पनवेल(प्रतिनिधी) पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त सेवा व समर्पण अभियानांतर्गत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते रविवारी (दि. ३) औषधी वनस्पतींचे रोपणाचा कार्यक्रम कामोठे येथे पार पडला. या कार्यक्रमाचे आयोजन कामोठे शहर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांनी केले होते. २० प्रकारची विविध उपयोगी औषधी आयुर्वेदिक झाडे या वेळी लावण्यात आली.
या कार्यक्रमासाठी उपमहापौर जगदीश गायकवाड, कामोठे मंडळ अध्यक्ष रवींद्र जोशी, नगरसेवक डॉ अरुण कुमार भगत, नगरसेवक गोपीनाथ भगत, नगरसेवक विकास घरत, नगरसेवक विजय चिपळेकर, नगरसेविका पुष्पा कूत्तरवडे,नगरसेविका संतोषी तुपे, नगरसेविका हेमलता गोवारी, युवा नेते हेप्पी सिंग, समाजसेवक रवी गोवारी, समाजसेवक प्रकाश पाटील ,सरचिटणीस शरद जगताप , व्यापारी आघाडीचे अध्यक्ष नानाशेठ मगदूम,बूथ अध्यक्ष स्वप्नील पाटील, संदीप तुपे, प्रज्ञा प्रकोष्ठ संयोजक सुहास पाटील, हरजिंदर कौर, दीपाली तिवारी, सोशल मीडिया संयोजक प्रवीण वाघमारे, युवा मोर्चा सरचिटणीस नवनाथ भोसले, विजय लोखंडे, मनीषा वणवे, सुरेखा लांडे, जयश्री गाडगे, लता गोडगे, सोनाली खरटमोल, उत्तम जाधव, कल्पना जाधव, अनिता शेट्टी, अमित शेलार, आदित्य भगत, धीरज सिंग, अमित सावंत, अमित झावरे, प्रवीण कोरडे, चेतन चव्हाण, मयांक कुमार, मोहन जोशी, अमित जाधव, सागर तांबे, श्याम तोड्कर, अखिल पन्हाळकर, राकेश झा, श्री. बडे, रमाकांत मालवणकर, संजय लोखंडे, दिगंबर कुलकर्णी,भाजपा सर्व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते
Comments
Post a Comment