लोकनेते रामशेठ ठाकूर यांची कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चला सदिच्छा भेट
पनवेल(प्रतिनिधी) रयत शिक्षण संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे जेष्ठ सदस्य व थोर देणगीदार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी रयत शिक्षण संस्थेच्या १०२ व्या वर्धापन दिनानिमित्त आज (दि. ०४) वर्ये (सातारा) येथील कर्मवीर भाऊराव पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चला सदिच्छा भेट दिली. त्यांच्या शुभ हस्ते अंतीम वर्षातील कॅम्पस इंटरव्ह्यू द्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या बॅनरचे प्रकाशन करण्यात आले.
कोरोना काळात इन्स्टिट्यूट ने केलेल्या कामाचे यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले. तसेच गतवर्षी संशोधन व पेटंट नोंदणी केल्याबद्दल डॉ सारंग भोला यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरवण्यात आले तसेच काॅपीराईट बद्दल डॉ राजेंद्र कुंभार व संशोधन पेपर प्रकाशित केल्याबद्दल डॉ. शिवराज निकम तसेच संशोधन, काॅपीराईट व पेटंट नोंदणीसाठी सहकारी प्राध्यापकांना प्रेरणा व प्रोत्साहन केल्याबद्दल इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ बापूसाहेब सावंत यांचा लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचबरॊबर त्यांनी इन्स्टिट्यूटच्या सर्व शिक्षकांशी चर्चा करून मार्गदर्शन केले व समाधान व्यक्त केले व इन्स्टिट्यूटच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
Comments
Post a Comment