित्त 24 फेब्रुवारी ते 30 मार्च 2022 या कालावधीत क्षयरोग विषयक विविध उपक्रम राबविणेबाबत शासनामार्फत सूचित करण्यात आले. आहे. त्यामध्ये एक विशेष उपक्रम म्हणजेच “ACF SUNDAY” अर्थात रविवारी विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम. क्षयरुग्णांचा लवकरात लवकर शोध घेणे व त्यांना उपचाराखाली आणणे हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.       नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीनेही 24 फेब्रुवारी ते 30 मार्च या कालावधीत विशेष सक्रिय क्षयरुग्ण शोध मोहीम महापालिका आयुक्त श्री. अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत असून प्रत्येक रविवारी महानगरपालिका कार्यक्षेत्रातील क्षेत्रीय कर्मचा-यांमार्फत जनजागृती व तपासणी करण्यात येत आहे. याकरिता 28 क्षेत्रीय कर्मचारी कार्यरत असून 3739 नागरिकांची तपासणी करण्यात आलेली आहे.       या मोहीमेदरम्यान 84 संशयित रुग्ण आढळले असून त्यांची मोफत थुंकी तपासणी करण्यात येऊन खाजगी यंत्रणेव्दारे त्यांचे मोफत एक्सरे काढण्यात आले आहेत. यामध्ये क्षयरुग्णांचे

संताची मांदियाळी हाउसफुल्ल

पनवेल (प्रतिनिधी) विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला…. खेळ मांडीयेला वाळवंटी ठाई…… पतित तू पावना पवना….. ये गं ये गं विठाबाई... या अभंगांच्या तालावर संत मंडळी आणि वारकरी यांची मांदियाळी पनवेलमध्ये अवतरली होती.... निमित्त होते श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ व भाजपा महिला मोर्चा आयोजित ‘नाच गं घुमा. पनवेल प्रस्तुत ‘संतांची मांदियाळी ‘या नाट्यकृतीचे. संत निवृत्तीनाथा पासून ते संत रामदासा पर्यंतची संत परंपरा, त्यांचे विचार, समाज सुधारण्यासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि केलेल्या रचना यामुळे पनवेल नगरीचं वातावरण भक्तिमय झालं होतं. महिला दिनाचं औचित्य साधून आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्य गृहात नाच गं घुमा च्या महिला कलाकारांनी हा कार्यक्रम सादर केला. पहिल्यांदाच पनवेल मध्ये सादर झालेला हा कार्यक्रम हाउसफुल्ल झाला. कार्यक्रमाचे उद्घाटन पनवेलचे लोकप्रिय आमदार प्रशांत ठाकूर, महापौर डॉ. कविता चौतमोल, माजी उपमहापौर चारुशीला घरत, वर्षा ठाकूर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी अर्चना ठाकूर, महिला मोर्चाच्या तालुका अध्यक्षा रत्नप्रभा घरत, शहर अध्यक्षा वर्षा

खारघरमध्ये आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते नारीशक्तीचा सन्मान

खारघर (प्रतिनिधी)- भारतीय जनता पार्टी, खारघर तळोजा महिला मोर्चाच्या वतीने नारीशक्तीचा सन्मान अधोरेखित करणारा जागतिक महिला दिन रविवारी शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.धार्मिक, अध्यात्मिक, क्रीडा, सामाजिक, शैक्षणिक व पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून समाजासमोर कर्तृत्वाचा ठसा उमटविणाऱ्या अकरा नारीशक्तींचा गुणगौरव व यथोचित सत्कार पनवेल विधानसभेचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शुभ हस्ते करण्यात आला.        या कार्यक्रमाचे उद्घाटन विमल बिडवे मॅडम पाेलिस निरीक्षक खारघर पोलिस स्टेशन,  रेश्मा मोमीन मॅडम सहायक पोलिस निरीक्षक वाहतूक, दिपाली राहणे मॅडम ट्रॅफिक, अश्विनी शिरोडकर प्रभाव प्रतिष्ठान सामाजिक संस्थेच्या डायरेक्टर, पनवेल महानगरपालिका स्थानिक नगरसेवक शत्रुघ्न काकडे, भाजप खारघर मंडलाचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात आदिती सिंग व प्राची देशपांडे यांच्या गणेश वंदनाने झाली त्यानंतर क्रांती गढीपल्ली, अनन्या गढीपल्ली, भारती बांदेकर, आशा बोरसे टीम,ज्योती शिंदे, सीमा सूर्यवंशी, विजया ठाकूर, शिल्पा गायकवाड कल्याणी शिंदे, उमे